Breking News

मंगळवार, २३ डिसेंबर, २०१४

सातपुड्यात आढळले दुर्मिळ पक्षी....

सातपुड्याच्या पायथ्याशी आढळले गिधाड,गरुड़,करकोचा अन पानकावळा 
सातपुड्याच्या कुशीत अनेक वनौषधीच्या खजिना आजही आढळून येतो. निसर्गाशी समतोल राखत विविध वनौषधीसह दुर्मिळ पक्षी आजही सातपुड्यात वास्तव्य करुण आहेत. राणीपुर, तुलाजापुर, पाडळपुर व रोझवा आदी धरण व पानथळ ठिकाणी गिधाड़, गरुड़,करकोचा, पानकावळा,पानबदकासह विविध रंगी बेरंगी दुर्मिळ पक्षी सातपुड्यात आपल्या मधुर आवाजात निछंद आकाशात घिरटी घेतानाचे मनमोहक दृष्य नजरेचे पारणे फेडणारे ठरत आहे... निसर्ग साखळीतील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतो. यातील एखादा घटक कमी झाल्यास त्याचा संपूर्ण अन्नसाखळीवर
परिणाम होतो. त्यामुळे निसर्गाचा महत्त्वाचा घटक असलेले पक्षी नष्ट झाले तर.... ही कल्पनाच मानवजातीला चिंता व्यक्त करायला लावणारी ठरू शकते...केवळ दिसायला आकर्षक आणि मधुर शीळ घालणे एवढेच पक्ष्यांचे महत्त्व नसून, यातील गिधाड, गरुड, घारी, कावळे यांसह काही पाणपक्षी निसर्गाचे सफाई कामगार आहेत. तर घुबडासारखे काही पक्षी उंदीर, घुशी, कीटक यांसारख्या उपद्रवी प्राण्यांवर नियंत्रण ठेवतात. फुलझाडे, फळझाडांच्या संवर्धनातही त्यांची महत्त्वाची भूमिका दिसुन येते.आज सर्वत्र पक्षी कमी होत
असल्याची चिंता पर्यावरण प्रेमी व पक्षी तज्ञाना भेडसावत आहे मात्र सातपुड्याचा पायथ्याशी अद्यापही दुर्मिळ पक्षी आढळून येतात.दि- 21-डिसेंबर रोजी जगविख्यात दिवंगत पक्षीमित्र डॉ.सलीमअली ह्यांच्या जयंती निमित्त बॉम्बे नेचुरल हिस्टोरी सोसायटीच्या आदेशाने आशियाई पालपक्षी गणना कार्यक्रमांतर्गत तळोदा वनविभागामार्फत पक्षांची गणना कार्यक्रम हाती घेण्यात आला. पहाटेच्यावेळी तळोदा तालुक्यातील धरण व पानथड़ जागी पक्षीमित्र प्रा. अशोक वाघ, तलोदा वनक्षेत्रपाल अशोक पाटील वनरक्षक सदस्यासह पत्रकार कालीचरण सूर्यवंशी, सुधाकर मराठे आदिनी पाहणी केली
सातपुड्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन नसतानाही अद्यापही दुर्मिळ प्राणी व नष्टप्राय पक्ष्यांचे अस्तित्व् आढळून आले. त्यात प्रामुख्याने तालुक्यातील सातपुड्यांचा पायथ्याशी असणाऱ्या पाडळपुर या धरणाच्या पानथड़ जागेत गिधाड,गरुड़, करकोचा,पानकावळा खाऱ्याधोबी असे दुर्मिळ पक्षी आढळून आलेत. त्याचसोबत तुलाजापाड़ा परिसरात जंगलीबदक,पांणकोंबळा, टिट्वी, कारू,नीलकंठ,खिवडा, बगळा,घोड़पाल,मोहरी, तीतरी, सोमावल अमोणी धरण परिसरात सफ़ेद बगड़ा, पाकोळया,पाणकोंबड्या, रखंडया, किंगफ़िशर,  सिताफली बंधारा
परिसरात कोकिळा, कावळा, बदक, घार तर रोझवा डैम परिसरात वनचक्, पानबदक, पाडळपुरगावा नजिक असलेला राणीपुर पाझर तलाव परिसरात गरुड़,गिधाड, खाऱ्या धोबी, कारकोचा,जंगली कावळा,रवात्यासह विविध रंगछटा असलेले पक्षी आढळून आले. ह्या अगोदर सोजरीबार, गोऱ्यामाळ, ह्या दरया खोऱ्यात गिधाडचे अस्तित्व दिसुन आले आहे. मात्र गिधाड आता पाडळपुर भागात सुद्धा दृष्टिस पडल्याने या अतिदुर्मिळ पक्षाचे सातपुड्यातील अस्तित्वाला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला आहे. तसेच ``गरुड़'' हां सुद्धा सहजा सहजी दृष्टिस् पड़त नसतो. मात्र योगायोगाने या पाडळपुर ह्या धरणात मृत पडलेला ``तरस''
 प्राणी खाण्यासाठी गिधाड व गरुड़ आले असताना क्षणाचाही विलंब न करता वनरक्षक कु.भावना जाधव यांनी त्यास आपल्या कॅमेरात कैद केले. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या निकषानुसार गिधाडाच्या चार जाती, फॉरेस्ट ऑउलेट, माळढोक, बेंगल फ्लोरिकन अश्या आहेत. ह्यापैकी एका जातीचे अस्तित्व मागील काही वर्षात वड़फडी परिसरात आढळून आल्याचे पक्षीमित्र प्रा.अशोक वाघ ह्यांनी सांगितले... सदर पक्षी परीक्षण बॉम्बे नेचुरल हिस्ट्री सोसायटी ह्यांच्या विनंतीने करण्यात आले. सदर पक्षी परीक्षण डॉ.श्रीवास्तव,उपवंसरक्षकआणि शास्त्री ह्यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा वनक्षेत्रपाल अशोक पाटील, पक्षी मित्र प्रा.अशोक वाघ, राजविहिरचे वनपाल एस.आर.देसले, अमोणीचे वनरक्षक एस.एच.साळवे, खर्डीचे वनरक्षक एस.एल.वाघ, कोठारचे वनरक्षक आर.जे.शिरसाठ, रानीपुरचे वनरक्षक बी.एस.जाधव, राणीपुरचे वनपाल आर.बी.चांदणे वाहनचालक गुरव व पत्रकार बांधव यांनी केली.....









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा