Breking News

शुक्रवार, ९ मे, २०१४

भवानी मातेचा दशावतारी उत्सव

तळोदा- स्वातंत्र्यपुर्व काळात समाजातील सर्व स्तरातील लोकांचे एकत्रीकरण व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, नाट्य कथानकातुन समाज प्रबोधन व ज्ञानदान व्हावे,धर्म व संस्कृतीची जाण समाजात जागृत रहावी अशा अनेक उद्दिष्टानी गेल्या दिडशे वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील गांवाच्या मध्यवर्ती असलेल्या बालाजीवाडयातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे मालक वडाळकर कुटुंबीयांनी पूर्वीपासून गावातील सर्व विविध जातीच्या समाजांच्या सहकार्याने महिषासुर मर्दीनी श्री भवानी मातेचा दशावतारी ललित षटरात्री उत्सव प्रतिवर्षी कार्तिकी एकादशी पासून सहा दिवस पर्यन्त सुरु केला या विठठल मंदिरात पंढरपूर प्रमाणेच एकटया पांडुरंगाचीच काळ्यापाषानाची अत्यंत रेखीव व जाज्वल्य अशी प्राचीन मुर्ती असून ती जागृत असल्याचे मानले जाते त्यासोबत मंदिरात पिनलाच्या विठोबा व राही रुखमाईच्या देखण्या मूर्ति व संगमरम्राच्या गणपती व् पार्वतीमातेच्या मूर्ती आहेत सदरच्या पारंपारिक दशावतारी उत्सवासाठी पूर्वीपासून लाकडात कोरलेले मुखवटे म्हणजे उत्कृष्ट कारागिरिचे उत्तम नमूने आहेत
सुमारे 50/60 वर्षापूर्वीपर्यंत रेडिओं, टी.व्हीचा फारसा प्रचार नसल्यामूळ मनोरंजन व करमणुकिबरोबरोच धार्मिक सांस्कृतिक शिक्षण देणा-या हया उत्सवासाठी जवळच्या पंचक्रोशीतुन लोक अवार्जुन गर्दी करत असत पाच दिवस दररोज धार्मिक कथांवर संगीत नाटकाचा बाज चडवुन स्टेजवर सादर केले जात असत महिना दोन महिन्यापासून संगीतरागदारी पदे व संवाद ह्यांचा सराव पात्रांची निवड साहित्यांची जमवाजमव चालत असे तग्लौघात संगीत पदे व नाट्य संवाद कमी झाले आणी फक्त देव असुर ह्यांची प्रतीकात्मक युद्ध एवढ़ेच भाग राहिला परन्तु तो पहाण्यासाठी सुध्दा खुप मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतात ह्या उत्सवात गणपती,शेंदुरासुर, शंखासुर, वराह, नरसिंह, मारुती,त्राटिका, भवानी मातादेवी आणि महिषासुर असे एकुण नऊ लाकडात कोरलेले मुखवटे वापरले जतात सुमारे 150 वर्षापूर्वीच्या करागिरांनी कसब पणा ला लावून तयार केलेले हे सर्वच मुखवटे अत्यंत रेखीव आहेत परंतु त्यातल्या त्यात गणपती नरसिंह ,देवी भवानी माता व महिषासुर हे मुखवटे अतिशय आकर्षक आहेत प्रतिवर्षी कार्तिकी एकाद्शी पासून ह्या उत्सवाला सुरवात होते पहिल्या रात्री 9 ते 10 वा वेळेत गणपती व शेंदुरासुर हे मुखवटे चढवून दोन जण डफडयांच्या तालावर नाच करतात व शेवटी महिषासुराच्या ढालीवर शंखाने आघात करून गणपती त्यांचा वध करतो दस-या रात्री कच्छ (कासव) व मत्स्य (मासा) ह्या विष्णुच्या दोन आवतारांचे सोंग घेउन शंखासुराचा वध केला जातो
तीस-या रात्री वराह अवतार व हिरण्यकक्षप राक्षसाचा वध होतो चवथ्या रात्री पहाटे साडे पांच ते सहा वाजेला नरसिंह अवतार व हिरण्यकक्षप राजा ह्याचे युध्द व राक्षसराजा हिरण्यकक्षप वध आणि त्याच दिवशी रात्री श्रीराम लक्ष्मण व हनुमान अवतार व् त्राटिका वध असा कार्यक्रम होते ह्या उत्सवालातील सर्वात महत्वाचा व सर्व गावक-यांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे सहाव्या दिवशी निघनारी भवानी मातेची शोभायात्रा ह्या दिवशी पहाटे पाच वाजेपासून संपूर्ण दिवस आणि रात्री 11वाजेपर्यंत गावातून घरोघरी मातेची आरती व पूजा केली जाते ठिकठिकाणी भवानी मातेची व् महिषासुराची टक्कर होते व शेवटी बालाजी वाड्यात मातेची व् दैत्यराज महिषासुरंचे युध्द व् टक्कर होउन महिषासुरचा वध होतो, ह्यावेळी भवानी मातेचे रूप परिधान करणारे निरंकार उपवास करुण दिवसभर ठीक ठिकाणी टक्कर घेत असतात. अशाप्रकारे प्रदीर्घ काळापासून चालत आलेला हा उत्सव म्हणजे तळोदे शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा एक सास्कृतिक कार्यक्रम असून बालाजी वाड्यातील श्री विठ्ठल मंदिराचे पुजारी व् मालक वडाळकर कुटुंबियांनी मागील पाच ते सात पिढ्या पासून ह्या कार्यक्रमाचे संयोजन गावातील अनेक लोकांच्या स्वेच्छा सहकार्याने चालु ठेवले आहे ते तसेच चालु राहावे व तळोदे गावाचे हे एक महत्वाचे वैशिष्टे टिकून रहावे यासाठी वडाळकर कुटूबींय गावातील नागरिक प्रयत्नशील आहेत....








जहागीरदार बारगळांची गढी

तळोदा- उत्तरेकडे विस्तीर्ण सातपुडा पर्वताच्या रांगा तर दक्षिणेकडे तापी नदिचे विस्तारलेले पात्र यात वसलेले तळोदे हे शहर. तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतीक, सामाजिक असा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे तळोदे, पहेलवानकीने गाजणारे तळोदे अशी तळोद्याची पहेचान आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तळोदा तालुक्यात राहणार्‍या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. सुरतेची लूट केल्यानंतर शिवछत्रपतींनी तापी नदी किनारी मुक्काम केला होता. ज्या ठिकाणी त्यांचा तळ होता त्या ठिकाणाला तळोदे असे म्हणतात. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात बारगळांची गढी विशेष प्रसिध्द आहे. सन १६६२ मध्ये जहागिरदार भोजराज बारगळ यांनी गढीचे बांधकाम केले. त्यासाठी सात ठिकाणाहुन माती आणण्यात आली. सलग पाच वर्षे बांधकाम सुरु होते. सहा एकर जागेत बारगळांची गढी वसलेली आहे. गढीचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. त्यावरील कोरीव काम अप्रतिम असे आहे. आज ही गढी शेकडो वर्षानंतर ताठ मानेने उभी आहे. तळोदा गाव बारगळ जहागीरदारांना इनाम म्हणून प्राचीनकाळी मिळालेले. त्यामुळे या परिसरावर संस्थानिक बारगळ जहागीरदारांचे वर्चस्व। त्यामुळेच संस्थानिक राणा मानसिंग यानी शिवाजी बारगळ यांचे पुत्र भोजराज याना तळोदे हे गाव इनाम दिले. कालांतराने बारगळ व संस्थानिकात वाद निर्माण झाले. त्यांचे पर्यावसान युद्धात होऊन बारगळानी पूर्ण संस्थान काबिज केले.
पुढे समजोता होऊन हे संस्थान परत करण्यात आले व लढाईच्या खर्च्याबद्दल बारगळाना तळोदा गावाची हद्द वाढवून मीळाली. राणानी बारगळाच्या पत्नीस बहिन मानले व या नात्याने दोन्ही घरातच कायमस्वरूपी स्नेहभाव निर्माण झाला. तळोदा शहरात श्रीमंत बारगळ जहागीरदारांची वैभावाची साक्ष असून प्राचीन गढ़ी आहे. या गढीचा काही भागाच्या आता पड़झड झाली असली तरी काही बांधकाम अजूनही शाबूत आहे. भोजराज बारगळ यानी 1962 मधे या ऐतिहासिक वास्तुच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे त्यांचे पुत्र नारायणराव बारगळ यांनी गढीच्या कमानी दरवाजा बांधला. सुमारे सहा एकर परिसरात या ऐतिहासिक गढीचे बांधकाम झाले असुन हे बांधकाम पाच वर्ष चालले. बारगळ जहागीरदारांच्या घराण्यातील त्यांचे वंशज सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अमरजीतराव शिवाजीराव बारगळ व त्यांचे इतर आप्तेष्ट आजही या ऐतिहासिक गढीत राहतात. १९५२ पर्यंत तळोदयाचे प्रशासन हे बारगळ जहागीरदार यांच्या नियंत्रणाखाली चालायचे. जहागीरदार व गावाचे कामकाज चालवीण्यासाठी एक दिवाण सहा कारकुन असायचे. त्यापैकी दोन कारकुन हे त्यांच्या खाजगी कारभार पहायचे तर चार कारकुन जहागीरदारीचे कामकाज, हिशेब, वसुलीचे काम पहायचे. शिवाय बाहेरच्या प्रशासकीय कामासाठी दोन पाटील होते. मुलकी पाटिल पोलीस पाटील ही दोन्ही पदे त्या वेळी होती.
मुलकी पाटलाचे पाच वतनदार घराणे होते. मगन गनपत पाटील, गोविंद कडवा पाटील याप्रमाणे. प्रत्येक पाटीलला २७ एकर जमीन त्या वेळी उत्पनासाठी मीळायची. शिवाय ज़माबंदी दरबारात मुलकी पाटलाला ६९ रुपये १० आणे फेटा, पागोटे, उपरणे, पान-सुपारीचा मान मीळायचा. पोलीस पाटलाला वर्षाला ५७ रुपये ६ आणे फेटा पागोटे, उपरणे, वेताची काठी हां मान मीळायचा. याशिवाय 16 मील कामदार, वनदार (जागले), चार महार कामदार, एक कोळी कामदार वतनदार होते. या कामदारानाही त्यांचा कामापोटी वतन दिले जायचे. येथील हल्लीचे बारगळ जहागीरदार अमरजीतराव बारगळ यांचे पणजोबा कृष्णराव आनंदराव बारगळ आजोबा शंकरराव कृष्णराव बारगळ यांच्या पीढ़ीपर्यंत दि: १-८-१९५३ पर्यंतताळोद्यात ही प्रशासन यंत्रणा बारगळ जहागीरदारांकडे सुरु होती. त्यानंतर ताळोद्यात शासकीय कारभार इनाम अँबाँक्युशन अँक्ट आला व शासनाकडे कारभार आला त्यानंतर तळोदयात शासकीय कारभार सुरु झाला. सन १८६७ चा गँझेतेड रिपोर्ट व बारगळ जहागीरदार संस्थानचे जुने ऐतिहासिक दस्तावेज व कागदपत्राच्या नोंदीत या प्रशासकीय प्रणालीचा उल्लेख आहे.

कनकेश्वर महादेव मंदिर


जागृत देवस्थान कनकेश्वर महादेव मंदिर "जागृत देवस्थान कनकेश्वर महादेव मंदिर" तळोदा शहरापासून सुमारे एक (१) किलो मीटर अंतरावर तलोदा शहादा रस्त्यावर आमलाड़ शिवारात कनकेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. वृक्षानी वेढलेल्या या मंदिरात आलेल्या भाविकांना निसर्गाच्या सानिध्यात परमेश्वराचे चिंतन करण्याचा वेगला आनंद मिळतो. येथील शांतता दर्शनासाठी आलेल्या सर्वानाच आपल्याकडे आकर्षित करते व परमेश्वराच्या नामस्मरनात भाविकांना तल्लीन होण्यास मदत करते.येथील महादेव मंदिर पूर्वमुखी असून गाभाराबाहेर नंदिची सुरेख मूर्ति आहे. या मंदिर परिसरातच गजानन महाराज, अंबिका माता, दत्त गुरु यांचेही मंदिरे आहेत. याच परिसरातपवनसुत हनुमानाचे परिसरातील एकमेव असे पच्छिममुखी मंदिर आहे त्यातील हनुमानाची मूर्ति पाषाणात कोरलेली रेखीव मुर्ती आहे.या सर्व मंदिरांमुळे या महादेव मंदिर परिसराला आगळे वेगळे असणारे कनकेश्वर महादेव मंदिर तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे विविध कार्यक्रमाची रेलचेल असल्यामुळे भाविकांची गर्दी होते. त्यातच पवित्र श्रावण महिन्यात तर भाविकांच्या गर्दिने परिसर फुलून जातो. श्रावण महिन्यातील सोमवारी कनकेश्वर महादेव मंदिर परिसराला भेट देणार्या भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे
.स्वरुप प्राप्त झाले आहे. याच परिसरात प्राचीन विहीर आहे. या विहिरीत उतरन्यासाठी पायरयांची सोय केलेली दिसते. पायऱ्याची विहीर बांधन्याची पद्धत इंन्दोर राजमाता शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील असल्यामुळे ही विहीर व महादेव मंदिर यांच्या काळातील असण्याची शक्यता जानकार व्यक्त करतात. शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी गावोगावी मंदिरे बांधन्यासाठी त्या काळात मदत देखिल केली होती. त्यातच त्या काळात तलोदा देखील बारगळ जहाग़ीरदरांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे या मंदिराच्या उभारनीत देखिल अहिल्याबाई होळकरानी मदत केली असावी अथवा त्या काळातील असावे, असाही अंदाज जानकरानी व्यक्त केला आहे. त्यामुळे या मंदिराला 200 वर्षाचा इतिहास असल्याचे मत जानकरांनी व्यक्त केले आहे. या मंदिर परिसरात कायम स्वरूपी पत्र्याचा मंडप टाकण्यात आलेला आहे. सुशोभिकरणासाठी फरशी ही बसवण्यात आली आहे. गजानन महाराज मंदिर व मंडप तसेच सर्व कामे दानशुर व्यक्तिनी केलेल्या दानामुळेच करता आल्याचे मंदिराच्या ट्रस्टीनी सांगितले. याच मंदिर परिसरात अनेक धर्मिक कार्यक्रम पार पडत असतात.1993 पासून येथे दरवर्षी श्रीमद भागवत छाया सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. विविध धार्मिक कार्यक्रम तसेच लग्न कार्य ही या ठिकानीच पार पडली जातात.
परिसरातील बालगोपाल मंडली या मंदिराला भेट देतात. एकदिवसीय सहलीच्या आनंद घेतात त्या मुले या मंदिर परिसराला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे या आदीवसि पट्ट्यातील महत्वाची यात्रा म्हणजे अश्वथामा यात्रा या यात्रेतील भाविक देखील परतीच्या प्रवासात कनकेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात त्यांची ही अवघड सतपुडयातील दरया खोर्यातील अश्वसथामा यात्रा महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर पूर्ण होत असे , असे सांगितले जाते म्हणून या यात्रेतील भाविकांचे कनकेश्वर मंदिर परिसर विश्रातीचे स्थळ होत असे असे जानकार सांगतात. तलोद्या तालुक्यातील धार्मिक व सांकृतिक कार्यात कनकेश्वर महादेव मंदिर व परिसराला महत्वाचे स्थान आहे. परंतु या मंदिर परीसराकड़े येनार्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. कनकेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या माध्यमातुन या परिसरात विविध सोयी सूविधा पुरविल्या जातात याच परिसरात धर्मशाला देखील आजही आपले असतीत्व टिकून आहेत येनार्यांची सोय या ठिकाणी केली जाते सध्या या मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष आमलाड येथील उद्ववभाई प्रल्हादभाई पटेल हे आहेत. त्यांच्या देखरेखे खाली व् सहकारया च्या मदतीने या मंदिर परिसरातील विविध कामे सुरु आहेत व् मंदिराची देखरेख ठेवली जाते.