Breking News

शुक्रवार, ९ मे, २०१४

भवानी मातेचा दशावतारी उत्सव

तळोदा- स्वातंत्र्यपुर्व काळात समाजातील सर्व स्तरातील लोकांचे एकत्रीकरण व्हावे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, नाट्य कथानकातुन समाज प्रबोधन व ज्ञानदान व्हावे,धर्म व संस्कृतीची जाण समाजात जागृत रहावी अशा अनेक उद्दिष्टानी गेल्या दिडशे वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील गांवाच्या मध्यवर्ती असलेल्या बालाजीवाडयातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे मालक वडाळकर कुटुंबीयांनी पूर्वीपासून गावातील सर्व विविध जातीच्या समाजांच्या सहकार्याने महिषासुर मर्दीनी श्री भवानी मातेचा दशावतारी ललित षटरात्री उत्सव प्रतिवर्षी कार्तिकी एकादशी पासून सहा दिवस पर्यन्त सुरु केला या विठठल मंदिरात पंढरपूर प्रमाणेच एकटया पांडुरंगाचीच काळ्यापाषानाची अत्यंत रेखीव व जाज्वल्य अशी प्राचीन मुर्ती असून ती जागृत असल्याचे मानले जाते त्यासोबत मंदिरात पिनलाच्या विठोबा व राही रुखमाईच्या देखण्या मूर्ति व संगमरम्राच्या गणपती व् पार्वतीमातेच्या मूर्ती आहेत सदरच्या पारंपारिक दशावतारी उत्सवासाठी पूर्वीपासून लाकडात कोरलेले मुखवटे म्हणजे उत्कृष्ट कारागिरिचे उत्तम नमूने आहेत
सुमारे 50/60 वर्षापूर्वीपर्यंत रेडिओं, टी.व्हीचा फारसा प्रचार नसल्यामूळ मनोरंजन व करमणुकिबरोबरोच धार्मिक सांस्कृतिक शिक्षण देणा-या हया उत्सवासाठी जवळच्या पंचक्रोशीतुन लोक अवार्जुन गर्दी करत असत पाच दिवस दररोज धार्मिक कथांवर संगीत नाटकाचा बाज चडवुन स्टेजवर सादर केले जात असत महिना दोन महिन्यापासून संगीतरागदारी पदे व संवाद ह्यांचा सराव पात्रांची निवड साहित्यांची जमवाजमव चालत असे तग्लौघात संगीत पदे व नाट्य संवाद कमी झाले आणी फक्त देव असुर ह्यांची प्रतीकात्मक युद्ध एवढ़ेच भाग राहिला परन्तु तो पहाण्यासाठी सुध्दा खुप मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतात ह्या उत्सवात गणपती,शेंदुरासुर, शंखासुर, वराह, नरसिंह, मारुती,त्राटिका, भवानी मातादेवी आणि महिषासुर असे एकुण नऊ लाकडात कोरलेले मुखवटे वापरले जतात सुमारे 150 वर्षापूर्वीच्या करागिरांनी कसब पणा ला लावून तयार केलेले हे सर्वच मुखवटे अत्यंत रेखीव आहेत परंतु त्यातल्या त्यात गणपती नरसिंह ,देवी भवानी माता व महिषासुर हे मुखवटे अतिशय आकर्षक आहेत प्रतिवर्षी कार्तिकी एकाद्शी पासून ह्या उत्सवाला सुरवात होते पहिल्या रात्री 9 ते 10 वा वेळेत गणपती व शेंदुरासुर हे मुखवटे चढवून दोन जण डफडयांच्या तालावर नाच करतात व शेवटी महिषासुराच्या ढालीवर शंखाने आघात करून गणपती त्यांचा वध करतो दस-या रात्री कच्छ (कासव) व मत्स्य (मासा) ह्या विष्णुच्या दोन आवतारांचे सोंग घेउन शंखासुराचा वध केला जातो
तीस-या रात्री वराह अवतार व हिरण्यकक्षप राक्षसाचा वध होतो चवथ्या रात्री पहाटे साडे पांच ते सहा वाजेला नरसिंह अवतार व हिरण्यकक्षप राजा ह्याचे युध्द व राक्षसराजा हिरण्यकक्षप वध आणि त्याच दिवशी रात्री श्रीराम लक्ष्मण व हनुमान अवतार व् त्राटिका वध असा कार्यक्रम होते ह्या उत्सवालातील सर्वात महत्वाचा व सर्व गावक-यांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे सहाव्या दिवशी निघनारी भवानी मातेची शोभायात्रा ह्या दिवशी पहाटे पाच वाजेपासून संपूर्ण दिवस आणि रात्री 11वाजेपर्यंत गावातून घरोघरी मातेची आरती व पूजा केली जाते ठिकठिकाणी भवानी मातेची व् महिषासुराची टक्कर होते व शेवटी बालाजी वाड्यात मातेची व् दैत्यराज महिषासुरंचे युध्द व् टक्कर होउन महिषासुरचा वध होतो, ह्यावेळी भवानी मातेचे रूप परिधान करणारे निरंकार उपवास करुण दिवसभर ठीक ठिकाणी टक्कर घेत असतात. अशाप्रकारे प्रदीर्घ काळापासून चालत आलेला हा उत्सव म्हणजे तळोदे शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा एक सास्कृतिक कार्यक्रम असून बालाजी वाड्यातील श्री विठ्ठल मंदिराचे पुजारी व् मालक वडाळकर कुटुंबियांनी मागील पाच ते सात पिढ्या पासून ह्या कार्यक्रमाचे संयोजन गावातील अनेक लोकांच्या स्वेच्छा सहकार्याने चालु ठेवले आहे ते तसेच चालु राहावे व तळोदे गावाचे हे एक महत्वाचे वैशिष्टे टिकून रहावे यासाठी वडाळकर कुटूबींय गावातील नागरिक प्रयत्नशील आहेत....








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा