
सातपुडयाच्या पर्वतरांगा उंच उंच डोंगर, खोल द-या पक्षांचा किलबिलाट वटवृक्षांच्या वेलीचे झोके हिंस्त्र प्राण्यांचा वावर नागमोडी रस्ते, हिरवा शालु कौलारू घराचे दर्शन फेसाळणा-या धबधब्याचे पर्यटकांना आकर्षण पावसाळा म्हटला म्हणजे निसर्गप्रेमीसाठी एक पर्वनीच असते. पावसाळयात निसर्गाला वेगळाच बहार येतो. डोंगरद-यांमधुन वाहणारे पाणी, सातपुडयाच्या पर्वतरांगांमधील विविध पक्षांची किलबिल मनाचे पारणे फेडत. डोंगर कपा-यातुन कोसळणारे धबधबे पर्यटकांना साद घालु लागतात. अश्यापैकी एक म्हणजे तलोदा तालुक्यातील वाल्हेरी येथील धबधबा आहे. दरवर्षी पावसाळयात सातपुडयाच्या पर्वत रांगेत जोरदार पर्जन्यवृष्टी होते. उंचावरुण कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी गुजरात, महाराष्ट्रासह सिमेलगत असलेल्या गावातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात. महाविद्यालयीन तरुण- तरुणी यांच्यासह प्रेमीयुगलांसाठी येथील निसर्गरम्य वातावरण म्हणजे त्यांच्या स्वप्नातील स्वर्गच आहे. धबधबा म्हणजे निसर्गाचा चमत्कार.

वाल्हेरी गावात प्रवेश केल्यानंतर सर्वात
पहीले आकर्षण असते ते पारंपारीक कौलारु घरेधबधब्याकड़े जाण्यापुर्वीच रस्त्यावर असलेले एक विशालकाय वेली असलेले वटवृक्ष. यावर परिसरातील लहान मंडळी झोका खेळताना दिसतात. पर्यटकांना या झोक्याचे मोह आवरेनासे होते. गावात व परिसरात मोरांसह विविध पक्ष्यांचे वास्तव्य आहे.परिसरात विविध जंगली प्राणी ज्यात वाघ, अस्वल देखील आढ़ळतात. गावातुन धबधब्याकडे जाताना नदीच्या किनारी वाल्हेरी मातेचे मंदीर लागते. पारंपारिक कौलारू छते असलेले घरे

थुई थुई नाचणारा मोर
गुराखी गुरांना विविध आवाज काढुन मनोरंजन करतो. नागमोडी वळण संपल्यानंतर काहीअंतरावरच शुभ्र फेसाळलेले दोन धबधबे नजरेस येतात. त्यातुन उंच व मोठ्या धबधब्याकड़े जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. 50 फूटापेक्षा अधिक उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी आलेला पर्यटक धबधब्याच्या काही अंतरावर असलेल्या जागेवर किंवा धबधब्यावरील परिसरात चुल पेटवण्यासाठी इंधन गोळा करतात
गुराखी गुरांना विविध आवाज काढुन मनोरंजन करतो. नागमोडी वळण संपल्यानंतर काहीअंतरावरच शुभ्र फेसाळलेले दोन धबधबे नजरेस येतात. त्यातुन उंच व मोठ्या धबधब्याकड़े जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. 50 फूटापेक्षा अधिक उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी आलेला पर्यटक धबधब्याच्या काही अंतरावर असलेल्या जागेवर किंवा धबधब्यावरील परिसरात चुल पेटवण्यासाठी इंधन गोळा करतात

धबधब्यावरुण पडणारे पाणी त्या पाण्यावरुण ठिबकणारे पाण्याचे थेंब पाहुण पर्यटक अचंबीत होतात. दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात राहुन पुढील वर्षाचे नियोजन करुण सायंकाळी गावाकडे परततात. दरवर्षी पावसाळयात या धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी शहरी भागातील पर्यटकांची विशेषत: गर्दी असते. या नैसर्गिक सौंदर्याचे जतन होण्याची नितांत आवश्यकता आहे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा