Breking News

रविवार, २७ जुलै, २०१४

भटकंती

भ्रमंती 

सकाळी सकाळी मोबाईल बोंबलला नियमित रोजच्या वेळेवर आजही उठलो. आज तसा वार शनिवार, शाळेत जावुन ड्युटी बजावणे महत्वाचे होते.मात्र दिवस ढगानी भरगच्च भरलेला होता. व त्या ढगाचा परिणाम माझ्या वर ही झाला होता. माझा ही दिवस आकाशात भर गच्च भरलेल्या ढगा प्रमाणेच, माझा आजचा दिवस भरगच्च भरुनच उजाडला. मन कासावीस झाले होते. जुन्या आठवणी सतावत होत्या, मित्र, प्रेम, जुन्या आठवणी   ह्यातुन  मन बैचेन झाले होते, काही काम हाती घेवुन योग्य मार्गावर लागेल असे वाटत नव्हते. नेमके काय करावे ते सुचत नव्हते. त्यातुन मनात एक विचार आला. आज शाळेत न जाता मित्रा सोबत भटकंतीला जावे. व त्या विचाराने मी दिवसाची सुरवात केली. त्यातच एका मित्राने whatsapp वर
 (टाकली) येथील फोटो असतील तर पाठव असा
 message केला. टाकली हे नावाच प्रथमदा ऐकत होतो. मी टाकली बद्दल माहिती मिळवन्याचा प्रयत्न केला. तेथे सुंदर धबधबे असल्याची माहिती एका मित्राने दिली. तलोदा परिसरातील प्रतापपुर गावापासून 8 ते 10 km अंतरावर टाकली गाव आहे. जे सातपुड्याच्या पायथ्याशी असुन गावालगत सुंदरशी नदी वाहते उंचीवरून कोसळणारे धबधबे मनाला मोहित करतात अशी माहिती मित्राने दिली. मनात ह्या परिसराला भेट देण्याची उत्सुकता अजुन तीव्र झाली. एका बालमित्राला सारंग शेंडे ह्याला रिंग केली. व ह्या परिसराबातीत अधिक माहिती मिळवण्यास सांगितली. (सारंग शेंडे हां प्रतापपुर शाळेत शिक्षक आहे.) व तु घरी न येता आम्ही तुला बाईक वर पिकउप करतो अशी सुचना केली. तो ही तयार झाला. त्यानंतर इतर मित्रांच्या भेटी घेवुन त्यांना वेळेवर निसर्गरम्य परिसराच्या भटकंती साठी तयार केले. तलोदा महाविद्यालयात एकत्रित व्हायचे असे ठरवले. महाविद्यालयात येवुन जुन्या आठवणी पुन्हा स्मरण होवु लागल्या. आमच्या समोरच मित्र मैत्रिणीचा एक ग्रुप बसला होता. आम्हाला त्याच्यात मिसळावे खिद्खिद्त मौज मस्ती करावे. क्लासला जावुन बसुन मागे बसुन कुणाला तरी चीडवणे शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देणे. मात्र आता ह्या पासुन आम्ही वंचित आहोत अशी जागरूकता लगेचच आम्हला
आली. मी माझ्या सोबत माझा बेस्ट फ्रेंड राठोड, लक्ष्मण गुरव, मनोज गुरव, विक्की गुरव आदी मित्रांसोबत दुपारच्या वेळी राणीपुर गाठले. तेथे पोहचल्या नंतर निराशाच हाती आली. टाकली ह्या गावात नदी व तलावा शिवाय पाहण्या सारखे काहीच नसल्याची माहिती स्थानिक रहवाशीनी दिली. आम्ही निराश झालो वापस घराकड़े पलायन करावे की त्या परिसराकड़े, अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली. मात्र मी ठाम निर्णय घेतला होता आजचा दिवस मित्रांसोबत घालवायचा म्हणुन, आम्ही सर्वानी आमच्या आवडत्या क्षेत्राला पुन्हा भेट द्यावी. सर्वच राज़ी झाले. राणीपुरहुन कुंडलेश्वर हे श्रधास्थान 17 km असल्याची माहिती स्थानिकानी दिली. त्यातच रस्त्यावरच वाल्हेरी हे गाव लागणार होते. आम्हाला ह्याची खुप उत्सुकता लागली. आम्ही जलोश्यात बाईक हाकत व मौज करत प्रवासाला निघालो. आजुबाजुला उंच उंच डोंगर, मधुन जाणारा लांब सडक नागमोडी रस्ता, परिसरात शेतात काम करणारे शेतकरी बांधव त्यातच गुरे चारणारा गुराखी, निसर्ग रम्य वातावरण पाहुन मन खुपच खुश झाले.
काही अंतरावर गेल्यावर पावसाच्या हलक्या सरी कोसऴु लागल्या, सोबत ना तर छत्री नाही रेनकोट, मोटारसाईकलचा वेग वाढवत एखादया झाड़ा खाली थांबावे म्हणुन झाडाच्या शोध घेत बाईक जोराने हाकत होतो. त्यातच रस्त्याचा शेजारी एका शेतात एक छोटीशी पारंपारीक स्वरुपाची कौलारू झोपडी नजरेसमोर आली. सर्वानी मोटार साईकल लावुन त्या झोपडी कड़े धाव घेतली व झोपडीत शिरून स्वताला पावसापासुन वाचवले. त्या झोपडीत दोन लहान चिमुरडी जेवण करत होती. ते खुप ग़रीब व गरजाळु दिसत होती. त्यानी आम्हाला जेवणाचे आमत्रण दिले व आग्रह करू लागले. व कृतज्ञता दाखवत आम्हाला एक भाकर बांधुन दिली. एवढ्या लहान चिमुरड्याना ह्या गोष्टीची समज कशी त्याना आमची भुक कळली कसी ? हे आश्चर्यच होते. असो आमचा परिसरातील आदिवासी बांधव प्रेमळ व मदतीला हात देणारे असल्याचे नेहमी ऐकुन होतो मात्र ह्या उदाहरणातून त्याची प्रचीती आम्हाला आली. त्यानंतर राणीपुर, अमोनी मार्गे आम्ही वाल्हेरी गाठली. वाल्हेरी गावात शिरल्यावर विविध पक्षांची किलबिलाट कानी येवु लागली. पारंपारीक कौलारू घरे पाहुन मन प्रफुलित झाले. गावातुन धबधब्याकड़े जाताना नदीच्या किनारी असलेले वाल्हेरी मातेच्या मंदिराचे दर्शन घेतले.
मंदिराच्या परिसरात विविध रंगाची फुले व वनस्पती लावल्याने परीसर अतिशय शोभुन दिसत होता. सर्वत्र शांत वातावरण होते. आम्ही पुढे धबधब्याकड़े जाण्याकरीता निघालो रस्त्याच्या आजुबाजुला असलेल्या टेकडयानी जनु हिरवा शालुच परिधान केलेला होता. नागमोडी रस्त्याने जात असताना विविध पक्षांचा किलबिलाट त्यात कोकिळाचे मधुर सुर कानी येत होते. जवळच वाहणा-या नदीचा प्रवाहाचा आवाज व पक्षाची किलबिलाट जनु आमचे स्वागतच करत होते. नागमोळी वळण संपल्यानंतर काही अंतरावरुनच शुभ्र फेसाळनारे नयनसुख देणारे दोन शुभ्र दुधाळ धबधब्यानी आम्हाला आकर्षित केले. उंचीवरून वाहणारा धबधब्याकड़े लवकरात लवकर पोहचावे अशी आमच्या मित्र परिवारात शर्यतच लागली. विविध गाणी म्हणत धबधब्याचे तुषार आम्ही आनंदाने अंगावर घेत आनंद व्यक्त केला. व तेथुन पुढील मार्गावर निघालो. पोटात आता काहुर माजले होते. एक भाकर आणी सहा पोट समीकरण जुळत नव्हते. आम्हाला भुक लागली होती. वाल्हेरी गावातुंनच चिकन व लागणारा काही सामानाची खरेदी केली.
व मोटारसाईकलला किक मारत आम्ही कुंडलेश्वरच्या मार्गाला निघालो. आमच्याकड़े खाण्यासाठी अन्न होते. मात्र बनवण्यासाठी साधन सामग्री नसल्याने आमची फजीती होणार होती.हे ही तेवढेच निश्चित होते. मात्र राठोड ह्यांचे जीजाजी इच्छागव्हान येथे जि.प. शालेत मुख्याध्यापक असल्याने आमचा प्रश्न सुटला. आम्ही इच्छागव्हान येथुन स्वयंपाकासाठी लागणा-या आवश्यक त्या वस्तु एका आदिवासी महिला कडून मीळवल्या व त्यानंतर आम्ही कुंडलेश्वर मार्गावर निघालो. तेथे पोहचल्यावर आम्ही शासकीय विश्रामगृह गाठले. व बाहेरच चुल मांडली. व फ़िल्मी गाने म्हणत चिकन पुलाव तयार केला. विश्रामगृहाच्या परिसरात निसर्गरम्य वातावरणात आम्ही तो चिकन पुलाव फस्त केला. व राठोडचे आभार मानले. कारण हां चवदार चिकन पुलाव त्यानीच बनवला होता. नंतर आम्ही खालच्या दिशेला असणारे श्री क्षेत्र कुंडलेश्वर महादेव मंदिर येथे गेलो हे मंदीर 500 वर्ष पुरातन मंदिर असल्याचे सांगीतले जाते. मंदिर उंच टेकडीवर आहे मंदिराच्या पायथ्याशी बारमाही नदी वाहत असून नदीजवळ दोन गरम पाण्याचे नैसर्गीक कुंड आहेत. या तिर्थक्षेत्रावर मकरसंक्रातीला यात्रा भरत असल्याची माहिती देखील आलेल्या काही पर्यटकानी दिली. दहा- बारा वर्षापूर्वी राम नाम प्रचारक प.पू.संत तारादासजी बापू यांनी या तीर्थक्षेत्री मौनव्रताचा कार्यक्रम केला होता त्यावेळी भाविकांनी या महादेव मंदिराजवळ व पायथ्याशी उंच टेकड़े खोदून भव्य असे पटांगण तयार केले.
मंदिराच्या पटांगणावर कौलारू आश्रम तयार करण्यात आले. जेणेकरुण रात्रभर येथे मुक्काम करता येइल, कालांतराने येथे विजेची सोयही करण्यात आली आहे. उंच टेकड्यावरील महादेव मंदिरात जाण्यासाठी भाविकांनी पाय-याहि तयार केल्या आहेत. तसेच आता उपलब्ध झालेल्या निधीतुन तेथे मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आली आहे. ह्या परिसरात गुप्त गंगा असल्याची माहिती देखील आमच्या कानी आली. आम्हाला ह्या बद्दल जानुन घ्यावयाची उत्सुकता वाटली. व ती आम्ही जानुन घेतली. गुप्त गंगा---- महादेव मंदिराजवळच निसर्गाच्या वनराईतुन पाणी येत असून त्याचा वापर भाविक पिण्याच्या पाण्यासाठी करीत असल्याने त्याला गुप्तगंगा असे म्हटले जाते. तर तेथुन वाहणा-या गरम पाण्याचा झ-यानी आम्हाला विचार करायला लावले. गरम पाण्याचा झरा-- मंदिर पायथ्याशी नदी वाहत असून ती बारमाही चलते या नदीजवळच गरम पाण्याचे दोन नैसर्गिक झरे आहेत या दोन्ही झरयांभोवती भाविकांनी आंघोळीसाठी कुंड बनविले असून असे म्हटले जाते की याठिकाणी गंधकाचा साठा असल्याने गरम पाणी बाहेर येते
या ठिकाणी मकर संक्रातीच्या दिवशी यात्रा भरत असल्याने भाविक रात्रीपासुन गरम पाण्याचा कुंडात अंघोलीसाठी गर्दी करतात भाविका आंघोळ करून उंच टेकड्यावरील महादेवाचे दर्शन घेतात याठिकाणी संत तारादासजी महाराज यांच्या सान्निध्यात मकरसंक्रांत महोत्सवाचे, गुरुपोर्णिमा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आसल्याने या क्षेत्रावर भाविकांची वर्दळ नेहमी पेक्षा वाढली आहे. तसेच शाळा महाविध्यालयांचा शैक्षणिक सहली या तीर्थक्षेत्रावर येऊन निसर्गाचा आनंद घेतात या पुरातन महादेव मंदिरात भाविक श्रद्धेपोटी नवस फेड्तात व काही भाविकातर्फे भंडाराचा कार्यक्रमाचे आयोजन करतात या तीर्थक्षेत्रावर श्रावण महिन्यात भाविक व् शालेय विद्यार्थी हजेरी लावतात या तिर्थक्षेत्र कुंडलेश्वर या धार्मिक क्षेत्राला प्राचीन वारसा लाभलेला आहे. अशी माहिती देखील स्थानीक देखरेख करणार्या राजु महाराजानी दिली
.... खुप दिवसानंतर मित्रान सोबत भटकंतीला आलो होतो. मात्र ही भटकंती आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली. ...... व आम्ही साठवुन ठेवलेली एक आठवण आपणास ही आपल्या आठवणी साठवण्या करिता व आठवण्या करिता ब्लॉगवर सादर केली आहे......
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा