मृत्युला चुना लावणारे, राजुभाई पानवाल
जिवंत परत येणार नाही असे असतांना सुद्धा सतत 33 दिवस मृत्युशी झुंज देत.. साक्षात यमाला चुना लावत तळोदा शहरातील एक पानवाला सुखरूप जिवंत घरी
परतल्याची घटना घडली आहे. राजेशभाई एकनाथ बारोट असे त्याचे नांव् असुन राजुभाई पानवाला म्हणुन ते तळोदा शहरासह तालुक्यात प्रसिद्ध आहेत. देव तारी त्याला कोण मारी ? ही म्हण त्यांच्या बाबतीत अक्षरश: खरी ठरली आहे. एकेदिवशी अचानक त्यांना घरी चक्कर आल्यामुळे ते आजारी पडले. त्यानंतर त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर डॉ.राजेश वसावे ह्यानी औषधोपचार केले. तरी सुद्धा त्यांच्या तब्येतीत फरक दिसु न लागल्याने. नंदुरबार येथील डॉ.रोशन भंडारी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. करण्यात आले. नंदुरबार येथे आल्यानंतर राजेशभाई बारोट हे अचानक कोम्यात गेले. तेथे त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांची रवानगी धुळे येथे करण्यात आली. तेथेही डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीपुढे हात टाकले. त्यामुळे आता त्यांचे काही खरे नाही असे वाटत असतांना नातेवाईक व त्यांच्या
मित्रांच्या आग्रहाखातर राजुभाईना बडोदा येथे नेण्यात आले. तेथील रुग्णालयात ते 33 दिवस कोम्यात होते. त्यावेळी डॉक्टरांनी निदान केले. की त्याना ब्रेन हेम्रेज झालेला आहे. त्यामुळे ते आता वाचतील याची गँरंटी नाही. असा ईशारा वैद्कीय सुत्रानी दिल्यामुळे त्यांचा आता देवच मालीक राहिला होता. त्यांच्या ताबेतीसाठी कुटुंबीय, नातलाग, मित्र, हितचिंतक यानी सर्व देवाना आपापल्या परीने साकळे घातले होते. या दवा अन दुवाचा असर राजुभाई यांच्यावर अखेर झाला. ते हळुहळु बरे होवु लागले. आणि अक्षरश: मृत्युच्या दारातुन ते परत आले. या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसेना. परंतु राजुभाई मृत्युशी दोन हात करत बरे झाले आहेत. हे सत्य आहे. त्यांच्यावर बडोदा येथील डॉ.मेघा, डॉ.देवांशी, डॉ. जिग्नेशा यानी मोठ्या परीश्रमाने स्वत:चे वैद्कीय ज्ञान अनुभवाचा कसोटीवर घासुन उपचार केले. डॉक्टर देव असतो हे म्हणणे या वैद्कांनी खरे ठरविले. राजुभाईच्या या संकट काळात त्यांचे मोठे बंधु राजु बारोट, किशोर बारोट, व मित्र परिवार सुरज माळी, पृथ्वीराज राजपुत, अजय सोनवणे, सादिक शेख़, ह्या मित्रांची साथ लाभली. राजुभाई हे मनसेचे पदाधिकारी असुन त्यांनी सन २०१२ च्या तळोदा न.पा. निवडणुकीत उमेदवारी केली होती. सध्या ते मनसे तालुका सचिव या पदावर आहेत. राजुभाईच्या या आजाराची कहानी लोकांना कळताच लोक त्याना भेटायला मोठ्या संखेने येवु लागली. तलोदा तालुका मराठी पत्रकार संघाने देखील त्यांची सदिच्छा भेट दिली....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा