Breking News

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

कुंडलेश्वर शबरीधाम

गरम पाण्याचे झरे अन थुई थुई 
नाचणारा मोर कुंडलेश्वर परिसर देतो मनाला शांती

सातपुडयाच्या पायथ्याशी निसर्गाच्या वनराईत उंच टेकडयांवर वाहणारे गरम पाण्याचे झरे आणि त्याच परिसरात थुई थुई नाचणारा मोर पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेड़ते. तळोदा तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील कुंडलेश्वर शबरीधाम महादेव मंदीर हे पाचशे वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर असुन याठीकानी नेहमी भाविकांची गर्दी असते. नवसाला पावणारा व मनाला शांती देणारा महादेव असल्याची ख्व्याती येथे प्राप्त झाली आहे. त्यामुळे आदिवासी उपायोजनेंतर्गत वनपर्यटक विकास निधीतुन निसर्गरम्य पर्यटन स्थळाची विकास कामे याठिकाणी करण्यात आली आहेत. तळोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र कुंडलेश्वर शबरीधाम महादेव पाचशे वर्षापुर्वीचे पुरातन मंदिर आहे. मंदिर उंच। टेकडीवर असुन सातपुडयाच्या रांगेतुन एक नदी बारमाही वाहते. या नदीजवळ दोन गरम पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. या। झ-यांच्या पाण्यात अंघोळ केल्याने त्वाचारोग बरा होत असल्याची भावना आहे. या तीर्थक्षेत्रावर मकरसंक्रांतीला मोठी
यात्रा भरते. १५ वर्षापुर्वी याठिकाणी संत तारादास बापुंनी मौनवरद घेतले. यावेळी भाविकांनी या मंदिराच्या पायथ्याशी टेकडी खोदुन भव्य असे पटागन तयार केले आहे. मंदिराच्या पटागंनावर कौलारु आश्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. याठीकानी भाविकांना मुक्काम करण्याची सोय झाली आहे. महादेव मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात सातपुडयाच्या पर्वत रांगांमधुन पाणी वाहते. या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. त्याला भाविक गुप्तगंगा असे देखील म्हणतात. मंदिराच्या पायथ्यालगत नदीच्या किनारी पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. या पाण्यात गंधकाचे स्त्रोत असल्याने त्वचारोग दुरुस्ती होत असल्याची भावना भाविकांची आहे. मकरसंक्रातीच्या यात्रेला भाविक रात्रीच्या प्रवास करुण या झ-याखाली अंघोळ करतात.
त्यानंतर जागरूत महादेवाचे दर्शन घेवुन निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद लुट्तात. कुंडलेश्वर परिसराला पर्यटनाचा दर्जा लाभल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी ओसाडु लागली आहे. शाळा, महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलीसह निसर्गप्रेमी येथे भेट देतात. त्यामुळे याठिकाणी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे। आहे. भाविकांसाठी भक्त निवास, महिलांसाठी स्वतंत्र प्रासधनगृह बांधन्याची गरज आहे. श्रीक्षेत्राकड़े जाण्यासाठी अर्धा km अंतराच्या कच्चा रस्त्याने प्रवास करावा लागतो. पारंपारीक कौलारू घरे मनमोहित करतात. कुंडलेश्वरला पोह्चताच त्याठिकाणी असलेले मोर आपल्या नृत्यात दंग असल्याचे दिसून येते. याठिकाणी वनविभागाने विश्रामगृह उभारली आहे.
तर अद्यावत निसर्ग पर्यटन कुटीची निर्मिती करण्यात आली आहे. निसर्गाच्या आनंद लुट्ण्यासाठी निसर्गप्रेमी, पर्यटक नेहमीच याठीकाणी गर्दी करतात. त्यामुळे परिस्रालाक यात्रेचे स्वरुप प्राप्त होते. बदलत्या काळानुसार श्रीक्षेत्र कुंडलेश्वराचे पारंपारिक रूप बदलत। आहे. या धार्मिक स्थळाचे जतन करणे गरजेचे आहे.














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा