Breking News

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

बुधावल येथील श्री गणेश मंदिर

तळोदा तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणुन सर्वदुर ख्व्याती असलेले बुधावल येथील श्री गणेश मंदिर
भाविकांचे श्रध्दा स्थान आहे या गणेशाच्या मंदिरामुळे या गावाला गणेश बुधावल म्हणुन प्रसीद्धी
मिळाली आहे या मंदिराचा तब्बल 250 वर्षाचा इतिहास् आहे. गणेश उत्सवा निमित्त येथे भाविकांची गर्दी उसाळत असते. तळोदा राजवीहीर रस्त्या वर तळोदा शहरा पासून सुमारे चार किलो मीटर अंतरावर असलेले बुधावल गाव तेथील प्राचीन गणेश मंदिर विशेष प्रसिद्ध आहे या मंदिराच्या परिसरात असलेली प्राचीन विहीर मंदिराचा इतिहास 200 वर्षा पुर्वी पेक्षाही जास्त असल्याची साक्ष देते येथे कमानी असलेली प्राचीन पाय विहीर आहे या विहिरिला लागुनच गणेशाचे मंदिर होते परंतु या मंदिराचा भींतिची धुप झाल्याने मंदिर पडण्याच्या मार्गावर होते त्यामुले येथील भाविकांनी 1960 -61 मध्ये हे प्राचीन मंदिर पाडले त्या नंतर 1961 मध्ये छोटेसे मंदिर बांधण्यात आले याच मंदिराच्या अवती भोवती 1986-87 मध्ये पत्र्याचे शेड उभारण्यात आले 2007 मध्ये सिमेंट कांक्रीट चे मंदिर बांधण्याच्या निर्णय घेण्यात आला व भाविकांनी दिलेल्या देणगीतुन या मंदिराच्या उभारनिचे काम सुरु असल्याचे येथील कामकाज पाहणारयां भाविक सांगितात पूर्वमुखी मंदिरातील गणेशाची मूर्ति सुंदर रेखीव व आकर्षक असून एकाच कला पाशानातील आहे या मूर्तीला चढ़वन्यात आलेल्या सेंदुरामुळे तिचे तेज अधिकच खुलुन दिसते . या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी लांबचे भाविक या ठिकाणी येतात. श्रावण महिन्यात सत्यनारायनाची महापूजा तसेच चतुर्थिला येथे भाविकांची गर्दी होते. परिसरात असलेले वडा चे झाड भाविकांना शीतल छाया देण्यात व लीन होण्यास मदत करते. मंदिर परिसरात 1963 पासून गुढीपाढव्याला मोठी यात्रा ही भरते.
या मंदिराचे बांधकाम व परिसरातील कामे भाविकांनी दिलेल्या देणगीतूंनच पूर्ण केले जात असल्याचे सागण्यात आले . येथे येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी खुर्च्या वेलदा येथील पटेल कुटुंबीय व तलोदा येथील जगन्नाथ एकनाथ माळी यानी बसविल्या आहेत. तसेच मंदिराचे बांध काम अजुनही अपूर्ण अवस्थेत असल्याने भाविक व देंणगी दारानी अधीकाधीक देणगी द्यावी , अशी अपेक्षा येथील देखरेख करनारे भाविक व्यक्त करतात. पर्यटनाच्या दृष्टीनेही येथील मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटन विभागाकडूनही येथील मंदिर विकासाकडे लक्ष देण्याची अपेक्षा भाविकानी व्यक्त केलि आहे. या मंदिर परिसरात असलेली प्राचीन विहीर जुन्या बांधकाम शैलिची आठवण करुण देणारी आहे. या विहिरीत उतरन्या करीता पायवाट असून पायर्यावर तीन ठिकाणी तीन व दोन व एक अश्या कमानी आहेत. याच विहिरिचे पाणी पिउन 1971-72 व 1984-85 च्या दुषकाळी काळात परिसरातील जनतेचे हाल थांबले होते.
या विहिरीत आजही पाणी असल्याने श्री गणेशा मुलेच पाणी टिकून असल्याची भावना परिसरातील नागरिकांची आहे.या प्राचीन गणेशाच्या मंदिराची देखरेख कोमा नेहरु वळवी यांच्या कुटुंबाकडे आहे. येथील धार्मिक विधी ते पार पाडतात तसेच येथील भाविक सूर्या केमन्या पाडवी, विजय वेजू वळवी, शिवाजी वेरत्या वसावे, मनोज श्रीराम कर्नकार, जीवन दत्तु पवार, सुनील गोपाळ पाटिल यांच्या सह कार्याने सुख सोयी पुरविल्या जातात. आजपर्यंत भाविकानी दिलेल्या देणगीतुनच मंदिराची उभारनी होत आली आहे. परंतू अपूर्ण अवस्थेतील काम पूर्ण होण्यासाठी देनगीदार व भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोमा वळव़ी यानी केले आहे. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा, अशी ख्व्याती असलेल्या या गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. भाविकांच्या 'गणपती बाप्पा मोरया' च्या जय घोषाने येथील परिसरात चैतन्य पसरलेले असते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा