तालुक्यातील वाण्याविहीर येथे शेतात दुर्मीळ कासव आढळून आल्याने पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत
आहे. पाठीवर नक्षत्राच्या आकाराचे नैसर्गिक आकृत्या असलेले हे कासव दुर्मीळ प्रजातीचे असल्याची माहिती जाणकारांकडून मिळाली आहे. कन्हैयालाल शिवदयाल परदेशी या शेतकर्याच्या शेतमळ्यात राहणार्या रमेश रामदास तडवी यांच्या घराच्या ओट्यावर हे कासव येऊन थांबल्याचे आढळून आले. कासवाच्या पाठीवर दुरून पाहिले असता नक्षत्राच्या आकाराच्या आकृत्या दिसतात. सोनेरी रंगाच्या पाठीवर 'सप्तर्षी' या नक्षत्राप्रमाणे चांदण्यांचे नक्षीकाम करून निसर्गाने या कासवाला वेगळीच ओळख दिली आहे. मात्र जवळ गेले असता एक एक आकृतीचा आकार हा कोळी या किटकासारखा दिसतो. सुमारे तीन किलो वजनाचे हे कासव पाहण्यासाठी अक्कलकुवा परिसरातील नागरिकांची गर्दी उसळली आहे. हे कासव परिसरात उत्सुकतेचा विषय बनले आहे.
■ वाण्याविहीर येथे मिळून आलेले कासव हे 'एशियन स्टार टॉरटॉईज' या प्रकारातील आहे. ही कासवे आठ इंचापेक्षा मोठी असतात. 'समोबेट्स' (Psammobates) प्रजातीच्या या कासवाच्या पाठीवर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आकृत्या निसर्गत:च असतात. भारत, म्यानमार आणि श्रीलंका या तीन देशातील समुद्र किनारे आणि विविध जलस्रोतांमध्ये हे दुर्मीळ जीव आढळून येतात. साधारणत: १00 वर्षांच्या कालावधीनंतर या प्रकारातील कासव जन्माला येण्याची प्रक्रिया घडत असल्याची माहिती आहे. भारतात आढळणार्या 'समोबेट्स' कासवाच्या प्रजाती ह्या प्रामुख्याने वर्षा ऋतूवर जगत असल्याचे 'अमेरिक न वाईल्डलाईफ र्जनल' यात नमूद केले आहे.
वाण्याविहीर येथे आढळून आलेल्या कासवाच्या प्रामुख्याने तीन प्रजाती असल्याची माहिती समजते. हे कासव दुर्मीळ असून भारतात ते साधारणत: दक्षिणेकडील राज्यात सापडते. ज्या शेतकर्याला हे कासव सापडले ते कुठून आले याचा शोध घेतला पाहिजे. सातपुड्यात अशी कासवे असल्याचे अजूनतरी माहिती नाही. पण खरोखरच ते त्या भागात सापडले असेल तर तेथे केवळ एकच कासव नसेल. अनेक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही संशोधन झाले पाहिजे. -प्रा.अशोक वाघ

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा