Breking News

सोमवार, १२ जानेवारी, २०१५

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद 
आजच्या कंप्यूटर युगात मोबाइलमैन बनून गेलेल्या तरुण मिलो दूर संवाद साधतो, पण त्याला स्वतःच्या परिवारात सुसंवाद साधन्याच्या वेळ नाही. आजची युवा पिढी इतरांच्या तालावर नाचने पसंत करते. पण नाचत नाचत स्वताचीच ताल विसरत आहे. ह्या ताल विसरलेल्या बेताल सुरालातर म्हणावेच लागेल ``हात में कंगन कान में बाली मुह में लाली और सर है बिलकुल खाली" ह्या खाली मार्गाला जीवनाची खरी वाट नरेंद्रने दाखवली म्हणजेच स्वामी विवेकानंद दाखवली, तर आजच्या माझ्या विषय आहे स्वामी विवेकानंदजीचे विचार व आजची युवा पीढ़ी आता यांच्यात म्हणायचे झाले तर युवा पिढीत मी पण मोड़तो. आता म्हणाल तर युवा पिढ़ी काय? मग मी काय माहितच आहे हो पण स्वामीजींचे विचार व् आपले विचार ह्यांच्याशी सुसंगत घालण्यासाठी आपल्याला स्वामीजींचे विचार माहीत असणे आवश्यक आहे. मग युवांच्या बाबतीत म्हटले म्हणजे आली जयंती लावा फ़ोटो, घाला माळ मग बघताच हे पुढच्या वर्षी तरी पण वक्तुत्वाच्या हिशोबाने जे काही स्वामीजींचे दोन चार विचार पाठ करुण आलो आहे, ते तुम्ही शांत पणे ऐकावे अशी मी आपणास नम्र विनंती करतो. स्वामीजींच्या विचारांच्या बाबतीत पहिले म्हणावे लागेल की स्वामींसारखा हिरा जगी जन्मला नाही दुसरा त्यांचे गुन गान म्हणु किती वाणीत पडेल शब्द माझा अडून त्यांचा पहिला विचार मी मांडेल तो म्हणजे शिक्षणाबाबतीत
शिक्षण म्हणजे नौसर्गिक विकास होय. तर आजची युवा पीढ़ी ह्याच्याशी बिलकुल सहमत आहे. त्यांचा दुसरा विचार म्हणजे ते नास्तिक होते त्यांना देव कुठे आहे, हे कळतच नव्हते त्याना प्रश्न पड़े आजची युवा पिढी ह्याच्याशी अतिशय सहमत आहे. ते म्हणजे परमेश्वरावर विश्वास नाही पण त्यांच्या बाबतीत प्रदर्शन भलतेच् फावते ते असे की स्टेजवर जाययचे व म्हणायचे `हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे', हे तर आपणास माहितच आहे की ते नास्तिक होते पण त्याना जेव्हा राम कृष्ण परमहंस भेटले व् त्यानी सांगितले की भगवंत तुझ्या हृदयात आहे आणि आजची युवा पिढीच्या आणि आजच्या युवा मुला मुलींच्या हृद्यात् आधीच इतके विचार असतात की त्यात परमेश्वराची जागाच् कसली. स्वामीजीना शिकागो येथील धर्म परिषदेत त्यांना बंधू आणि बघीनिनो
हे वाक्य उचारुण समाजात विश्व बंधुत्व निर्माण करण्याचा पर्यत्न केला व आजची युवा पिढी जेव्हा समाज कार्यासाठी कधीतरी व्यासपिठावर जाते, तेव्हा तरुणांचे पहिलेच वाक्य असते मित्र आणि मैत्रीनिनो हयात किती विसंगतता आहे. आपले विचार सुसंगत तर आहेत. पण तेवढेच विसंगत ही जाणवते. त्यांनी सांगितले तुम्ही स्वालंबी व्हा, आपण परावलंबी आहोत. त्यानी सांगितले तुम्ही स्वाभिमानी बना मात्र आपण एक दोन गुणांमुळे पहाडायेवढा अभिमान बाळगतो. सगळे येतात व्यासपीठावर स्वामीनबद्दल म्हणतात त्यानी हे कार्य केले त्यानी ते सूत्र मांडली त्यानी सगळे केले पण मी म्हणतो ते आजच्या युवा पिढीने किती आत्मसात केले? त्यांच्या जीवनातील इतिहासाची पाने धाड़ धाड़ उतरवुंन लावण्यापेक्षा त्यांच्या प्रत्येक विचारावर विचार करुण त्यास आपल्या दैनंदिन जीवनात आणले पाहिजेत. हे मी माझ्या वकृत्त्वातुन सर्वाना सांगू इच्छीतो स्वामींच्या बाबतीत मी म्हणेल की मुक्या मनातून किती उधडावे शब्दांचे बुडबुड़े तुझे पवाडे गातील पुढती तोफाचे चवघड़े... जय हिंद जय महाराष्ट्र...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा