Breking News

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०१५

चिमणी

चिमणी (house sparrow
साधारण १५ सेमी लांबीचा हां पक्ष भारतभर सर्वत्र आढळतो. नर-मादी आकाराने सारखे असले तरी रंग रूप भिन्न आहे. मादी फिकट मातकर रंगाची, पंखांवर, तपकीरी भूरकट रेषा असलेली असते. तर नाराचा कंठ छातीचा वरचा भाग काळा व पोट पांढरे असते. पंखावर तपकीरी, गडद रेषा आणि माथा करडा असतो. दोघांचाही चोच तपकीरी आखुड जाड असते. यांचा थवा जमिनीवर उतरून दाणा टिपताना दिसतो. दोन्ही पायांवर उड्या मारीत चालण्याची यांची वेगळी पद्धत आदी यांचा `चिवचिवाट' सर्वश्रुत आहे. दिल्लीचा राज्य पक्षी आहे. सुंदर फुललेल्या बागेतील फूल कळ्या फस्त करतात. 1960 च्या दशकात चीनमध्ये चिमण्या मारण्यात आल्या होत्या. कारण एक चिमणी 50 ग्रॅम धान्य खाते, असा हिशेब त्यांनी केला होता. चिमण्या मारल्यास तेवढ्या धान्याची बचत होईल, असे चीन सरकारचे गणित होते. त्यानंतर एक-दोन वर्षांत चीनमध्ये धान्य उत्पादनात वाढ झाली, पण नंतरच्या कालावधीत किडे व कीटकांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली, की त्यांची पिके नष्ट होण्याची वेळ आली. त्या वेळी चिमणीचे महत्त्व चीनसह सर्वांनाच समजले. तसेच चिवू ये! दाना खा! पाणी पी' असे म्हणुन बाळासाठी घरात बोलावलेली ही चिमणी फोटो फ्रेम,दिव्याची शेंड, खिड़क्याची तावदाने, वळचण सगळीकडे घूसखोरी करुण असायची आणि चाहूल लागताच भुरर्कन उडायची. वाङा संस्कृती लोप पावली. त्याच बरोबर चिमणी ही हद्दपार झाली. मात्र अजुनही परस, अंगन, बगीचा, जिथे आहे तिथे बरवस्तित सुद्धा या पक्षाचा तुरळक वावर आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा