Breking News

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

तलोद्यातील नयन चित्ते घेतोय संगीत क्षेत्रात भरारी


सातपुड्याच्या सांगिद्यात राहणारे अनेक रत्न दर वर्षी देशातच नव्हे तर परदेशात ही आपली चमक दाखवित आहेत. त्यात धड़गाव तालुक्यातील बर्डीतील किसन पवार असो किंवा नुकत्याच दगड फोडून न्यायाधिशाची ऊची गाठनारे गरीब कुटुंबातील ईश्वर ठाकरे असो, असे विविध रत्न दर वर्षी विविध क्षेत्रात काम बजावत आहेत. त्याच प्रमाणे तलोदा येथील नयन चित्ते या युवकाने संगीत क्षेत्रात ऊंची गाठन्यास सुरुवात केली आहे. कुठल्याही क्षेत्रात जिद्द, मेहनत व चिकाटी या त्रिसुत्राच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. त्यासाठी आत्मविश्वास हवाच हे प्रत्यक्षात तळोद्यातील नयन चित्ते या युवकाने दाखवुन दिले. आपल्या गायन कलेचा जोरावर तो मुंबई येथे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचे धड़े घेत आहे. यासोबतच हिंदी-मराठी गाण्याची निर्मिती नयन करीत आहे. तळोदा येथील जि.प.शिक्षक सुनील माधव चित्ते यांचा मुलगा नयन हां मुंबईसारख्या मायानगरीत जाऊन आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने गायन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. मुळात लहान पणापासूनच गायनाची आवड़ असणाऱ्या नयनचे शिक्षण बी.ए. डी.एड.पर्यन्त झाले आहे. डी.एड. पुर्ण झाल्यावर शिक्षकी पेशाकडे वळत असतानाच त्याला त्यांच्यातील कलावंत चैन पडु देईना. नयनने फेसबुकच्या माध्यमातून
मुंबई येथील प्रसिद्ध लेखक संदिप नगरकर यांच्याशी ओळख झाली. नगरकर यांनी 'मेरी बेकरारी' या थिंगसॉग साठी त्याची निवड केली. नयनने व्हाट्सअप्पच्या माध्यमातून आपल्या आवाजाची चाचणी दिली. 'व्हाईस टेस्ट' मधे निवड झाल्यानंतर नयनला अहमदनगर येथे गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी बोलविण्यात आले. विशेष म्हणजे 'मेरी बेकरारी' या गाण्याला नयन याने स्वतःच लयबद्ध व सुरबद्ध करुण गायल्याने त्याचे विशेष कौतुक झाले, नयन हां मुंबई या मायानगरीत संगीत क्षेत्रात नावारुपाला येण्याच्या प्रयत्नात असुन त्यादृष्टीने त्याची वाटचाल सुरु आहे. लवकरच त्याने स्वतः लिहलेली व स्वतः संगीतबद्ध केलेल्या 'ओरे पिया' या हिंदी व 'मन हरवले' हे मराठी गाणी प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. प्रसिद्द गायक सुरेश वाडकर यांच्या तालीमीतून भविष्यात आपण यशस्वी संगीतकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असुन यासाठी वडील सुनिल चित्ते, आई माधुरी चित्ते तसेच मित्रपरिवाराची मोलाची साथ लाभत असल्याचे नयन सांगतो...




५ टिप्पण्या: