आठ वर्षाचा उदय पवार वयाच्या चार वर्षापासुन चढतोय अश्वस्थामाचा खडतर शिखर...
जिल्ह्यातील नव्हे तर गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील सातपुडा पर्वत रांगेतील तरुणांना आवाहनात्मक असणारी अश्वस्थामा यात्रा अनेकांची दमछाक करते. मात्र तलोद्यातील एका ८ वर्षीय बालकाने आपली चौथी यात्रा पूर्ण केली आहे. उदय पवार हा वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून यात्रा करीत असून त्याचे वडील अजित पवार यांच प्रोत्साहन मिळत आहे. अजित पवार हे येथील खरेदी विक्री संघात शिपाई म्हणून कार्यरत असुन ते स्वतः मागील २५ वर्षापासून यात्रा करीत आहेत.
अश्वस्थामा यात्रा म्हणजे परिसरातील तरुणांना आव्हान असते. सातपुड्याच्या पर्वत रांगेतील देरानी- जेठानी, गोऱ्यामाळ, नकटयादेव, भीमकुंड, अश्वस्थामा टेकड़ी, मामा भाँचे, माकड़ टेकड़ी, कोठार असा खडतर प्रवास पायी करावा लागतो. यात धष्ठ पुष्ट तरुणांचा कस लागतो . मात्र वर्षातून एकदा येणारी ही यात्रा सर्वासाठी मौज मस्ती, शौर्य, साहस व शारीरिक क्षमता ची कसोटी असते.
आपल्या गावातील व् सातपुड्यातील संस्कृतीची जोपासना करने या मागील उद्देश् असल्याच पवार सांगतात . आता सर्वत्र रस्ते झाले असून जूना अस्तंबा पावेतो प्रमुख टेकड़ीचा पायथ्याशी गाडी जाते. त्यामुळे आता काही तरुण दुचाकी व् चार चाकी वाहने घेवून फक्त प्रमुख शिखर चढ़तात. मात्र हि यात्रा पायी करण्याची खरी जी मजा आहे. ती वाहनातून नाही. असे पायी यात्रा करणारे म्हणतात यंदा देखील हजारो भाविक तळ ठोकुन आहेत उद्या येथील मारुती मंदिराचे दर्शन घेवून भाविक घरी जातील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा