वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने घेतला देहदानाचा निर्णय....
वडिलांचे अकाली निधनाच्या दुःखातून सावरत मुलाने आजीच्या संमती घेऊन आपल्या वडिलांचे संपुर्ण देहदान करून एक आगळा वेगळा आदर्श तळोदा तालुक्यात निर्माण केला आहे. तर नऊ महिने पोटात वाढवून जन्म देत अनेक सुख-दुःखातून वाढविलेल्या मुलाचे अकाली निधनाचे क्लेषदायक दुःख बाजूला ठेवून
मातेनेही आपल्या मुलाचा देह दूसर्याच्या कामी यावा, या उदांत हेतुने घेतलेल्या निर्णयाचे तळोदा तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यातुन आदर्शवत नजरेने याकडे पाहीले जात आहे. बोरद येथील रहवासी व नेमसुशिल शिक्षण संस्थेत गाडीचालक असलेला उमेश शंकर पाटील (वय ४५)यांचे अकाली निधन झाले. उमेश पाटील हे त्यांच्या पत्नीसह बोरद येथून शिर्डी येथे साईबाबाचे दर्शनाकरिता गेले होते. परतीचा प्रवासात त्यांचा मुलगा जयंत हा मालेगाव येथे शिकत असल्याने ते त्याला भेटण्यास गेले, मालेगावहून मोटारसाईकलीवर धुळे येथे जात असतांना झोडगे गावानजीक दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अचानक त्यांची प्रकृती खालावली. यामुळे ते व त्यांची पत्नी हे दोघे मोटारसाईकलीवरून तोल जाऊन पडले. त्यांच्या पत्नीने मालेगाव येथे असलेल्या मुलगा जयंतला फोन करून माहिती दिली. जयंतने घटनास्थळी येवून आई, वडीलांना मालेगांव येथील रूग्णालयात दाखल केले. तर उमेश पाटील हे गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने नाशिक येथे हलविण्यात आले. दरम्यान, उमेश पाटील यांचा मृत्यू झाला. उमेश पाटील यांच्या
तेथील डॉक्टरांनी उमेशचे अवयव दान करण्याबाबत जयंतला सांगितले. मात्र एवढा मोठा निर्णय आपण कसा घ्यावा? या विवनंचनेतून त्याने आजी द्वारकाबाई यांना याबाबत विचारणा केली. त्या मातेनेही आपल्या मुलाच्या अकाली मृत्यूनंतर सावरत उमेशचा उमेशचा देह जीवंत नसला तरी, त्याचे अवयव दान करून आपला मुलगा कुणाच्या तरी देहात जीवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. उमेशच्या कुटुंबियाने त्यांचे अवयव दान करण्यास होकार दिल्यानंतर मुंबई येथील वैद्यकीय पथकाने शरीरातील मृत्यूनंतर कामात येणारे अवयव काढून घेतले. उमेश पाटील यांच्या कुटुंबियांनी अवयव दानाचा घेतलेला निर्णय हा नक्कीच इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आयुष्याच्या उतारवयात ज्या मुलाच्या खांद्याचा आधार घ्यायचा तो पोटचा गोळा एकाएकी निघुन गेल्याने; आई द्वारकाबाईचा अश्रुंचा बांध फुटला होता. तर पत्नी, मुलगा जयंत, भाऊ, पुतणे आदींनी या दुःखातुन सावरत घेतलेला निर्णय हा तळोदा तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा वासीयांसाठी एक आदर्शवत असा निर्णय ठरला आहे...
** संस्थाचालकांची अशीही `माणुसकी'**
आज काल कोणताही संस्थेत मालक व कर्मचारी यांचे संबंध हे केवळ कामापुरतेच असतात. मालकांनी दिलेली नौकरी करीत मिळालेल्या पगारातून त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र काही दिवस, वर्ष एकासोबत काम केल्याने हे नाते अधिक दृढ बनते. याचे उदाहरण या घटनेतून समोर आले आहे. उमेश पाटील हे तळोदा येथील नेमसुशिल विद्यामंदिराचे स्कुलबसचे वाहन चालक होते.त्यांचा मनमिळावू स्वभाव व निष्ठा यांच्या जोरावर ते संस्थाचालकाचे विश्वासू होते. उमेश पाटील यांच्या अपघाताचे वृत्त कळताच संस्थाचालक निखीलभाई तुरखीया यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय पाटील, मिलिंद पाटील, घनश्याम पाटील, योगेश पाटील, भालचंद पाटील, संजय पटेल, अमर पटेल आदींनी नाशिक येथील रुग्णालयात दोन रात्री जागून काढल्या, तर संस्थाचालक निखिलभाई तुरखिया यांनी या दोन दिवसात उमेश पाटील यांच्या उपचारावर सुमारे दीड लाखापर्यंत खर्च केला. मात्र दुर्दैवाने उमेश पाटील यांचे प्राण वाचू शकले नाहीत. मात्र संस्थाचालकाची `माणुसकी' या घटनेत समोर आली आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा