|
दानिशला स्कुल बँग देताना जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी साहेबव अधिकारी |
गणेशतोत्सवात तळोदा येथील 11 वर्षीय दानिश मुक्तार पिंजारी याने श्री ची स्थापना करून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले. शहरातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या बालकाचा दखल घेत पत्रकार संघातर्फे नंदुरबार जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ क्लशेट्टी यांचा हस्ते नागरी सत्कार व भेट वस्तू देऊन त्याच्या गौरव करण्यात आला... पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या आरास स्पर्धेच्या कार्यक्रमात तळोदा शहराची शांतता टिकून राहावी हिंदू मुस्लिम मध्ये बंधू भाव निर्माण व्हावा ह्या हेतूने 11 वर्षीय दानिशने श्रीची स्थापना करुन एक वेगळा आदर्श निर्माण केला. सदर कार्याचे दखल घेत कार्याची पावती म्हणून त्याच्या नागरी सत्कार तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आला. दानिशची आर्थिक परिस्थिती पाहता त्याच्या शिक्षणात अडथडा निर्माण होऊ नये. त्याने शिक्षण
|
दै.पुण्यनगरीत प्रसारित झालेली बातमीची प्रतिमा देताना |
घेऊन पुढे जावे तळोदयाचे नाव लौकिक करावे. हा हेतू मनात ठेवून पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भरत भामरे यांनी दानिशला 10 वह्यांचा संच भेट दिला तर सचिव उल्हास मगरे यांनी त्याला स्कुल बॅग भेट दिली. संघाचे कोशाध्यक्ष यांनी ड्रेस आदीवस्तूंची भेट देऊन दानिशच्या नागरी सत्कार जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ क्लशेट्टी व पोलीस अधीक्षक राजेंद्र दहाडे यांच्या हस्ते करण्यात आला......
|
दै.खान्देश गौरव वृत |
|
प्रथम मूर्तिकार शिवा बोरळे यांची दै.पुण्यनगरीत चापून आलेल्या बातमीची प्रतिमा देतांना |
|
जिल्हाधिकारी मार्गदर्शन करताना |
प्रांताधिकारी अभिजित राऊत दानिश याला ड्रेस देताना
दै.पुण्यनगरीचे पत्रकार सुधाकर मराठे यांचा प्रांताधिकारी कडून सत्कार
|
दै.पुण्यनगरीचे पत्रकार उल्हास मगरे यांचा लोकसंघर्ष मोर्च्याच्या वतीने सत्कार करताना प्रा.जे.एन.शिंदे |
|
दै.पुण्यनगरीचे पत्रकार सुधाकर मराठे यांचा तळोदा पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करताना पो.नि.संजय भामरे
|
*दै. पुण्यनगरी प्रतिनिधिंचा विशेष गौरव*
दै पुण्यनगरी तळोदा प्रतिनिधि
उल्हास मगरे यांनी दिलेल्या वृत्ताची दखल घेत तालुक्यातील हलालपुर गावातील रहिवास शासन दरबारी नोंद होऊन प्रशासनाने नमूना नं ८ वाटप केले त्याबद्दल त्यांचे लोक संघर्ष मोर्चा तर्फे गौरव केला त्यांचा सत्कार प्रा जे एन शिंदे यांच्या हस्ते झाला व दै पुण्यनगरी बोरद प्रतिनिधि
सुधाकर मराठे यांनी सामाजिक सलोखा एकात्मता दर्शन व हिन्दू मुस्लिम एकता संदेश देणाऱ्या दानिश पिंजारी या बालकाचे वृत प्रकाशित केले त्यामुळे पोलिस ठाण्या तर्फे पोलिस निरीक्षक संजय भामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या दोन्ही पत्रकारांचा गौरव तलोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे गणेश आरास स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा