तळोदा - पासून अवघ्या 2 कि.मी अंतरावर असलेल्या आमलाड येथील भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या मा सतिभवानी मंदिरात नवरात्री निमित्त भक्तांची मांदियाळी जमली आहे. शउ तकापूर्वी आमलाड येथील भागाबेन जाधव पटेल यांच्या स्वप्नात मा सतिभवानी देवी ने दर्शन देऊन आपणास जमिनीतून बाहेर काढ तुझा त्रास कमी होईल, असे सांगितले म्हणून स्वप्नातील जागेत आमलाडच्या शेत शिवारातून भगवान जाधव पटेल रघुनाथ जाधव पटेल यांनी देवी तांदळे स्वरूपात बाहेर काढून तेथेच प्रतिस्थापणा केली. कालांतराने देवीने पुन्हा स्वप्नात येऊन मला शेत शिवारातून गांव शिवारात आणून स्थापन करा. असा दृष्टांत दिला म्हणून 1972 मध्ये देवीची स्थापना मंदिर बांधून आमलाडच्या पूर्वेला भगवान जाधव पटेल यांच्या शेतात वेशीवर करण्यात आली. आजतागायत तेथेच देवी असून त्याच्या सोबत बहिरम देवाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. बाजूला तीन छोट्या मंदिरात ग्रामदैवत बसविण्यात आले आहेत. असे सांगितले जाते की देवी काढल्यापासून आमलाड मधील ग्रामस्थाची भरभराट झाली. कालांतराने देवी नवसाला पावते म्हणून भक्तांची गर्दी वाढू लागली. अनेकजण पूर्ण झालेला नवस फेडण्यासाठी तर अनेक जण नवस बोलण्यासाठी येऊ लागले. भक्तांची गर्दी वाढू लागले म्हणून आमलाड येथील पटेल कुटुंबियांचे आजचे वारस नरेंद्र भाई भगवान पटेल, सुदामभाई रघुनाथ पटेल, अंबालाल भाई काशिनाथ पटेल यांनी पुन्हा मंदिर जीर्णोद्धार करून भक्तांच्या सोयीसाठी भव्य सभामंडप हवनकुंड बनविले. दरवर्षी येथे माघ शुद्ध अष्टमीला देवीचा भव्य स्थापना दिवस साजरा होतो.
नवरात्रित पंचक्रोशीतील अनेक भक्त मनोकामना पूर्ण झाली म्हणून देवीची तुला करून चांदीचा पाळणा चढवून विविध प्रकारे नवस फेडतात. मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून अनेक जण नवस करतात. याच सोबत येथे पटेल कुटुंबीय त्यांचे वडील भगवान जाधव पटेल रघुनाथ जाधव पटेल यांच्या काळापासून म्हणजे सन 1974 पासून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविक भक्तांसाठी सदाव्रत चालवून त्यांच्या राहण्याची व जेवणाची रोज व्यवस्था केली जाते. एकावेळी 200 भाविक।निवास करू शकतात एवढी भव्य वास्तू त्यासाठी बांधण्यात आली आहे. या ठिकाणी रोज परिक्रमावासी थांबतात त्यांच्या साठी वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. याचा आज पर्यंत पटेल कुटुंबीयांनी कुठेच गाजावाजा केला नसून निस्वार्थ व अव्याहत पणे सेवा सुरू आहे......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा