Breking News

बुधवार, १२ जुलै, २०१७

वीजबिल भरण्याकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

जनजागृतीचा अभाव : १३ हजारपैकी ४७८ ग्राहकांनी भरले ऑनलाईन बिल ऑनलाईन

 महावितरणने ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, तळोदा तालुक्यात १३ हजार ग्राहकांपैकी केवळ ४७८ ग्राहकांनीच या सुविधेतंर्गत वीजबिलाचा भरणा केला आहे. यामुळे ग्राहकांनी या सुविधेला प्रतिसाद न देता चक्क याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. एकूण महावितरण विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. महावितरण मोबाईल अँपद्वारे महावितरणच्या सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. विजबिल भरणा करणो आदींसह विविध समस्यांचे निराकरण घरबसल्या व्हावे, याकरिता महावितरण विभागाकडून विविध ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तळोदा तालुक्यात १३ हजार १९0 एवढी विजग्राहकांची संख्या आहे. यातील थकबाकीधारकांकडे ३१ कोटींपेक्षा अधिक बिलांची थकबाकी आहे. वीजबिल भरणा करण्यासाठी वीजवितरण विभागांना विविध उपयोजना करण्यात आल्या आहेत. वीजबिल भरण्यासाठी वीजबिल भरणा केंद्राजवळ अनेक ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत होती. तालुक्यातील ग्राहकांना वीजबिल भरणा करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागत होती. यामुळे वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. शिवाय वेळ व पैसाही वाया जात होता. यामुळे महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय मोबाईल अँपवरही सदर सुविधा उपलब्ध आहे. मात्र या सुविधेकडे ाग्राहकांनी पाठ् फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. १३ हजार १९0 ग्राहकांपैकी जानेवारी महिन्यात १५२ ग्राहकांनी चार लाख ६४ हजार, फेब्रुवारी महिन्यात १५४ ग्राहकांनी तीन लाख २७ हजार तर मार्च अखेरीस १७२ ग्राहकांनी चार लाख सात हजार एवढाच वीजबिल भरणा केला आहे. त्यातही औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनीच ऑनलाईन वीज बिल भरणा केल्याचे समजते. वीजवितरण विभाग याबाबत जनजागृती करण्यात कमी पडत असल्याने ग्राहकांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांनी वेळ वाचवून घरच्या घरी सदर बिल अदा करणो गरजेचे आहे. मात्र आदिवासी बहुल जिल्हा असून तालुक्यातील काही भाग दुर्गम भागात वसला आहे. यामुळे विविध अडचणी निर्माण होवून अनेकांना ऑनलाईन वीजबिल भरणा करता येत नाही. याबाबत संबंधित विभागाने कार्यक्षाळेचे आयोजन अथवा ठिकठिकाणी ऑनलाईन भरणा करण्याबाबत मार्गदर्शक फलक लावून जनजागृती करणो गरजेचे आहे.

ऑनलाईन पेमेंट  घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक,  शेतीपंप
जानेवारी २0१७ ग्राहक वसूली १0६ ६९000 २३ २४, ८000 २३ १४, ७000 00 00 १५२ ४६,४000 
फेब्रुवारी २0१७ ग्राहक वसूली १0५ ६९000 २२ ८१,000 २३ १,६३,000 0४ १४,000 १५४ ३२,७000
मार्च २0१७ ग्राहक वसूली १२0 ८४,000 २७ १,३५,000 २४ १,६७,000 0१ २१,000 १७२ ४0,७,000 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा