तळोदा येथील भाग्यश्री उल्हास मगरे या विद्यार्थीनीने जळगाव विद्यापिठातून एम.टेक परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. भाग्यश्रीने विविध विषयांवर संशोधन केल्याने तीला यश मिळाले असून तीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. .
दै.'पुण्यनगरी'चे तळोदा येथील पत्रकार उल्हास मगरे यांची सुकन्या भाग्यश्री हिला जळगांव विद्यापीठात एम.टेक (मास्टर ऑफ टेकनोलॉजी इन एनवोर्नमेंट सायन्स & टेक्नॉलॉजी) परीक्षेत गोल्ड मेडल मिळाले. कु.भाग्यश्री सलग चारही सेमिस्टरमध्ये प्रथम येऊन युनिव्हर्सिटी टॉपर झाली आहे. तीला ८.६ सीजीपीए गुण प्राप्त झाल्याने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम.टेक करीत असतांना तीला विद्यापिठाकडून नॅशनल इन्स्ट्यूटीट ऑफ रिसर्च नागपूर येथे रिसर्च प्रोजेक्टसाठी पाठविण्यात आले होते. त्याठिकाणी संशोधन करुन तीन प्रकारचे विषाणू फक्त पाणी आणि मातीतच नाही तर त्यांचे अस्तित्व हवेत सुद्धा असते हा शोध तीने लावला.
भाग्यश्रीचा हा शोध प्रबंध स्वरूपात प्रसिद्ध करण्यासाठी जर्नल ऑफ अप्लाईड मायक्रो बॉयोलॉजी या प्रतिष्ठीत युके अमेरिकन इंटरनॅशनल सायन्स मॅगेझिनने स्विकृत केला. याआधी अभियांत्रिकीला असतांना तीने कचरा म्हणून फेकल्या जाणाऱ्या भाजीपाल्यातून बहुउपयोगी रसायन शोधून काढले होते. भाग्यश्रीचा यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यशाचे श्रेय तिने आपले वडील उल्हास मगरे, आई नीलिमा मगरे यांना दिले आहे. . गणेश सोशल ग्रुपच्या वतीने भाग्यश्रीचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष संजय माळी, पंकज राणे, हितेंद्र खाटीक, योगेश मराठे, संदीप परदेशी, कमलेश पाडवी आदी उपस्थित होते. तसेच तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने भाग्यश्रीचा सत्कार करुन तीचे कौतूक केले. यावेळी संघाचे प्रा.ए,टी.वाघ, अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, उपाध्यक्ष चेतन इंगळे, किरण पाटील, ईश्वर मराठे,सुधाकर मराठे,सम्राट महाजन, नरेंद्र चौधरी आदींसह पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा