
तळोदा तालुक्यातील गोंडाळा शिवारात काल दि २४ रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान ऊस तोडण्यासाठी मजुरांनी पाचाट जाळल्यांनतर शेतातून बिबट्या नर व मादी बाहेर आले. तसेच या नर व मादी बिबट्याचे दोन बछडे बाहेर आले.तसेच बछडे शेतातच असल्याने त्यापैकी एकाचा आगीमुळे मृत्यू झाला आहे तर एक आगीमुळे जखमी झाला आहे. जखमी असलेल्या बछडयास वनविभागाच्या कर्मचार्यांनी ताब्यात घेतले असून त;औषधोपचार करण्यात आले आहेत. जखमी बछडयाची प्रकृती आता चांगली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच रात्री साळे नऊ वाजेच्या सुमारास नर मादी बिबट्या शेताकडे परतले. यावेळी त्यांनी डरकाळ्या फोडल्याचे प्रत्यक्षदर्शनिनी सांगितले आहे.
बोरद परिसरातील गोंडाळा शिवारातील सुदाम मगन पाडवी यांच्या शेतात काल सकाळी उस तोडण्यासाठी पाचट जाळण्यात येत होती. मात्र शितात बिबट्याचे वास्तव आल्याचे कुन्हालाही माहित नव्हते. पाचाट जाळल्याने लागलेल्या आगीमुळे शेतातून नर मादी बिबट्याच्या जोडीने शेताबाहेर येवून पळ काढला मात्र या बिबट्याच्या जोळीला दोन मादी जातीचे बछडे असून टे केवळ एक महिन्याचे असल्याने शेतातच रहिले त्यान पळून जाने शक्य नव्हते म्हणून बछडयांचा किंचाळण्याच्या आवाज शेत मजुरांना आला म्हणून शेत मजुरांनी जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांना त्या ठिकाणी बिबट्याचे दोन बछडे आढळून आले.

प्रतिक्रिया
एक महिना वयाचे दोन मादी जातीचे बिबट्याचे बछडे आढळून आले. ऊसाच्या शेतात जळलेल्या
पचटमुळे आगीत होरपळून एका बछडयाचा मृत्यू झाला. पंचनामा करून त्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आला.दुसरा बछडा किरकोळ भाजला असून त्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल. वनक्षेत्रपाल सी.डी.कासार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा