
वरिष्ठांकडे फिल्डिंग लावण्यात सुरुवात केली आहे. . या निवडीच्या पार्श्वभुमीवर दि.२८ रोजी भाजपाने आपला गट स्थापन केला आहे. नगराध्यक्ष अजय परदेशी यांची प्रतोद पदी तर जेष्ठ नगरसेवक भास्कर मराठे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. गुरुवारी नगराध्यक्ष अजय परदेशी व नवनिर्वाचित नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेवून नगरसेवकांचा गट स्थापन केल्याचे पत्र सादर केले. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यासह भास्कर मराठे, सुनयना उदासी, रामानंद ठाकरे, भागयश्री चौधरी, बेबीबाई पाडवी, शोभाबाई भोई, अमोद्दीन शेख, अंबिका शेंडे, सुरेश पाडवी, सविता पाडवी, योगेश पाडवी, नितीन पाडवी, जगदीश परदेशी, अनुप उदासी आदी उपस्थित होते. . काँग्रेसच्या प्रतोदपदी संजय माळी . पालिकेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या सहा नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे. यात सलग चारवेळा नगरसेवक म्हणुन निवडून आलेले संजय माळी यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. तर गटनेते पदी गौरव वाणी यांची निवड करण्यात आली आहे. माजी क्रीडामंत्री ॲड.पद्माकर वळवी व माजी नगराध्यक्ष भरत माळी यांनी या दोघा अनुभवी नगरसेवकांवर जबाबदारी टाकली आहे. आता स्विकृत नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागून आहे.. गटस्थापन केल्याबाबत काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांना पत्र देण्यात आले. यावेळी संजय माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी, कल्पना पाडवी यांच्यासह माजी नगरसेवक सतीवान पाडवी, गणेश सोशल ग्रुपचे संदीप परदेशी, योगेश मराठे, जितेंद्र सुर्यवंशी, दगुलाल माळी, विकास राणे, आशिष माळी आदी उपस्थित होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा