Breking News
सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८
तळोद्यात आज जिल्हा साहित्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी, नटावद यांच्या संयुक्त विद्यमाने ८ वे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज दि.११ रविवारी रोजी तळोदा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलन अध्यक्षपदी निंबाजीराव बागुल असतील. याप्रसंगी परिसंवाद, बालकट्टा, कवि संमेलन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. .
तळोदा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आज (दि.११) सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात येईल. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलिस अधिक्षक संजय पाटील, तळोदा प्रकल्पाधिकारी विनय गौडा, माध्यमिक शिक्षणाधिकारी राहूल चौधरी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, तळोदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.रामय्या उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष निंबाजीराव बागुल, स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावित हे असतील. यावेळी श्रीमती जयाबाई कृष्णराव गावित, प्रा.डॉ.पितांबर सरोदे, वाहरु सोनवणे, दिनानाथ मनोहर, रमाकांत पाटील, अविनाश पाटील (धुळे), संभू पाटील (जळगाव) उपस्थित राहणार आहे. मान्यवरांचे स्वागत निखीलभाई तुरखिया, सुदामभाई पटेल, सुनिल सुर्यवंशी, वासुदेव गांगुर्डे, कांतीलाल पाडवी, हिरामण पाडवी, भगतसिंग पटले, भिमसिंग पवार, गोसा पेंटर, प्रविण पाडवी, शिवलाल वळवी स्वागत करतील. दुपारी १ ते २.३० यादरम्यान दोन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुख्य सभामंडपात पहिला परिसंवाद साहित्य, संस्कृती व कलेच्या समाजजीवनावरील परिणाम तर दुसरा परिसंवाद मराठी भाषा भगिनींचे सांस्कृतिक सौहार्दात योगदान असे आहेत. २.३० ते ४ दरम्यान जीटीपी महाविद्यालयाचे प्राध्यापक माधव कदम सानेगुरुजींच्या कथेचे नाट्यरुपी सादरीकरण करतील. दुपारी १ ते ४ दरम्यान बालकट्यात मी वाचलेले पुस्तक कविकट्टाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचा समारोप सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजेदरम्यान होणार आहे. समारोपीय भाषण संमेलनाचे उद्घाटक डॉ.श्रीपाद जोशी हे करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विश्वास पाटील, डॉ.अलका कुळकर्णी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर ७ ते १० या वेळेस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. संमेलनास साहित्य प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, अध्यक्ष प्रा.डॉ.पितांबर सरोदे, उपाध्यक्ष रमेश डी.चव्हाण, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंहळाचे कार्यवाह डॉ.इंद्रजित ओरके, कार्याध्यक्ष रमाकांत पाटील, सहसचिव विजय बागुल, दत्ता वाघ, भिमसिंग वळवी, विनायक माळी, डॉ.सुनंदा पाटील, आर्कि.निरज देशपाठहे, सौ.सुनंदा भावसार, प्रविण पाटील, संदिप चौदरी, संजयकुमार शर्मा, सौ.सुलभा महिरे, राजू पाटील, कैलास मराठे यांनी केले आहे. .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा