Breking News

रविवार, २ जून, २०१९

७१ वर्षाची लालपरी ग्रामीण भागात झाली खिळखिळी

७१ वर्षाच्या लालपरीची चाके खिळखिळी झाल्याचा अनुभव दुर्गम भागातील जनतेला येत आहे.
अक्कलकुवा आगारातील परिवहन मंडळाच्या बसेसला स्टेपनी व टायर नसल्याने चालक-वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. अनेकवेळा टायर व स्टेपनी अभावी बसेस रस्त्यातच बंद पडत असून सुविधा उपलब्ध होईपर्यंत प्रवाश्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. एकीकडे 'बहुजन सुखायय बहुजन हिताय' हे ब्रीद घेवून गावोगावी धावणाऱ्या या लालपरीचा आज ७१ वा वर्धापण दिवस साजरा होत असतांना मात्र तीच्या खिळखिळ्या झालेल्या सुविधांकडे लक्ष देण्यात येत नसल्याने अनेकवेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. . एकेकाळी एसटीनेच प्रवास करण्यास अनेकजण आग्रही असत. मात्र, स्थिती बदलत चालली आहे. विविध कारणास्तव एस.टी.बस चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या अक्कलकुवा आगार एक वेगळ्याच अडचणीत सापडले असून बसेसला टायर व स्टेपनीचा तुटवडा भासत असल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकुवा आगारात एकूण ७० बसेस आहेत. त्यापैकी १६ बसेस ह्या मानव विकासाच्या असून तीन मिनी बसेस आहेत. यापैकी दरदिवशी दोन बसेस नाशिक, तीन पुणे, तर जळगाव, मालेगाव, सुरत यासाठी दोन बसेस व मुंबई, औरंगाबाद, ब्राम्हणपूर, वापी या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नियमित एक बस सुरु आहे. मात्र, केवळ या लांब पल्ल्याच्या बसेसलाच स्टेपनी उपलब्ध करून दिली जात आहे. मध्येच चाक पंक्चर अथवा काही अडचण आल्यास दुसऱ्या आगाराकडून उधारीवर काम चालवले जात आहे. सध्या ८० टक्के बसेसला पुरेसे टायर व स्टेपनी नसल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. . प्रवासात बसचे एखादे चाक नादुरुस्त झाले तर प्रवाशांना रस्त्यावरुन जाणाऱ्या खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो आहे. खाजगी वाहन येईपर्यंत रस्त्यातच ताटकळत थांबावे लागते आहे. रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्था याला कारणीभूत असल्याचे अक्कलकुवा आगर प्रमुखाचे मत आहे
. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून निकृष्ट कामामुळे लोखंडी सळई, खडी निखळून पडली आहे. यामुळे अनेकवेळा टायरमध्ये खडी, लोखंडी सळई रुतून टायर व साईडवॉल निकामी होतात. परिणामी ते टायर वापरातून निकामी होते. टायर खराब झाल्यास धुळे येथील विभागीय कार्यशाळा (वर्कशॉप) येथे पाठविण्यात येते. ते रिमोल्ड करुन त्याचा स्टेपनी म्हणून उपयोग केला जातो. यामुळे जुनेच टायर बराच अंतर गाठून घेतात. दर महिन्याला सुमारे २५ हजार रकमेचे ४० ते ५० टायर रस्त्याअभावी बाद होत असल्याने अक्कलकुवा आगाराला आर्थिक फटका सोसावा लागत आहे. . एकेकाळी एसटीनेच प्रवास करण्यास अनेकजण आग्रही असत. मात्र, स्थिती बदलत चालली आहे. विविध कारणास्तव एस.टी.बस चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या अक्कलकुवा आगार एक वेगळ्याच अडचणीत सापडले असून बसेसला टायर व स्टेपनीचा तुटवडा भासत असल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकुवा आगारात एकूण ७० बसेस आहेत. त्यापैकी १६ बसेस ह्या मानव विकासाच्या असून तीन मिनी बसेस आहेत. यापैकी दरदिवशी दोन बसेस नाशिक, तीन पुणे, तर जळगाव, मालेगाव, सुरत यासाठी दोन बसेस व मुंबई, औरंगाबाद, ब्राम्हणपूर, वापी या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नियमित एक बस सुरु आहे. मात्र, केवळ या लांब पल्ल्याच्या बसेसलाच स्टेपनी उपलब्ध करून दिली जात आहे. मध्येच चाक पंक्चर अथवा काही अडचण आल्यास दुसऱ्या आगाराकडून उधारीवर काम चालवले जात आहे. सध्या ८० टक्के बसेसला पुरेसे टायर व स्टेपनी नसल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. . एकेकाळी एसटीनेच प्रवास करण्यास अनेकजण आग्रही असत. मात्र, स्थिती बदलत चालली आहे.
विविध कारणास्तव एस.टी.बस चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या अक्कलकुवा आगार एक वेगळ्याच अडचणीत सापडले असून बसेसला टायर व स्टेपनीचा तुटवडा भासत असल्याची माहिती समोर आली आहे. अक्कलकुवा आगारात एकूण ७० बसेस आहेत. त्यापैकी १६ बसेस ह्या मानव विकासाच्या असून तीन मिनी बसेस आहेत. यापैकी दरदिवशी दोन बसेस नाशिक, तीन पुणे, तर जळगाव, मालेगाव, सुरत यासाठी दोन बसेस व मुंबई, औरंगाबाद, ब्राम्हणपूर, वापी या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नियमित एक बस सुरु आहे. मात्र, केवळ या लांब पल्ल्याच्या बसेसलाच स्टेपनी उपलब्ध करून दिली जात आहे. मध्येच चाक पंक्चर अथवा काही अडचण आल्यास दुसऱ्या आगाराकडून उधारीवर काम चालवले जात आहे. सध्या ८० टक्के बसेसला पुरेसे टायर व स्टेपनी नसल्याचे एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. . अक्कलकुवा आगाराकडे ६९ बसगाड्या असून त्यापैकी १६ बसेस या मानवविकासाच्या असून तीन मिनी बसेस आहेत.

 ६९ बसेस पैकी १३ बसेस या १० लाख किलोमीटरपेक्षा अधिक धावल्या असून कालबाह्य होण्याचा मार्गावर असल्या तरी त्याच बसेस रस्त्यावर धावत आहेत. सध्या अक्कलकुवा आगारात स्टीलबॉडी असलेली नवीन वाहन दाखल झालेले पाहावयास मिळत आहे. मात्र ते वाहन पूर्णत: नवीन नसून केवळ त्या वाहनांची बॉडी स्टीलची असल्याचे समजते. त्याचे इंजिन आदी बाबी जुन्याच आहेत. तर यापूर्वी देखील अशीच दोन वाहने आगरासाठी देण्यात आली होती. अक्कलकुवा आगाराला मागील पाच वर्षांपासून एकही नवीन बस न मिळाल्यामुळे जुन्या गाड्यांवर आपली गरज भागवावी लागत आहे. आगाराकडे असलेल्या गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.. 

 जिल्ह्यात रस्त्याची दुरवस्था आहे. अनेकठिकाणी रस्त्यावर खडी व लोखंडी सळई बाहेर आल्या आहेत. परिणामी दर महिन्याला ४० ते ५० टायर निकामी होत आहेत. अक्कलकुवा आगारात सध्याच्या स्थितीत स्टेपनी व टायरची आवश्यकता आहे. पर्याय म्हणून वाहन बंद पडलेल्या ठिकाणी स्टेपनी उपलब्ध करून दिली जात आहे. धुळे कार्यशाळेकडे स्टेपनी, टायर्सची मागणी करण्यात आलेली आहे. . 
 -अनुजा दुसाने, . अक्कलकुवा आगार प्रमुख.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा