तळोदा : तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात लसीकरणासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या आशा, अंगणवाडी व आरोग्य सेविका यांचा सत्कार करण्यात आला.या सत्काराने आशा,अंगणवाडी व आरोग्य सेविका भारावून गेल्या.ग्राऊंड लेव्हलवर काम करत असताना अनेक अडचणींना तोंड देत वर्षभर लसीकरण मोहिमेत त्यांनी दिलेल्या सक्रिय योगदानाची दखल घेत पत्रकार संघाने सन्मानित केल्याने अनेक आशा,अंगणवाडी व आरोग्य सेविकांच्या डोळे भरून आले.
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ व कै.कलावती फाउंडेशन सोमावल यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा तालुक्यात लसीकरणात अग्रस्थानी असणाऱ्या प्रथम पाच गाव व त्या गावात लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी राबणाऱ्या घटकांचा सन्मान सोहळा तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहरातील आदिवासी सांस्कृतिक भवनात आज पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण,पचायत समिती सभापती यशवंत ठाकरे,सदस्य दाज्या पावरा,विजय राणा, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस श्याम राजपूत, नगरसेवक हितेंद्र क्षत्रीय, संदीप परदेशी,रा.का.शहर अध्यक्ष योगेश मराठे,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस शाम राजपूत, मोडचे सरपंच जयसिंग माळी, मोहन ठाकरे,नाथ्या पावरा, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विशाल चौधरी,मुस्लिम समाज अध्यक्ष आरिफ नुरा,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात गेल्या वर्षभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात तळोदा तालुक्यात अग्रस्थानी असलेल्या पहिल्या पाच गावांना विशेष पुरस्कार देण्यात आले. त्याप्रमाणे या गावात दिवसरात्र लसीकरणासाठी मेहनत घेणाऱ्या आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका,आशासेविका,आशा गटप्रवर्तक यांचा देखील सन्मान सोहळा पत्रकार संघाच्या वतीने पार पडला.
यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य विजयसिंग राणा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,ग्राउंड वर काम करणारे हे कर्मचारी नेहमीच दुर्लक्षित असून पत्रकार संघाने त्याची यथोचित दखल घेत कोरोणा लसीकरणासाठी राबणाऱ्या यंत्रणेच्या सन्मान सोहळा आयोजित केल्याबद्दल पत्रकार संघाचे विशेष कौतुक केले.
आमदार उदेसिंग पाडवी यांनी देखिल कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी यंत्रणेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असून इतर गावांनीही सत्कार झालेल्या गावांकडून प्रेरणा घ्यावी व आपले गाव देखील लसीकरणात अग्रस्थानी हे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवित असून पत्रकार संघाने आदर्श पायंडा निर्माण केला असल्याची भावना त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली. अध्यक्षीय मनोगतात नगराध्यक्ष अजय परदेशी म्हणाले की,पत्रकार देखील सर्व यंत्रणेच्या सोबत शहर व तालुक्यात ग्राउंड लेव्हल वर काम करत होते. तत्कालीन उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा,तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे,तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण,तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण यांचा देखिल नामोल्लेख करत त्यांनी सर्व यंत्रणेचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले तर पत्रकार संघाचे सचिव उल्हास मगरे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नारायण जाधव,सम्राट महाजन, कोषाध्यक्ष सुधाकर मराठे,भेट भामरे, ईश्वर मराठे, महेंद्र लोहार, नरेश चौधरी, सुशील सूर्यवंशी, किरण पाटील, दीपक मराठे, डॉ.नारायण जाधव, अक्षय जोहरी, महेंद्र सूर्यवंशी यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले
*यांचा झाला सन्मान*
१) झिरी : डॉ.गौरव सोनवणे,अरुणा वसावे,लतिका वळवी,विमल सुदाम वळवी ,विजय वळवी,अविनाश भरतसिंग वळवी, सरपंच मीनाबाई वळवी
२) धानोरा :
डॉ.सागर महाजन,संध्या साळवे,ज्योती साळवे,चंद्रकला पावरा,मोहन ठाकरे , सरपंच जंगलसिंग मोहन ठाकरे
३) तळवे : डॉ.प्रियांका वळवी,आर.के.पाडवी,आक्काबाई नारायण केदार ,पुष्पा सीताराम पाटील, सरपंच बारीकराव
४) आष्टे (मोड): विमल रडत्या पाडवी,अंजना राजू माळी,रजनी अशोक शिंदे,बबिता सत्तेसिंग वळवी,सरपंच जयसिंग माळी.
५) रेवानगर : डॉ.भरत पावरा,डॉ.महेंद्र ब्राम्हणे,फेंदा पावरा, सविता गावित,अनिता पावरा,संगीता पावरा,दाज्या पावरा