Breking News

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

बारगळ व होळकर राजघराण्यातील वंशज्यांच्या ऐतिहासिक भेटीच्या मी ही साक्षीदार !

        मध्य प्रदेशातील नर्मदेच्या किनारी वसलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानी महेश्वर येथे भेट देण्याची संधी प्रसंगाने, तळोदा येथील जहागीरदार अमरजीतराजे बारगळ यांच्या सहकार्याने मिळाली.

महेश्वर येथील सुंदर घाट, मंदिरे आणि धर्मशाळांचे स्थापत्य उल्लेखनीय आहे. येथील अनेक ऐतिहासिक वास्तूंवर मुघल, राजपूत आणि मराठा वास्तुशैलीचा प्रभाव दिसून येतो. अहिल्यादेवींच्या पुतळ्यावरील छत्रीला वंदन करण्यासाठी अमरजीतराजे बारगळ यांना महेश्वर आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे 250 वर्षांनी होळकर राजघराण्याचे 15 वे वंशज, यशवंतराव शिवाजीराव होळकर आणि बारगळांचे 9 वे वंशज, अमरजीतराव बारगळ यांच्यात प्रत्यक्ष संपर्क झाला. अमरजीतराजे बारगळ आणि यशवंतराव होळकर यांच्यात मामा-भाच्याचे नाते आहे. यशवंतराव होळकर, जे परदेशी शिक्षण घेतलेले उच्चभ्रू होते, त्यांचे आमच्याशी वागणं, पाहुणचार, नम्रता आणि त्यांच्या छोट्या छोट्या बाबींची जाणीव ही उल्लेखनीय होती.

राजेशाही थाट असूनही त्यांच्यातील नम्रता आणि शांत संयम पाहून अभिमान वाटला. त्यांनी पारंपरिक राजेशाही पद्धतीने आमचे स्वागत केले आणि विशेषतः स्वयं महेश्वर किल्ल्याचे दर्शन घडवून त्याबाबतची माहिती दिली. रात्रीचे व दुपारचे जेवण सोबत घेतले. अमरजीतरावांकडून ऐतिहासिक माहिती जाणून घेतली आणि नोंद केली. त्यांची वयाच्या 70 व्या वर्षीही प्रचंड स्मरणशक्ती, बारीकसारीक बाबींबद्दलची माहिती, वेळेचे साधर्म्य, आणि इतिहास उलगडताना दिलेले संदर्भ, हे सर्व एक शिक्षण होते. त्यांचा विनोदी स्वभाव आणि आपला ज्ञानाचा उपयोग शब्दांच्या खेळामध्ये करण्याची कला ही अद्वितीय होती.

बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी आणि पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या उद्देशाने, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांसह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रावळखेडी येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी होळकर आणि बारगळ कुटुंबातील वंशज, अमरजीतराजे बारगळ व यशवंतराव होळकर व मस्तानी यांचे वंशजांना व्यासपीठावर बोलावले. हे एक विशेष क्षण होते.

पूर्व नियोजन नसलेल्या प्रवासाला मी सुरुवातीला नकार दिला होता. मात्र कालूभाऊंच्या आग्रहामुळे आणि राजे अमरजीत बारगळ यांच्या भ्रमणध्वनीला नकार देणे कठीण झाल्याने, मी या ऐतिहासिक प्रवासाचा साक्षीदार झालो. याप्रसंगी, धनंजय बारगळ यांच्याशी परिचय झाला, पण सहवासामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजले.

इतिहास घडवणाऱ्या महापुरुषांच्या वंशजांच्या सहवासाने बरेच काही शिकायला मिळाले. इतिहासातील अनेक पैलू उलगडले आणि त्याचा आनंद अनोखा होता....

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची राजगादीराज्यासोबत शाहीजेवणाची मेजवानी
250 वर्षांनंतर होळकर व बारगळ वंशातील भेटपारंपरिक पद्धतीने स्वागत करताना राजघराण्यातील दाईबाईपुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे 15 वे वंशज यशवंतराव होळकर यांच्या सोबत राजगाधीचा दर्शनाचा योगमस्तानी यांचे वंशज
वीर बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा