Breking News

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

कृतीशील विचारांचा गतीशील संघर्षयोध्दा दादाभाई राजेंद्र पाटील

सुधाकर मराठे 
              जीवनात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही आणि असेच मिळाले तर ते कायम टिकत नाही. यासाठी सदैव प्रत्नशील असणे गरजेचे आहे. असेच सदैव प्रयत्नशील असलेले एक जिगरबाज कृतीशील विचारांचा गतीशील संघर्षयोध्दा मित्र म्हणजे दादाभाऊ राजेंद्र पाटील. 

             आई वडील कमी वयात साथ सोडून गेले. घरची हालाखीची परिस्थिती यावर मात करण्यासाठी व परिस्थितीत बदल करून दाखवण्याची जिद्द आणि लढवय्या बाणा, कोणताही बडेजाव पणा नाही, अंगी केवळ जिद्द व मेहनत करण्याची तयारी असलेल्या दादाभाऊ, शहरातील एका पाटील कुटूंबात  जन्माला आला. वडील राजेंद्र पाटील आणि विटाबाई यांचा उदरी जन्म घेतलेल्या दादाभाऊ यास ज्ञानाची शिदोरी माता- पित्यांकडूनच मिळाली. जय योगेश्वर पंथाचे अनुयायी असलेल्या या कुटुंबात सर्वच जण देव धार्मिक, आर्थिक परिस्थिती तशी हलाखीची. परिवारात आई, वडील, एक भाऊ व एक बहिण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे तसे कठीणच. अशा परिस्थितीत वडिलांनी शेती छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. त्यामुळे काहीसा हातभार लागला. .
        सर्व सुरळीत होत असताना नियतीच्या मनात काही वेगळंच होत. अचानक काळाने झडप घातली आणि त्यात राजेंद्र पाटील यांचे निधन झालं. धकाधकीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीत दादूने महाविद्यालयीन शिक्षण (MA इंग्लिश) पूर्ण केले. वडीलांच्या निधना नंतर अवघ्या वयाचा २३ व्या वर्षी परिवाराची जबाबदारी दादुच्या खांद्यावर आली. त्यातच बहिणीची व स्वतःच्या लग्नाची जबाबदारी देखील दादाभाऊने शिताफीने पार पडली..

              रॉकेलचा व्यवसाय चालविण्यासोबत मिळेल ते काम  कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी करु लागले. यातून पैसा मिळत गेला आणि समस्या सुटत गेल्या. त्यातच दादूचा लोकांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव, अडलेल्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावाने समाज बांधवांशी त्यांची नाळ जुळली गेली. अंगात काम करण्याची धमक आणि खडक फोडून पाणी निघेपर्यंत कष्ट करण्याची ताकद असल्याने हाताला मिळेल ते काम त्यांनी सुरू केले. मोबाईल मध्ये सुरुवातीपासूनच आवड असल्याने त्याने मोबाईलचा दुकानात काम केले. हळू हळू कालांतराने स्वतःचे दुकान उभे केले. मात्र मोबाईल दुरुस्तीसाठी दुसऱ्याकडे पाठवावे लागत असल्याने व वेळेवर दुरुस्त करून परत मिळत नसल्याने नाराज होत असलेला ग्राहक पाहून दादूने मोबाईल दुरुस्ती व सॉफ्टवेअरचे काम शिकण्याचा निर्धार केला. सुरत येथे जाऊन त्याने हे काम कमी वेळेत शिकून घेतले. अन् शहरातील गजबजलेल्या स्मारक चौकात स्वतःचे दुकान टाकले. आज दादूची ओळख शहरातील एक नामांकित मोबाईल दुरुस्ती करणे व मोबाईल साहित्य विक्री करणारा अशी निर्माण झाली आहे. मोबाईल मध्ये पहिल्यापासून त्यावर असल्यास कारणाने कुणाचाही मोबाईलची काही समस्या आली तर दादूच्या शोध घेत अनेक जण त्याचा शोधात येतात.        

हालाखीची परिस्थिती वर मात करत कठोर परिश्रम जिद्दीच्या जोरावर आज दादूने स्वतःचा व्यवसाय उभा केला असून कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःचा मालकीचे घर त्याने उभारले आहे. या सर्वांमध्ये त्याला त्याची पत्नी पूजा तिचे मोठे सहकार्य लाभले असून परिस्थितीशी झुंजत तिने दाद दादूची साथ देत घराला घरपण आणले आहे या घराला प्रकाशित करण्याचे कार्य वीर व मानसीच्या माध्यमातून झाले आहे. दादू तुझा कठोर परिश्रमाला व एवढे असतानाही कधीही दुःखाची व परिस्थितीबाबत बोलत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करण्याची तुझ्यात असलेले एक वेगळेपण दर्शवते... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा