Breking News

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

पंकज राणे: एक साधा पण प्रभावी समाजसेवक

१८ जानेवारी २०२५

        पंकज भालचंद्र राणे हे एक प्रगल्भ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. १८ जानेवारी १९७६ रोजी जन्मलेले पंकज राणे, आपल्या कार्यक्षमतेने आणि सेवाभावाने समाजात एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जीवनप्रवास विविध क्षेत्रांतिल योगदानासाठी वळण घेतो, ज्यामध्ये राजकारण, समाजकार्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द सामील आहे.

 पंकज राणे यांनी शालेय शिक्षण शेठ के. डी. हायस्कूल आणि तळोदा महाविद्यालयात घेतले. पुढे त्यांनी बी.एड. पदवी प्राप्त केली आणि शिक्षणक्षेत्रात कळकळीने काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्याची एक विशेषता म्हणजे त्यांनी नेहमीच गोरगरीबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. रेशन व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरिबांना मोफत रेशन दिले, आणि समाजाच्या विविध स्तरांशी सहज स्नेहपूर्ण नाते निर्माण केले.

२००० मध्ये बँक क्षेत्रात सेवा सुरू केल्यावर पंकज राणे यांनी ११ वर्षे प्रामाणिकपणे काम केले. त्यानंतर, त्यांनी शिक्षकी पेशाला अवलंबले, परंतु संस्थेतील वादामुळे त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. समाजकार्याचा ध्यास घेत त्यांनी राजकारणात पदार्पण केले. २०१५ मध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प, जसे की रस्ते बांधकाम, पाणीपुरवठा, शौचालय योजना, खर्डी नदी पूल आणि कंजरवाडा परिसरातील पाईपलाइन समस्येवर उपाय योजना यांचा समावेश होता.

२०१७ मध्ये पुन्हा निवडणूक लढवली, परंतु त्या वेळी प्रभाग बदलल्यामुळे आणि मोदी लाटेच्या प्रभावामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीदेखील, पंकज राणे यांनी समाजाची नाळ कधीही तुटू दिली नाही आणि सामाजिक योगदानाच्या माध्यमातून काम सुरू ठेवले.

पंकज राणे हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत, जे नेहमीच समाजाच्या भल्यासाठी कार्यरत राहतात. त्यांच्या कामामुळे तरुण पीढीला समाजसेवेचा मार्ग दाखवला आहे. शाळेत आणि समाजात त्यांनी बनवलेल्या संबंधांचे उदाहरण आहे, की समाजाच्या सर्व स्तरांत त्यांनी एक सकारात्मक बदल घडवला आहे.

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

दीपमाला मॅडम: विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षिका

06 जानेवारी 2024
        शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापुरतं मर्यादित नसून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भावनांना समजून घेण्याची, त्यांचं आत्मविश्वास निर्माण करण्याची आणि त्यांना योग्य दिशादर्शन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. याचाच एक सुंदर उदाहरण म्हणजे नंदुरबार येथील के.आर. पब्लिक स्कूलच्या दीपमाला वळवी मॅडम.

        आमचा यथार्थ जेव्हा पहिलीत प्रवेश घेतला तेव्हा त्याचं वय अवघं ७ वर्षं होतं. नवीन शाळा, नवीन वातावरण यामुळे तो खूप घाबरला होता. दररोज 25 किमीचा प्रवास, नवीन मित्र, कुटुंबापासून लांब राहवे लागत असल्याने वर्गात रडणं, शाळेत न जाण्यासाठी हट्ट करणं यामुळे आम्ही पालक म्हणून चिंतेत पडलो होतो. त्याला समजावण्याचा आम्ही प्रयत्न केला पण काही फरक पडत नव्हता. त्या वेळी दीपमाला मॅडमनी या परिस्थितीला अत्यंत संयमाने आणि ममतेने हाताळलं.

            त्यांनी यथार्थशी संवाद वाढवला, त्याच्या मनातील भीती समजून घेतली आणि त्याला आधार दिला. त्यांनी केवळ अध्यापनाचं काम केलं नाही तर त्याच्याशी मैत्री केली. एवढंच नाही, तर त्याचा शारीरिक व मानसिक थकवा दूर करण्यासाठी त्याच्या हातपाय दाबून त्याला दिलासा दिला. हळूहळू त्याचं रडणं थांबलं आणि त्याचा आत्मविश्वास वाढला. दीपमाला मॅडमच्या या संवेदनशीलतेने आणि मायेने यथार्थच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला.

        शाळेत शिक्षक खूप असतात, पण दीपमाला मॅडमनी यथार्थशी पर्सनल टच निर्माण केला. त्यांनी फक्त त्याच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत, तर त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा समजून घेणाऱ्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणाऱ्या दीपमाला मॅडम यांचं योगदान अतुलनीय आहे.

        आपल्या वाढदिवशी आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपले पुढील आयुष्य आनंदाने, आरोग्याने आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भरलेलं असावं, आमच्या यथार्थ बाबतचे प्रेम असेच तेवत राहावे हीच प्रार्थना!

              दीपमाला मॅडम, तुमच्या शिक्षण क्षेत्रातील या अमूल्य योगदानाबद्दल आम्हा सर्व पालकांची मनःपूर्वक कृतज्ञता आहे...