Breking News

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

दीपमाला मॅडम: विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षिका

06 जानेवारी 2024
        शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापुरतं मर्यादित नसून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भावनांना समजून घेण्याची, त्यांचं आत्मविश्वास निर्माण करण्याची आणि त्यांना योग्य दिशादर्शन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. याचाच एक सुंदर उदाहरण म्हणजे नंदुरबार येथील के.आर. पब्लिक स्कूलच्या दीपमाला वळवी मॅडम.

        आमचा यथार्थ जेव्हा पहिलीत प्रवेश घेतला तेव्हा त्याचं वय अवघं ७ वर्षं होतं. नवीन शाळा, नवीन वातावरण यामुळे तो खूप घाबरला होता. दररोज 25 किमीचा प्रवास, नवीन मित्र, कुटुंबापासून लांब राहवे लागत असल्याने वर्गात रडणं, शाळेत न जाण्यासाठी हट्ट करणं यामुळे आम्ही पालक म्हणून चिंतेत पडलो होतो. त्याला समजावण्याचा आम्ही प्रयत्न केला पण काही फरक पडत नव्हता. त्या वेळी दीपमाला मॅडमनी या परिस्थितीला अत्यंत संयमाने आणि ममतेने हाताळलं.

            त्यांनी यथार्थशी संवाद वाढवला, त्याच्या मनातील भीती समजून घेतली आणि त्याला आधार दिला. त्यांनी केवळ अध्यापनाचं काम केलं नाही तर त्याच्याशी मैत्री केली. एवढंच नाही, तर त्याचा शारीरिक व मानसिक थकवा दूर करण्यासाठी त्याच्या हातपाय दाबून त्याला दिलासा दिला. हळूहळू त्याचं रडणं थांबलं आणि त्याचा आत्मविश्वास वाढला. दीपमाला मॅडमच्या या संवेदनशीलतेने आणि मायेने यथार्थच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला.

        शाळेत शिक्षक खूप असतात, पण दीपमाला मॅडमनी यथार्थशी पर्सनल टच निर्माण केला. त्यांनी फक्त त्याच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत, तर त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा समजून घेणाऱ्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणाऱ्या दीपमाला मॅडम यांचं योगदान अतुलनीय आहे.

        आपल्या वाढदिवशी आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपले पुढील आयुष्य आनंदाने, आरोग्याने आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भरलेलं असावं, आमच्या यथार्थ बाबतचे प्रेम असेच तेवत राहावे हीच प्रार्थना!

              दीपमाला मॅडम, तुमच्या शिक्षण क्षेत्रातील या अमूल्य योगदानाबद्दल आम्हा सर्व पालकांची मनःपूर्वक कृतज्ञता आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा