"कुछ लोग ऐसे होते हैं जो अपने लिए नहीं, दूसरों के लिए जीते हैं!" या चित्रपटातील ओळीसारखे काही माणसं असतात, जी स्वतःच्या यशापेक्षा जनतेच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी झटतात.
तळोद्याच्या मातीतून असेच एक झुंजार, प्रामाणिक आणि संवेदनशील नेतृत्व घडले ते म्हणजे *हितेंद्र श्रवणसिंह क्षत्रिय!*
साध्या परिस्थितीतून प्रामाणिक मेहनतीने जीवनाचा प्रवास सुरू करून, आज ते जनतेच्या मनातील "हीरो" झाले आहेत. संकटसमयी मित्रांसाठी धावून जाणारे, समाजासाठी नवनवीन उपक्रम राबवणारे, आणि कार्यकर्त्यांसाठी आधारस्तंभ असलेले हितेंद्र क्षत्रिय यांचा आज वाढदिवस ...
*"हीरो जन्मत नाही, तो घडतो — संघर्षातून, प्रेमातून, आणि सेवेतून!"*
तळोद्याचा मातीत श्रवणसिंह क्षत्रिय यांच्या कुटुंबात जन्मलेले हितेंद्र क्षत्रिय यांनी आपल्या जीवनाची सुरुवात अत्यंत साध्या आणि गरिबीच्या परिस्थितीतून केली. त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करत त्यांनी प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि धैर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या जीवनाला एक नवा आकार दिला.
हितेंद्र क्षत्रिय हे स्वतःपेक्षा दुसऱ्यांची काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व आहे. संकटसमयी मित्रांच्या मदतीला धावून जाणारे, सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे, आणि जनतेच्या हितासाठी झटणारे असे ते नेहमीच ओळखले जातात.
ते माजी बांधकाम सभापती आणि माजी उपसभापती (तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती) म्हणून जबाबदारी सांभाळून कार्यरत राहिले. तसेच श्री. गणेश सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबवले. ते प्रभाग क्रमांक २ मधून, मुस्लिम बहुल वॉर्डातून निवडून आलेले सक्रिय नगरसेवक आहेत.
हितेंद्र क्षत्रिय यांची राजकीय वाटचालही अत्यंत प्रेरणादायी आहे. शहरातील राजकारणाचे केंद्रबिंदू भरत माळी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. सलग चार वेळा निवडून आलेले नगरसेवक संजय माळी, जिवा भावाचे मित्र योगेश मराठे व संदीप परदेशी व मित्र परिवार यांच्या सहकार्याने श्री. गणेश सोशल ग्रुप स्थापन करून समाजकारणाला गती दिली.
गरिबांच्या मदतीसाठी तत्पर राहणारे हे युवा नेतृत्व म्हणजे खऱ्या अर्थाने "गौर गरिबांचा आधारस्तंभ" आहे. राजकीय प्रवासात त्यांनी काही कारणास्तव काँग्रेस पक्षातून बाहेर पडून माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
2025 साली, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली नवे राजकीय पर्व सुरू केले.
हितेंद्र क्षत्रिय यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर जनतेच्या मनातही अढळ स्थान निर्माण केले आहे. *"किसका आदमी है? हीतू दादा का!"* असे सहज आणि अभिमानाने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. त्यांच्या प्रेमापोटी, प्रकाश पाडवी या जिवाभावाच्या कार्यकर्त्याने तर हनुमानासारख्या भक्तीभावाने हितेंद्र क्षत्रिय यांचे छायाचित्र थेट आपल्या छातीवर रेखाटले आहे! हा प्रसंग हितेंद्र क्षत्रिय यांच्यावरील प्रेम, निष्ठा आणि श्रद्धेचा सर्वोच्च नमुना आहे...
**हितेंद्र क्षत्रिय** म्हणजे
- लोकसेवेची ओढ असलेला नेता,
- गरिबांसाठी धावून जाणारा मित्र,
- आणि "नगरसेवक कसा असावा" याचे जिवंत उदाहरण!
गरिबाच्या घामाला किंमत देणारा, मित्राच्या दुःखात मिठी घालणारा, आणि तळोद्याचा खरा शिलेदार त्यांच्या या कार्यशील, प्रामाणिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
*"दीर्घायुष्य लाभो, आरोग्य उत्तम राहो आणि जनसेवेत नवनवीन यश मिळो."*
सुधाकर मराठे
...तळोदा....