यथार्थचा व्यक्तिमत्व जितकं निरागस आहे, तितकाच तो खोडकरही आहे. घरात तो असला की वातावरण एकदम सक्रिय आणि खोड्या काढण्यात तर तो उस्ताद आहे. त्याची उत्साही आणि भयंकर स्टॅमिना असलेली भावना नेहमीच घरात चैतन्य निर्माण करते.
सुरुवातीला त्याला क्रिकेट खेळता येत नव्हते. बॅट रस्त्यावर आपटल्यामुळे त्याच्या बॅट्सचे फुटणे ही एक दुरुगतच बनली. त्याच्या मित्रांच्या खेळाची पाहणी करताना त्याला निराशा होऊ लागली होती. यथार्थची निराशा पाहून, वडील या नात्याने ते आवडायचे नाही. पण एक दिवस, 17 एप्रिल रोजी माझ्या जवळचा मित्र सारंग शेंडे याच्या मुलगा केतन शेंडे यास क्रिकेट खेळताना पाहिलं. केतनचा खेळ छान होतं आणि यथार्थला त्याच्या समवयीन मुलांबरोबर खेळायला संधी देण्याचं ठरवलं.
नंतर मी यथार्थ आणि केतन यांना स्पोर्ट्स दुकानात नेलं आणि दोघांना बॅट आणि बॉल घेऊन दिलं. त्यानंतर यथार्थने दररोज कष्ट घेतले आणि गल्ली क्रिकेट सुरू केलं. आता 15 दिवस झालेत आणि यथार्थ छान खेळायला लागला आहे. बॅटला चेंडू लागायला लागला आहे, तसेच त्याला बॅट घेऊन उभं राहाणं आणि बेसिक क्रिकेटचे नियम समजून खेळायला शिकला आहे.
हा अनुभव खूपच आनंददायक आहे, कारण यथार्थने आपली मेहनत आणि इच्छाशक्ती दाखवून एक नवीन गती पकडली आहे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा