जीवनात काही व्यक्ती अशा भेटतात, की त्यांची ओळख ही फक्त नावापुरती राहत नाही; तर त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे मन, आणि त्यांची माणूसकी यामुळे ते आपले मार्गदर्शक बनतात.
सुनील भाऊ सूर्यवंशी, म्हणजेच आपले लाडके कालू भाऊ, हे असेच एक व्यक्तिमत्त्व!
कालू भाऊंचा स्वभाव म्हणजे दिलदार, सदाबहार आणि मनमोकळा. त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असतं, आणि त्यांच्या बोलण्यात एक वेगळंच आकर्षण असतं. कोणाशीही मनमोकळेपणाने बोलायचं, ओळखीचं नात्यात रुपांतर करायचं - हे त्यांच्याचकडे जमणारे गुण.
कालू भाऊंना एक खास गुण लाभला आहे.
जे मनात ते तोंडावर!
त्यांच्या बोलण्यात खोटेपणा, दिखावा किंवा अन्यायाला जागा नाही. सत्य आणि प्रामाणिकपणा हे त्यांचे दोन मजबूत खांब आहेत.
आजच्या काळात पैसा सर्वकाही वाटत असताना, कालू भाऊंचं वेगळेपण इथेच जाणवतं. पैसा हा त्यांच्या जीवनातील उद्देश नाही; माणुसकी, नाती, आणि मैत्री हेच त्यांचं खऱ्या अर्थानं धन.
जगात मैत्री ही खरीच असेल तर ती कालू भाऊंची! ते मित्रांसाठी आणि आपल्याच लोकांसाठी नेहमी पुढे असतात. त्यांचं नाव घेतलं की सगळ्या आठवणी हसू आणतात. कारण ते खरोखरच अजातशत्रू आहेत. त्यांच्या मनात कोणाबद्दल राग, कटुता, वा वैरभाव नसतो.
अभ्यास असो किंवा खेळ, कालू भाऊंचं योगदान नेहमीच उजवं! एक उत्तम क्रिकेटर आणि कौशल्यवान हँडबॉल खेळाडू असंख्य खेडाळू त्यांच्या मार्गदर्शनात घडले व घडत आहे.
समाजात काय घडतंय, लोकांना काय हवं, राजकीय बदलांचा कोणावर कसा परिणाम होतो. याची उत्तम जाण कालू भाऊंच्या बोलण्यातून सतत जाणवते.
त्यांची विचारसरणी स्पष्ट आहे आणि निर्णयक्षमता मजबूत.
माझ्यासाठी कालू भाऊ म्हणजे केवळ मोठे भाऊ नव्हेत, ते मार्गदर्शक, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि सातत्याने साथ देणारा आधार आहेत.
त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि माणूसकीमुळे ते माझ्याच नाही, तर अनेकांच्या जीवनात एका खास जागेवर आहेत.
कालू भाऊ वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपण असाच प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव करत राहा!
सुधाकर मराठे
तळोदा..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा