Breking News

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

कोठार परिसरात अस्वलाची दहशत

कोठार परिसरात अस्वलाची दहशत 
 तळोदा तालुक्यातील कोठार परिसरात अस्वलाचा मुक्त संचार सुरु असुन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याकडे लक्ष्य देवून अस्वलाचा बन्दोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.. तळोदा तालुक्यातील कोठार परिसरात अनेकांना अस्वलाचे दर्शन झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तलोदा तालुक्यातील कोठार तोलाचापाडा, अंबागव्हाण, गढी, कोठडा, राणीपुर, धनपुर, आदि गावे सातपुड्याचा पायथ्याशी वसलेले आहेत. सदर परिसरात नेहमी विविध हिंसक प्राण्याचा वावर असतो. मात्र मागील काही दिवसापासून मादी अस्वल व तिचे दोन पिल्ले सदर परिसरात मुक्तपणे संचार करीत असल्याने नागरिकांमधे भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतात कामावर जाणार्‍या मजुरांमध्ये व सकाळी तलोदा येथे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनामधे भीतीचे वातावरण आहे. आठवडाभरात चार ते पाच वेळा मजुरांना व शाळकरी विद्यार्थ्यांना अस्वलांचे दर्शन झाले आहे. मागील 2 वर्षापूर्वी रांझणी येथील पांढरकीबाई ताराचंद पाडवी ही गोपाळपुर शिवारात जळावू लागूड गोळा करण्यास गेली असता. अस्वालाच्या हल्यात तिच्या मृत्यु झाला होता.
तालुक्यात वनप्राण्यांचे हल्यात सातत्याने वाढ होत असुन अनेकांना जिव गमवावे लागत आहे. अस्वलांचे अनेकांना दर्शन जरी झाले असले तरी अद्याप स्थानिक शेतमजूर, ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थ्यांमधे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने ह्याकड़े लक्ष्य देवून त्वरित अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोठार व परिसरातील नागरिकांनी केली आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा