गंगानगरच्या पाण्यासाठी 30 लाखांचा निधी
दै. पुण्यनगरी च्या वृताने प्रशासन कामाला: जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत तऱ्हावद गंगानगर येथील पाणी समस्या व इतर कामासाठी जिल्हापरिषदेच्या आदिवासी उपाययोजने अंतर्गत 30 लाखाच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतुन गावात पाण्याची सोय केली जाणार आहे. सदर निधीमुळे विस्थापितांच्या पाण्याच्या प्रश्न कायमच्या मार्गी लागणार आहे. याबाबत नुकतेच दै. पुण्यनगरीने येथील समस्याबाबत सचित्र वृत्त प्रकाशित केले. या वृत्तांच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे विस्थापितांनी समाधान व्यक्त केले आहे.
तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद (गंगानगर) गावातील पाण्याची समस्यांने उग्ररूप धारण केले आहे. ग्रामस्थाना दूषित पाण्याने तहान भागवावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात होता. आश्वासन देऊन हि समस्यां सुटत नसल्याने ग्रामस्थामध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत 3 सप्टेंबर रोजी दै. पुण्यनगरीने गंगानगरकरांची पाण्याची समस्या सुटणार कधी या शिर्षका खाली सचित्र बातमी प्रसिद्ध केली होती... सन 2002 मध्ये तऱ्हावद पुनर्वसन येथे तेरा गावठानाचे पुनर्वसन करण्यात आले होते. या गावाची लोकसंख्या दोन हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः आठशे 86 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासना कडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन गाव विस्तथापित करण्यात आले..मात्र विस्थापितानंतर येथील रहवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन 2002 मध्ये गावाला आमदार निधी व नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75 हजार लिटरची एक पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून
गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थानी केली आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे गंगानागरकरानी आपल्या विविध मागण्याबाबत 27 जानेवारी 2016 रोजी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 8 महिने उलटूनही समस्या न सुटल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र या समस्यांबाबत दि 3 सप्टेंबर रोजी दै. पुण्यनगरी मधून सचित्र वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृताची जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ क्लशेट्टी यांनी तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार 14 सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत आदिवासी उपाययोजने अंतर्गत विस्थापित झालेल्या तऱ्हावद पुनर्वसन गंगानगर गावातील पाणी समस्या व उपाययोजनेसाठी 30 लाखाच्या निधी मंजूर करण्यात आला. मंजूर निधीमुळे पाण्याची समस्यां सुटण्यास मदत होणार आहे. या निधीतून 22 लाखाची रु खर्चून साडे सात कि.मी. पाण्याची पाईप लाईन केली जाणार आहे. दीड लाख रु रकमेचा स्विच रूम उभारला जाणार आहे. तसेच सोयीनुसार 5×2 प्रमाणे 3 लाख खर्चून 2 सार्वजनिक हौद, 80 हजार रकमेचे यंत्र सामुग्री बसविण्यात येणार आहे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा