Breking News

बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

गंगानगरकरांची पाण्याची समस्या सुटणार कधी ?

तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत असलेले तऱ्हावद गंगानगर गावातील पाण्याची पाण्याची उग्ररूप धारण करीत आहे. 9 हातपंपापैकी 7 हातपंप नादुरुस्त असून मागील दोन वर्षापासून गावातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. ग्रामस्थाना दूषित पाण्याने तहान भागवावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. आश्वासन देऊनही समस्यां सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पुनर्वसन करून आमची फसवणूक केल्याचा आरोप पुनर्वसितानी केला आहे...
 तळोदा तालुक्यातील तऱ्हावद पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद गंगानगर या विस्थापित गावाची पाण्याची समस्या गँभिर बनली आहे. सन 2002 मध्ये 13 गावठानाचे पुनर्वसन गंगानगर येथे करण्यात आले. या गावाची लोकसंख्या 2000 हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः 886 कुटुंबे येथे राहतात. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासनाकडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन येथे बाधितांचे गाव विस्तथापन करण्यात आले.. मात्र विस्थापनानंतर येथील रहिवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसनानंतर सन 2002 मध्ये या गावाला आमदार निधी व
नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75000 लिटरची एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. परंतु लोकसंख्येनुसार सदर पाण्याची टाकी गावकऱ्यांना पुरेशी नाही. या टाकीतून अर्ध्याच गावाला पाणी मिळते. त्यात ही सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पाईप लाईनमधून दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात साथीच्या आजारासह त्वचा विकाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणत आहेत. भर पावसाळ्यात गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत तसेच इतर मागण्याबाबत 27 -01-2016 रोजी गावकऱ्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या
नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आठ महिने उलटूनही समस्या न सुटल्याने आजही गावातील महिला व मुलांना रोजगार, शिक्षण सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या आरोप ग्रामस्थानी केला आहे... संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन समस्यां सोडवण्याची मागणी केली आहे.

 नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात आठ महिन्यांपूर्वी पाण्याच्या प्रश्न मार्गी लागावा यासह काही प्रमुख मागण्यांसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी व नर्मदा विकास प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याभरात कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप समस्या न सुटल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकांती करावी लागत आहे. 
 शामसिंग पाडवी ग्रामस्थ गंगानगर







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा