Breking News

सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

२० वर्षाचा प्रतिक्षेनंतर पोहचली ठाण्याविहीरला बस

२० वर्षाचा प्रतिक्षेनंतर पोहचली ठाण्याविहीरला बस 
        `पुण्यनगरी' वृत्ताची दखल,
गावकऱ्यानी साखर वाटून साजरा केला आनंद.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या उत्तरेकाडील 10 ते 15 गावातील 16 हजारापेक्षा अधिक नागरिकांना मागील विस वर्षापासुन बससेवे पासुन वंचित राहावे लागले. सुमारे 20 वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टित फरशी पुल तुटलाने बससेवा बंद करण्यात आली होती. बससेवा सुरु करण्याकरिता परिसरातील          ग्रामस्थ ठाण्याविहीरचे पदाधिकारी व न्यू इंग्लिश स्कुलच्या शिक्षकांच्या नियमित पाठपुरावामुळे 26 जानेवारी गणतंत्रदिनी सदर बस सेवा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. याबाबत पुण्यनगरी मधुन आमचे प्रतिनिधी सुधाकर मराठे ह्यांनी वारंवार बस सेवा सुरु करण्याबाबत मागणी सातत्याने केली.
त्या वृताची वरिष्ठ पातळीवर द्खल घेवुन बससेवा सुरु झाली आहे. गावात आलेली बस पाहण्याकरीता गावकऱ्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ग्रामस्थानी साखर वाटप करुण आपला आनंद साजरी केला... अक्कलकुवा तालुक्यांतील ठाणाविहीर परिसरात पक्के रस्ते असुनही गावकऱ्याना बससेवा पासून वंचित राहावे लागत होते. तालुक्यातील उत्तरे भागातील ठाणाविहिर, आमली, सावर, गुलीआंबा, पिंपळगाव, कुंडलेश्वर, इच्छागव्हान, पिंपरपाड़ा, मोवलीपाड़ा, सिंगपुर, हुजुड़बा, अलिविहिर, नवलपुर, सोजड़ांन, अश्या 10 ते 15 खेड़े गाव आहेत. ह्या गावांची एकूण लोकसंख्या 16 हजारापेक्षा अधिक आहे.
वरील सर्वच गावातुन 300 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेण्याकरीता अक्कलकुवा, तलोदा, येथे पायपीठ करीत येत असतात. 20 वर्षापुर्वी झालेल्या अतिवृष्टित ठाण्याविहीर फरशी पुल वाहून गेल्याने सदर बससेवा बंद झाली होती. काही दिवसांनी फरशी पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र अक्कलकुवा आगाराकडून रस्ते सर्वेक्षण अभावी गावकऱ्याना बस सेवा सुरु करण्यात आली नव्हती. ह्याबाबत ठाण्याविहीर ग्रुपग्रांमपंचायतचे सरपंच मानसिंग वळवी, रामसिंग नाईक(गुरूजी) ग्रामसेवक जी जे वसावे, आदिनी बससेवा सुरु करण्याकरिता सातत्याने आगार प्रमुखांकडे मागणी केली. मात्र यावर पोकळ आश्वासने देण्यात
येत होती. न्यू इंग्लिश स्कुल येथील प्राचार्य एस.एस.साळवे, पर्यवेक्षक व्ही.बी.पाटील व शिक्षक ह्यांच्या सहकार्याने नविन नियुक्त झालेले अक्कलकुवा आगार प्रमुख महेंद्र पाटील ह्यांची भेट घेतली. श्री पाटील ह्यांनी त्वरित धुळे विभागीय कार्यालयाकडे रस्ता सर्वे करण्याचा मागणी प्रस्ताव सादर केला. मंत्रालयाकडून रस्ता सर्वे करुण जीपीएस ट्रक मिळाला. 26 जानेवारी ह्या दिवसाचे औचित्य साधुन त्वरित बससेवा सुरु करण्यात आली. तब्बल विस वर्षानंतर गावात सुरु झाल्यामुळे गावकऱ्यानी अबाल वृद्धसह गर्दी केली. ह्यावेळी गावकऱ्यांचा
आनंद वाखाडणाजोगा होता. आणि त्याहुन अधिक आनंद झड़कत होता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कारण शिक्षणासाठी मैलोमेल करावी लागणारी पायपीठ त्यांची थांबणार होती. यावेळी अक्कलकुवा आगार प्रमुख महेंद्र पाटील,स्थानक प्रमुख रविंद्र जगताप, वाहन चालक अनिल वसावे, कंडक्टर पोपटराव गोफने, वाहतूक निरीक्षक सागर पाडवीं, आगार लेखाकार बी.के.वसावे, सहायक वाहतूक निरीक्षक एस.एस.खरडे,कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रताप वळवी, इंग्लिश स्कुलचे पर्यवेक्षक व्ही.बी.पाटील, शिक्षक एम्.जी.मगरे, व्ही.एस.साळवे, के.आर.वळवी,सुधाकर मराठे, टी.आर.सावरे ह्यांच्या सरपंच मानसिंग वळवी,
उपसरपंच पाडवी, ग्रामसेवक जी.जे.वसावे, सुरूपसिंग नाईक, सरवरसिंग नाईक,भगतसिंग सुनीताबाई पाडवी, कविताबाई पाडवी, शंकर कोठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर ग्रामस्थ, सरपंच व विद्यार्थ्यांकडून शिक्षक तथा पुण्यनगरी प्रतिनिधी सुधाकर मराठे ह्यांच्या विशेष सत्कार करुण त्यांचे आभार मानले...
न्यू इंग्लिश शाळेतील शिक्षकांकडून
विद्यार्थ्यांना फुकट बस पासेस, ठाण्याविहिर परिसरातील 70 ते 80 विद्यार्थी नियमित पने अक्कलकुवा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे शिक्षण घेण्याकरिता पायपीठ करुण यावे लागत होते. तर काही विद्यार्थी हे खाजगी वाहनात कोंबुन शाळेत येत होते, ह्याकरिता न्यू इंग्लिश स्कुल येथील  प्राचार्य एस.एस.साळवे, प्रयवेक्षक व्ही.बी.पाटील शिवदे, सुधाकर मराठे, एम्.जी.मगरे ह्यांनी नियमित अर्ज फाटे करुण बससेवा सुरु
करण्याबाबत पाठ पुरावा केला. सदर बससेवा सुरु झाल्याने गावातील ग्रामस्थानी शिक्षकाचे शॉल पुष्पगुच्छ देवून आभार मानले. ठाण्याविहीर परिसरातील 65 विद्यार्थ्याना शिक्षकांच्या वैयक्तिक खर्चातून बस पासेस काढून देण्यात आले. त्यात मानवविकास योजना व सावित्रीबाई योजना अश्या विविध योजनाचा फायदा विद्यार्थ्याना मिळवून दिला. सदर पासेस काढण्या करिता व्ही.बी.पटेल,एस.डी.शिवदे, के.के.आर.वळवी, एम्.जी.मगरे,सुधाकर मराठे टी.सावरे आदिनी परिश्रम घेतले                             
(महेंद्र पाटील आगार प्रमुख अक्कलकुवा) अक्कलकुवा ते इच्छागव्हन हि बस दररोज अक्कलकुवा येथून पहाटे 6:30 वाजता निघणार आहे , तसेच दुपारी 12:30 वाजता व सायंकाळी 5 वाजता अश्या तीन वेळेस बसचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. तसेच सदर बसचा विविध योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान अक्कलकुवा आगार प्रमुख महेंद्र पाटील ह्यांनी केले आहे. (तब्बल विसवर्षानंतर गावात बससेवा सुरु झाल्याने ग्रामस्थानी आनंद साजरी केला.. विस् वर्षापुर्वी वंनविभागाकडून ठाणाविहीर परिसरात बससेवा सुरु होती. मात्र अतिवृष्टित ठाणाविहीर रसत्यावरील फरशी पुल वाहून गेल्याने सदर बससेवा बंद करण्यात आली होती. तदनंतर तब्बल 20 वर्षानंतर बससेवा सुरु झाल्याने गावातील ग्रामस्थाचा आनंद गगनात महावेनसा झाला. बस पाहण्याकरिता गावातील बालक गृहस्थ सर्वाणीच् मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लहान बालकानी नाचुन तर मोठ्यानी साखरेचा प्रसाद वाटून आपला आनंद साजरी केला.

10 जुन ह्या रोजी दै.पुण्यनगरी वृत्तपत्रात छापुन आलेली बातमी. पत्रकार सुधाकर मराठे ह्यांच्या सत्कार करुण आभार मानताना सरपंच व ग्रामस्थ





 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा