Breking News

रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

प्रेरणादायी व्यतिमत्व: भरतभाई माळी

प्रेरणादायी व्यतिमत्व: भरतभाई माळीतळोदा पालिकेचे प्रतोद व समस्त माळी समाज सुधारणा मंडळाचे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशाचे अध्यक्ष भरतभाई माळी यांचा जन्म दि. ६ फेब्रुवारी १९६७ रोजी झाला. भरतभाईच्या व्यक्तिमत्व व कर्तुत्व १९८० दशकात नावारुपाला आले. पुणे विद्यापीठातील विद्यार्थी परिषद् निवडणुकीत भाग घेवुन राजकारणाचा कित्ता गिरवायला सुरुवात केली. १९९१ साली वयाचा केवळ २४ व्या वर्षी तळोदा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होण्याचा मान त्यानी मिळवला. तेव्हापासुन ते आजतागत भरतभाई माळी व तळोदा शहर हे समीकरण तयार झाले आहे. आज तळोदा शहराचे वा किंबहुना नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण असो वा समाजकारण असो भरतभाईना वगळून पुर्ण होवु शकत नाही. मागील २० वर्षापासुन या राजकारण व समाजकारण महत्वाचे केंद्रबिंदु राहिले आहेत. त्यांच्या स्वभावातील महत्वाचे गुणवैशिष्टयामुळे त्यांच्यावर प्रेम व आस्था राखणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पक्षाबरोबरच राजकारणातील विरोधकांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. नगराध्यक्षापदी विराजमान होवुन त्यानी शहराला विकासाच्या मार्गावर आणून ठेवले आहे. रस्ता दुभाजकाचे पडलेले काम पूर्णत्वाकडे आणले आहे. रस्ते विकास,चौक सुशोभिकरण व तापी पाणीपुरवठा योजना मंजुर करुण तळोदा शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्याच्या पर्यत्न सुरु आहे. हे सर्व करीत असताना समाजकारण अजिबात सोडले नाही. माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष म्हणुन ज्या ज्या ठिकाणी माळी समाज राहतो. त्या त्या गावी जावुन समाजात बैठक घेणे व चालिरिती, परंपरा यांची चर्चा करणे, त्यात सुधारणा घडवुन आणणे हे अविरतपने सुरु आहे. जळगाव येथे विद्यार्थ्याना शिक्षणासाठी हाल अपेष्टा भोगाव्या लागतात. हे हेरुण सुधारणा मंडळाचे वस्तीगृह त्यांच्या नेतृत्वाखाली नावारुपाला येत आहे. भरतभाई माळी खरेखुरे समाजभुषण, तळोदा भुषण आहेत. या सर्व कामी पिताश्री कै. बबनराव पहेलवान यांनी दिलेल्या मंत्र सदैव प्रेरणादायी आहे. मातोश्री विमलबाई माळी, मोठे बंधु आप्पासौ. लक्ष्मण माळी यांचे आशीर्वाद मार्गदर्शन लहान बंधु नगरसेवक तसेच गणेश सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय माळी, पत्नी नगराध्यक्षा सौ.योजना माळी यांची साथ या जोरावर भरतभाईनी या शहराचा गाड़ा समर्थपने चालविला आहे. शाहराची पर्यायाने जिल्ह्याची उत्त्तरोतर प्रगती होवो यासाठी भरतभाईना उदंड आयुष्य लाभों. हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा