Breking News

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

पाडळपुर वटवाघुळाचे गाव

शहरापासून उत्तरेला अवघ्या 15 km अंतरावर पाडळपुर हे 100 टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे सदर गाव सातपुड्याच्या पायथ्याशी वेसले असून हे गाव एका विशिष्ट कारणाने तालुक्यात परिचित आहे. ह्या गावात प्रवेश करतानाच आपल्याला एका मोठ्या झाडावर शेकडो वटवाघूड़े उलटे लटकलेले आढळून येतात. जणू गावात येणाऱ्या पाहुन्यांचे ते वटवाघुळे स्वागतच करीत असावेत असे वाटते. रात्रीच्या प्रावासानंतर दिवस उजाडण्यापूर्वी सर्व वटवाघुळे पुन्हा त्या झाडावर विसावतात ते आधार होण्यापर्यन्त हां दररोजच्या उपक्रम असुन दिवसा झाडावर उलटे लटकलेले हे वटवाघुळे आकर्षणाच्या विषय ठरतात. महाराष्ट्रात मुंबई नजिक मामाचे गाव आहे. ते पर्यटकांचे आकर्षण असल्याचे म्हटले जाते. त्याचप्रमाणे सातपुड्याच्या पायथ्यालागत असलेले नंदुरबार जिल्ह्यातील तलोदा तालुक्यात पाडळपुर हे गाव वटवाघुळाचे गाव म्हणून परिचित आहे. ह्या गावात वटवाघुळे हजारोच्या संखेने चिंचेचा झाडावर वास्तव्य असल्याने ते येणाऱ्या जाणाऱ्यांचे आकर्षण ठरते.. तलोदा तालुक्यातील पाडळपुर हे 100 टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव,गावात सुमारे एक हजार लोक वास्तव्यास आहेत.
गावाला लागुणच सातपुड्याच्या पर्वतरांगा चहुबाजुनी लहान मोठ्या टेकड्या पाडळपुर,गढ़वली नजिक लघुप्रकल्प वरपाड़ा गावा नजिक छोटेसे मातीचे बांध ह्यांच्यात गावाचे वास्तव्य शेती व शेतमजुर हां गावकऱ्याचा पारंपारिक व्यवसाय असला तरी गावाला राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. गावाचे पोलीस पाटील म्हणून ओळख असलेले ग्रामपंचायत सदस्य ते जि.प.सभापती राहीलेले माजी जि.प.सदस्य धनसिंग ठाकरे ह्यांच्या घराजवळ चिंचेचे दोन तीन झाडे आहेत.सदर झाडे हे सुमारे सव्वाशे वर्षापुर्वीचे असल्याचे जानकार सांगतात. सुरवातीपासूनच ह्या झाडांवर वटवाघुळाचे वास्तव्य आहे. दिवसभर पक्ष्याचा किलबिलाट सायंकाळी आधार पडल्यावर अन्न व पाण्याच्या शोधात निघालेली ही वटवाघुळे दिवस उजाळण्या अगोदर पुन्हा ह्या झाडावर येवून विसावतात गावकरी देखील वटवाघुळावर प्रेम करतात.लग्न असो वा इतर समारंभ वटवाघुळाना त्रास जानवेल म्हणून गावात कधीच फटाकडे फ़ोडले जात नाहीत. सदर पक्षयांचे उड़ने व परत येणे ह्यातून
गावकऱ्याना वेळ समजत असे, सदर वटवाघुळे पुरातन काळात दुष्काळाच्यावेळी येथे वास्तव्याला आले असावेत असे जानकार म्हणतात.पाडळपुर हे निसर्गाच्या वास्तव्यात वेसले आहे सातपुद्यांच्या पर्वत रांगा लहान मोठ्या टेकड्या गढ़वली,रोझवा, ह्यासह विविध गावातील लहान मोठे बंधारे ह्यामुळे श्रावन महिन्यात निसर्गप्रेमी व पर्यटक ह्या गावास भेटी देतात. चिंचेच्या झाडावर वटवाघुळाच्या वास्तव्याने व त्यांची किलबिलाट पर्यटकांचे लक्ष्य वेधुन घेते. मोठ्या कुतुहलाने पर्यटक ह्याबबतची माहिती गावकऱ्याकडून जाणून घेतात. पर्यटक व्म निसर्गप्रेमिना ही वेगळीच नेजवानी असते.आपला मोबाईल व कैमेरात ह्या वटवाघुळाचे चित्र कैद करण्याचा मोह पर्यटकाना होने स्वाभाविक आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा