तळोदयात दरोंडे खोराना सामोरे गेलेल्या
डिंपलच्या धाडसी वृतीला पोलिसांच्या सलाम !तळोदा शहरात घरफोडे खोरानी दहशत पसरवित एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या केल्या ह्यावेळी दरोडेखोरानी घरातील व्यक्तींवरही हल्ला केला. मात्र एका घरात एका 20 वर्षीय तरुणीने त्यांचा दरोड़याचा प्रयत्न हानुन पाडला. दरोडे खोरांच्या तावडीत सापडलेल्या ह्या तरुणीने वेळीची समय सुचकता व धाडस दाखवत त्यांच्या कच्चाटयातुन स्वतःला सोडवत आरडा ओरड करीत दरोडे खोराना पळ काधन्यास भाग पाडले. शक्तीपेक्षा युक्ती मोठी ह्या म्हणी नुसार त्या तरुणीने दाखविलेल्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.. तिच्या ह्या धाडसाची दखल पोलीस विभागाने देखील घेतली असुन पोलीस अधीक्षक महेश घुर्ये ह्यानी तिचा गौरव केला आहे... तलोद्या शहरात दि.19 जून रोजी दरोडे खोरानी हैदोस घातला शिवसेना शहर प्रमुख ह्यांचावर प्राण घातक हल्ला करुण 1 लाख 5 हजार 500 रु रकमेचा धाडसी दरोडा पडला. ह्याच रात्री 1:20 वाजेच्या सुमारास दामोदर नगर मधे राहणाऱ्या छोटुभाई नथु पाटील ह्यांच्या घरातही दरोडे खोरानी प्रवेश केला. घरात चार दरोडे खोर पाटील ह्यांची कन्या डिंपल हिच्या खोलीत जाऊंन कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी कपाटाचा आवाज आल्याने गाढ़ झोपेत असलेल्या डिंपलला जाग आली, मात्र आपले वडील असतील ह्या विचाराने तिने दुर्लक्ष केले. व डिंपल जागी झाली आहे हे लक्षात आल्याने दरोडे खोरानी तिला उठावत तिचे दोघे हाथ धरून ठेवत कपाटात काही मिळेल का, ह्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र दरोडे खोरांचा तावळीत सापडलेला डिंपलने साहस एकवटून मोठ्या दरोडे खोरांच्या तावडीतुन स्वतःची सुटका करीत पळ काढला. भयभीत अवस्थेत वडिलांच्या खोलीकड़े येत तिने छोटुभाई ह्यांना घरात चोर शिरल्याची माहिती दिली. मात्र तू स्वप्न पाहिले असेल असे
सांगून डिंपलची समज काढण्याचा प्रयत्न केला. मात्र डिंपलने खरच घरात चोर शिरले असल्याचे सांगितले भयभीत डिंपलला घेवून छोटूभाई तिच्या खोलीकडे जाऊ लागले. मात्र डिंपलने वडिलांना खोलीत न जाऊ देता दरवाजा बंद केला. येवढ्यात दरोडे खोरानी फ़िल्मी स्टाइलमधे दरवाजा उघडण्याची धमकी दिली. दरोडे खोरांची धमकी ऐकूण छोटूभाई ह्यांच्या घरात चोर शिरल्यावर विश्वास बसला. त्यानी जोर जोरात आरोळया मारीत नातेवाइकाना भ्रमणध्वनीवरुण माहिती दिली.. डिंपल व छोटुभाई ह्यांनी दिलेल्या आरोळयांमुळे दरोडे खोरानी तेथून पळ काढला... दरम्यान दरोडे खोरानी डिंपलच्या पर्स मधून साडे तीन हजार रुपयांची रोकड़ चोरून नेली. डिंपल हिने दाखविलेल्या धाडसमुळे मोठी चोरी तळली. सदर बाब पोलीस अधीक्षक महेश घुर्ये ह्यांना कळाली त्यांनी तलोदा भेटित डिंपलला तिच्या पालकांसह पोलीस ठाण्यात बोलावून तिचा गौरव केला.. डिंपलने दाखविलेल्या धड़साचे संपूर्ण शहरात कौतुक करण्यात येत आहे..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा