Breking News

बुधवार, १७ जून, २०१५

आदिवासी कुटूंबातील अँड़ ईश्‍वर ठाकरे बनले न्याय दंडाधिकारी


सुधाकर मराठे : घराची प्रतिकूल परिस्थिती असतांना ऊसतोड व दगड फोडून अँड़ईश्‍वर ठाकरे यांनी वकीलकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर या खडतर  प्रवासाचा संघर्ष सुरू ठेवत अँड़ईश्‍वर ठाकरे यांनी आदिवासी संवर्गातून न्याय दंडाधिकारी पदावर बसण्याचा बहुमान मिळविला आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अँड़ईश्‍वर ठाकरे यांचे आगमन झाल्याने पाडळपूर ते जांभाई रस्त्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. सातपुड्याशी पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील जांभाई येथील अँड़ईश्‍वर ठाकरे यांनी जिद्द व चिकाटीतून यशाचे शिखर गाठले आहे. अतिदुर्गम भागात शिक्षणाच्या समस्या असतात. मात्र अँड़ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीसह समस्यांवर मात करून उच्च शिक्षण मिळविले आहे. जांभाई येथील जामसिंग सिंगा ठाकरे व सिंगीबाई ठाकरे या दाम्पत्यांना चार मुले व तीन मुली आहे. कुडाच्या घरात राहून हे कुटूंबिय आपल्या
उदरनिर्वाहसाठी ऊसतोड व दगड फोडण्याचे काम करतात. अँड़ईश्‍वर ठाकरे यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी जांभाई, प्रकाशा व कोठार येथील आश्रमशाळेत शिक्षण घेतले. तसेच धुळे येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी पैशांची गरज भासू लागल्याने ईश्‍वर ठाकरे यांनी ऊसतोड व दगड फोडून विधी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. गेल्या काही वर्षांपासून ते तळोद्यात वकीलकीचा पेशा करीत आहेत. मात्र शिक्षणाची आवड व यशाची शिखर गाठण्याची जिद्द कायम असल्याने अँड़ईश्‍वर ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाची लेखी परीक्षा त्यांनी दिली. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाल्याने मुंबई येथे घेण्यात आलेल्या मुलाखतीत ईश्‍वर ठाकरे यांची राज्यात आदिवासी संवर्गातुन निवड झाली आहे.यशाचे शिखर गाठल्याने त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. खांद्यावर घेऊन मिरवणूक प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झाल्याने अँड़ईश्‍वर ठाकरे यांची पाडळपूर ते जांभाई या रस्त्यावरुन पारंपारीक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अँड़ठाकरे यांना खांद्यावर घेत ढोल-ताश्यांच्या गजरात नृत्य करुन त्यांचे कौतूक करण्यात आले. यावेळी चाहत्यांसह ग्रामस्थांनी ठाकरे यांच्या निवडीचा एकच जल्लोष केला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा