Breking News

सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

संतोष वानखेडेनी साकाराला पालेभाजीच्या गणपती

संतोष वानखेडेनी साकाराला पालेभाजीच्या गणपती बालगोपाला पासुन ते वयोवृद्द गणेश उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. सर्वत्र शहरी व ग्रामीण भागात गणेश मंडळ सज्ज होवून विविध मंडळांतर्फे 'श्रीं'ची प्रतिष्ठापना मोठय़ा उत्साहाने करण्यात आली होती. त्यातच तलोदा शहरातील संजय वानखेड़े यांनी तयार केलेल्या भाजीपालाच्या गणेश मुर्तीला पाहण्यासाठी भाविकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तलोदा येथील दत्त कॉलोनीतील गुरुकुल गणेश मित्र मंडळाचे सदस्य संतोष गोपीचंद वानखेड़े ह्यांचे गणरायावर विशेष श्रद्धा आहे. दर वर्षी विविध रुपात नाविन्यपूर्ण गणेश मूर्ती स्वतः तयार करुण श्री ची स्थापना करत आहे. मागील 3 वर्षापासुन एक आगळा वेगळा उपक्रम ते राबवित आहेत. दिवसें दिवस वाढत चाललेली महागाई, सातत्याने पालेभाजीच्या वाढता दर पाहून चक्क भाजिपालाचा गणपती साकारण्याचा निर्धार संतोष वानखेड़े ह्यांनी घेतला, महागाई कमी करण्याची मागणी गणरायाकड़े करत विविध पालेभाज्यांचा वापर करुण आकर्षक गणपती मूर्ती तयार केली. यात दुधळी, वांगी, सुरन, काकड़ी, कोबी, कारले आदि पाले भाज्यांच्या वापर करुण सुंदर व देखणी गणेश मूर्ती साकारलीआहे. तर यापूर्वी ही विविध टाकाऊ वस्तुंपासुन आकर्षक गणरायाची मूर्ती साकारल्याचे संतोष वानखेड़े सांगतात. मागील वर्षात झाड़ू, टोपली, आदि कामट्यांच्या साहाय्याने विशेष मूर्ती बनविली होती. सदर मूर्ती पाहन्याकारिता भाविकानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा