Breking News

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

सातपुड्याच्या आवाज गुजतोय सातासमुद्रापार

सातपुड्याच्या आवाज गुजतोय सातासमुद्रापार जीवनात सर्वकाही करीत असताना एक छंद जरूर जोपासवा, या पु.ल. देशपांडे यांचे आवाहन उराशी बाळगुन तबलावादनाचा छंद जोपासणार्‍या तळोदा येथील समीर सूर्यवंशी याने सातासमुद्रापार आपल्या तबल्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अमेरिकेतील लॉस एंजिल्ससह विविध शहरांमध्ये पुणे येथील संतुरवादक डॉ.धनंजय वेठनकर यांच्यासोबत त्याची जुगलबंदी चांगलीच रंगली. आपल्यात असलेली कला ओळखून त्याचा छंद जोपासल्यास डोळे दीपवणारे यश प्राप्त होते हे सातपुड्याच्या पायथ्याशी असणार्‍या तळोदा गावातील समीर सूर्यवंशी याने सिद्ध करुन दाखवले. मुळचा तळोद्यातील समीर सूर्यवंशी याने नुकतेच अमिरिकेतील लॉस एंजिलिस, सॅनफ्रांसिस्को, सनदियोगो सारख्या विविध शहरात कार्यक्रम सादर करुन रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळविली. समीर सूर्यवंशी यांना इंडियन क्लासिकल आर्ट फाऊंन्डेशन (आय.सी.एम.ए) यांच्याकडून आमंत्रित करण्यात आले होते. ही संघटना दरवर्षी अमेरिकेत भारतातील संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या कलाकारांना
आमंत्रण देत असते. यंदा पुणे येथून तबलावादक समीर सूर्यवंशी व संतूरवादक डॉ.धनंजय वेठनकर यांच्या जुगलबंदीचे कार्यक्रम दि.२८ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत अमेरिकेतील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यात सूर्यवंशी यांनी आपल्या कलेचे सादरीकरण करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. याबाबत समीर सूर्यवंशी यांची भेट घेतली असता ते म्हणाले, अमेरीकेत भारतीय संगीतबद्दल कमालीची आवड व आदर दिसून येतो. यावेळी काही स्थानिक कलाकार लोकांशी परिचय झाला. ही अमेरिका वारी माझे संगीत व तबला वादकास निश्‍चित समृद्ध करणारा ठरणार असल्याचे त्याने सांगितले. असा घडला समीर तळोदा येथील गो.हू.महाजन शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेणारा समीर हा शाळेत फावल्या वेळेत लाकडी बाक वाजवत असे. अगदी लहानपणापासून ज्या वस्तुमधून आवाज बाहेर निघेल अश्या ठिकाणी नेहमी त्याची बोट थिरकत असत. त्याचे आजोबा रणछोड गुरूजी यांच्या ते लक्षात आले व त्यास स्थानिक तबला वादक गुरु गुरव गुरूजींकडे तालीम सुरु केली.वयाच्या ८ व्या वर्षी गावात पहिला कायर्क्रम सादर केला. नंतर विविध छोट्या-मोठ्या
कार्यक्रमात तबला गुंजु लागला. येथील कनिष्ठ महविद्यालयात १२ वी शिक्षण झाल्यानंतर समीरने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र तबला विषयात १९९२ साली बी.ए.(विशारद) करुन तबला विषयात पदवी घेतली. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची तबला अलंकार म्हणजेच एम.ए. ही पदवी त्यांनी संपादित केली. सध्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या संगीत ऍकॅडमीत संगीत विभागप्रमुख म्हणून तो कार्यरत आहे.उल्लेखनिय म्हणजे खान्देशात पहिला संगीत क्षेत्रातील कलाकार म्हणून त्यांची ओळख असून याअगोदर त्यांनी आपल्या तबल्याची साथ भजन सम्राट अनूप जलोटा, उस्ताद दिलशाब खान, पंडित आंतरराष्ट्रीय किर्तीचे मिलेसुर मेरा तुम्हारा फेम लुइस बैंक अश्या दिग्गज
कलाकारांसोबत तबलाची साथ दिली आहे.समीर सूर्यवंशी यांना अखिल भारतीय नाट्य परिषद, कला गौरव पुस्कार, स्वर सागर पुरस्कार, जानता राजा प्रतिष्ठान पुरस्कार, प्रभात फाऊंडेशन पुरस्कार, वसंतराव देशपांडे फाऊंडेशन पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. समीरपूणे तळोद्याचे नावही सातासमुद्रापार गेले आहे.......
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा