Breking News

शुक्रवार, ११ मार्च, २०१६

अहो आश्चर्यम.......मकाच्या एका ताट्याला चार कणसं!

कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ तर कधी गारपीट या निसर्गाकडून वारंवार होणाऱ्या अवकृपेने शेतकरी त्रस्त झाला आहे. मात्र याच निसर्गाची जेव्हा कृपा होते तेव्हा बळीराजा निश्चितच हरखून जातो. असेच एक उदाहरण तळोदा तालुक्यातील रांझणी येथे पाहायला मिळत आहे. निसर्गाची करणी नारळात पाणी असे आपण नेहमी म्हणतो. तर रांझणी शिवारात एका शेतकऱ्यांच्या शेतात मकईच्या एका तोट्याला चक्क चार कणसे लागल्याने ते पाहायला संपूर्ण परिसरातील शेतकरी यांच्यासह कृषी विभागातील अधिकाऱ्याची पावले शेताकडे वळू लागली आहेत. हा निसर्गाच्या चमत्कारच असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे.... तळोदा तालुक्यातील रांझणी येथील प्रगतशील शेतकरी तुंबा गोविंद मराठे यांनी रांझणी शिवारातील आपल्या चार एकर क्षेत्रात डिसेंबर महिन्यात मका लागवड केली आहे. जोमाने पीक वाढू लागला आणि कणसं फुटण्याच्या अवस्थेत आलं. हळूहळू कणसं फुटू लागली आणि काय चमत्कार, शेतातील बहुसंख्य ताटयांवर एक नव्हे तर चक्क चार-चार कणसं लागलेली आहेत. मकाच्या ताटयाच्या मध्यभागी कणसं तर शेडयांवर तुरा असतो. या मक्याच्या तुऱ्यातुन काही ज्वारी व दादर सदृष्य दाण्याची कणसं बाहेर आली आहेत. आजपर्यंत शिवारात कुणाच्याही शेतात एकाच ताटयावर चार-चार कणीस लागल्याचे उदाहरण नाही. प्रथमच अश्याप्रकारे कणसं दृष्टीस पडत असल्यामुळे शिवारातील बहुसंख्य शेतकऱ्यानी ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे निसर्गाचा हा चमत्कार नेमका कसा झाला हे जाणून घेण्याची देखील अनेकांना उत्सुकता आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा