Breking News

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

दोन्ही पक्षी एकत्रच उडाले

माझे दोन्ही पक्षी एकत्रच ऊडाले, मला खांदा देण्यासही कोणी थांबले नाही,
ऐन तारुण्यात अपघाती मृत दोन्ही लेकरांच्या पुत्रवियोगाने शोकाकुल विव्हळत्या पित्याची ही आर्तवेदना तळोदेकरांना सुन्न करुन गेली. धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तळोदा येथील राहूल देवीदास पाटील व विशाल देवीदास पाटील दोघा सख्ख्या भावांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल मोठा मुलगा राहूल याचा मृतदेह सापडला तर लहान मुलगा विशाल याचा मृतदेह आज सकाळी ९ च्या सुमारास सापडला. दोन्ही तरुण मुलांचे एकाच दिवशी निधन झाल्याने त्यांचे पिता देवीदास पाटील यांनी टाहो ङ्गोडला. ज्या वयात तरुण मुलांनी बापाच्या खांद्याला खांदा लावून परिवारांत आनंद फुलवायचे दिवस होते त्याचवेळी काळाने अत्यंत भयानक वज्राघात करावा आणि बापावरच आपल्या दोन तरुण मुलांना खांदा देण्याचा काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग आणावा, अशा या घटनेने मन सुन्न झाले. नियति किती निर्दयी आणि क्रूर कठोर असते, ती अशा प्रसंगातून चांगल्या माणसांनाही कडूशार विषारी घोट पाजते. रविवारच्या सुटीचे निमित्त साधुन व जवळच असलेल्या सातपुडा पर्वत रंगेतील धडगांव (अक्राणी) तालुक्यातील अतिदुर्गम भागातल्या बिलगाव येथे असलेल्या निसर्ग रम्य वातावरणात असलेल्या निसर्गनिर्मित पाण्याचा धबधबा पाहण्यासाठी शहरातील काही हौशी तरुण मंडळी गेली होती. यात शनिगल्लीमधील मुलांचा समावेश होता. यांत राहुल देवीदास पाटील व विशाल देवीदास पाटील हे दोन्ही सख्खे भाऊदेखील होते. सदर तरुण डीडीसीसी बँक तळोदा येथे शिपाई म्हणून नोकरीला असलेले राजू पाटिल म्हणून परिचित असलेले देवीदास पुंजरू पाटिल यांची मुले होती. काल दोन तरुण बिलगाव येथील धबधबाच्या पाण्यात बुडाल्याची वार्ता वायुवेगाने शहरासह संपूर्ण जिल्हाभर पसरली. त्यामुळे ज्यांची मुले त्यास्थळी गेली होती त्या कुटुंबांचे तर अवसानच गळाले. कुटुंबिय व मित्रमंडळी,गल्ली व शहरातील धाडसी युवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी धडगांव तालुक्यातील बिलगाव येथे धाव घेतली. तोवर तेथे असलेल्या सोबतीने गेलेल्या मित्रमंडळी यांनी महत्प्रयासाने बुडालेल्या २ मुलांपैकी १ मुलाचा मृतदेह त्या पाण्याच्या खोल प्रवाहातून काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नला यश आले. तो मृतदेह राहुल देवीदास पाटील याचा असल्याची खात्री उपस्थितांना पटल्यावर धड़गांव येथून देवीदास पुंजरू पाटिल यांच्या कुटुंबियांना निरोप पाठविण्यात आला. तोवर घटनास्थळी सदरल युवकांचे वडील देवीदास पाटिल हे देखील पोहचलेच होते. या दुर्दैवी घटनेचा आघात सहन करीत त्यानी स्थानिक गावकरी मंडळींच्या सहाय्याने दुसर्‍या मुलाची शोध मोहिम रात्री उशिरा १० वाजेपर्यन्त सुरु होती. मात्र यश आले नाही. पुन्हा सकाळी सहा वाजेपासून शोध मोहिम सुरु झाली, ज्या ठिकाणी युवक बुडाला त्या ठिकाणी बिलगांव येथील पोहण्यात पटाइत असलेल्या ग्रामस्थांचस सहकार्याने दुसर्‍या मुलगा विशाल पाटील यांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले व ९ वाजेच्या सुमारास विशाल पाटिल याचा मृतदेह पाण्याच्या डोहात दिसून आला. स्थानिक ग्रामस्थांनी दोेरखंडास स्वतःला बांधून घेत विशालचा मृतदेह बाहेर काढला. धडगांव येथे दोन्ही मृतदेहांवर शवविच्छेदन करण्यात येवून वडील देवीदास पाटिल यांच्या ताब्यात देण्यात आला. धडगांव येथून एकाच टेम्पोमधे तळोदा येथील निवासस्थानी अंत्यसंस्करासाठी अण्यात आले. तरुण लेकराचे मृतदेह पाहून माऊलीने एकच दुःखद टाहो फोडला व उपस्थित जनसमुदायाच्या नयनी दुःखाश्रु आवरेनासे झाले. मयत दोन्ही युवकांवर तळोदा नगरपालिकेच्या अमरधाम येथे दुपारी २ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरासह जिल्हा भरातून शोकाकूल नागरिक आप्त मंडळी मित्र मंडळी उपस्थित होती. मयत राहुल पाटील याचे तळोद्यात गणपतीगल्ली मेनरोड येथे केशर मेडिकल्स नावाने औषधीचे दुकान होते. त्या माध्यमातून ते जनतेला मनोभावे तत्पर सेवा देत होता. त्यांच्या पश्‍चात आई व वडील हे दोनच आहेत. काल तळोदा तालुक्यातील वेगवेगळेत तरुण ग्रुप बिलगाव धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्यात युवकांचा एक ग्रुप सहलीसाठी बिलगावाच्या धबधब्यावर गेला होता.इथे पोहत असतांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले तर पाच जण पाण्याच्या बाहेर आले. यातील राहुल पाटील व विशाल पाटिल या दोन युवकाचा दुर्दैवी मृ्त्यु झाला. या घटनेमुळे तळोदा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा