माझ्या बातमीची दखल दि १९ रोजी प्रसारित झालेल्या तळोदा तालुक्यात ५१ गावात स्मशानभूमीचा अभाव या माझ्या वृताची दखल नंदुरबार जिल्ह्याधिकारी कलशेट्टी यांनी तत्काळ घेवून संबंधित प्रशासनाला अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले.... धन्यवाद साहेब..
स्मशानभूमी नसलेल्या गावांना अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश
`पुण्यनगरीचा दणका' : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बीडीओनी दिल्या सूचना....
पुण्यनगरीच्या बातमीनानंतर प्रशासनाला आली जाग
तालुक्यातील आदिवासी बहुल गावांमधील पक्क्या स्मशानभूमी नसलेल्या व शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या नसलेल्या गावांचा परिपूर्ण प्रस्ताव व ग्रामपंचायत निहाय बांधकामाचे अंदाजपत्रक बाबत माहिती उपलब्ध करण्याचे आदेश गटविकास अधिकारी शरद मगर यांनी संबंधित ग्रामसेवकाना दिले आहेत. याबाबत दै.`पुण्यनगरी' तुन तळोदयातील स्मशानभूमी नसलेल्या गावातील स्थिती व नागरिकांच्या अडचणी मांडण्यात आली होती. या वृताची दखल घेवून संबंधित अधिकाऱ्याना सूचना केल्या आहेत. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यानी संबंधित ग्रामसेवकांना आदेश बजावले आहेत. तळोदा तालुक्यातील ५१ग्रामपंचायतींना स्मशानभूमीचा अभाव ` अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष असल्याची बातमी दि-१९ रोजी `दै. पुण्यनगरी'वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृताची दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये तळोदा गटविकास अधिकारी शरद मगर यांनी ग्रामसेवकाना आदेश बजावले आहेत. या आदेशात शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या नसलेल्या गावातील पक्क्या स्मशानभूमी नसलेल्या गावांचा परिपुर्ण प्रस्ताव व
ग्रामपंचयाती निहाय बांधकामाचे अंदाजपत्रक तात्काळ मागविण्यात आले आहेत. तळोदा तालुक्यात दुर्गम अतिदुर्गम भागातील ६७ ग्रामपंचायतीपैकी ५१ गावांना स्मशानभूमी नसल्याने मयतांवर अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातील बहुतेक गावांमध्ये जागा असून देखील स्मशानभूमी नाही. तर काही गावात जागेअभावी स्मशानशेड बांधण्यात आलेले नाहीत. अशी अवस्था आहे. त्यामुळे नदी नाल्याच्या काठावर तर काही गावात शेतावरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. याबाबत वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी दखल घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने गटविकास अधिकारी शरद मगर यांनी पक्क्या शेड नसलेल्या अंमलपाडा, रामपूर, रतनपाडा, अमोनी, रापापुर, धवळीविहीर,कोठार, चौगाव खुर्द, खर्डी बु, चौगाव बु, छोटा धनपुर, चिनोदा, दलेलपुर, धनपुर, सिंलिंगपूर, खर्डी, खु,सावरपाडा, अलवान,इच्छागव्हाण, करडे, काझीपुर, खरवड (गोसावी वस्ती), खेडले, खुशगव्हाण, बेलीपाडा, लाखापुर फो, लाखापुर रे, लोभानी, मोहिदा, मोरवड, नवागाव, न्यूबन, पिंपरपाडा, राणापुर, बंधारा, पाडळपुर, जीवननगर (गोपाळपूर पुन), रोझवे, सलसाडी, सरदारनगर, शिर्वे,सोमावल खु, तळवे , तऱ्हावद, (आदिवासी वस्ती) गंगानगर (तऱ्हावद पुन),वाल्हेरी, झिरी आदी स्मशानभूमी नसलेल्या ४७ गावांचे प्रस्ताव व स्मशान भूमी बांधकामाचे ग्रामपंचायती निहाय अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी मगर यांनी बजावले आहेत.
*प्रतिक्रिया*- जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने तळोदा तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या नसलेल्या, स्मशानभूमी नसलेल्या गावांचे प्रस्ताव व बांधकामांचे अंदाजपत्रक तात्काळ ग्रामसेवकाना सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा