आयुष्यभर सुख दु:खाचे चटके सोसणाऱ्या माणसांची मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याचे चित्र समोर आले आहे.आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील तळोदा तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गावांना स्मशानभूमी नसल्याने मयतावर अंत्यसंस्कारासाठी समस्यां निर्माण होण्याची दुर्दवी प्रकार संबंधीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे उदाहरण आहे. अनेक गावांमध्ये
जागा असून देखील स्मशानभूमी नाहीत. तर काही गावात जागेअभावी स्मशानशेड बांधन्यात आलेले नाहीत. अशी अवस्था आहे. त्यामुळे नदी, नाल्याच्या काठाणवर तर काही गावांत शेतावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
तळोदा तालुक्यात बहुतेक गावांना स्मशानभूमीचा अभावी मरणानंतर हि मरण यातना भोगाव्या लागत आहेत. अनेक गावांमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी उघड्या जागेचा वापर करावा लागत असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे. तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीपैकी 51 ग्रामपंचायतींना स्मशान भूमी नसल्याने ऐन पावसाळ्यात मयतावर अंत्यसंस्कार करावेत कुठे असा प्रश्न नाग्रीकांसमोर उपस्थित होत आहे.
तळोदा तालुक्यात एकूण 67 ग्रापंचायती आहे. 67 ग्रामपंचायत पैकी केवळ 16 गावानाच ग्रामपंचायतीच्या पक्क्या स्मशानभूमी आहेत. उर्वरित 51 गावांना स्मशानभूमी अभावी मरणानंतरही मृत्यू देहाचा अवहेलना होत आहे. स्मशानभूमी शेड नसल्यामुळे पावसाळ्यात गावातील एखाद्या व्यक्तीच्या निधन झाल्यास अंत्यसंस्काराची प्रमुख अडचण निर्माण होत आहे.
चिखलात बसूनच मृतदेहाला अग्निडाग द्यावा लागण्याची वेळ नातेलगांवर येत असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. स्मशानभूमीत शेड नाही, पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था व पाऊस यामुळे मृतदेहासह नातेवाईकांना जीवंतपणे नरक यातना सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे समस्यां असलेली गावे हि आदिवासी बहुल लोकसंखेच्या आहेत. निवडणुकीसाठी आदिवासींच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या प्रतिनिधनीही याकडे दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधीत विभागाने लक्ष घालून गावांमध्ये उभारावी, अशी मागणी करण्यात येत आहे...
*स्मशान भूमी नसलेली अथवा कच्ची स्मशानभूमी असलेले गावे* अंमलपाडा, रामपूर, रतनपाडा, अमोनी, रापापुर, धवळीविहीर,कोठार, चौगाव खुर्द, खर्डी बु, भंवर, चौगाव बु, छोटा धनपुर, चिनोदा,दलेलपुर, दसवड, धनपुर, सिंलिंगपूर, खर्डी, खु,सावरपाडा, अलवान,इच्छागव्हाण, करडे, काझीपुर, खरवड, खेडले, खुशगव्हाण, बेलीपाडा, लाखापुर फो, लाखापुर रे, लोभानी, मोहिदा, मोरवड, नवागाव, न्यूबन, पिंपरपाडा, राणापुर, बंधारा, पाडळपुर, जीवननगर (गोपाळपूर पुन), रोझवे, सलसाडी, सरदारनगर, शिर्वे,सोमावल खु, तळवे , तऱ्हावद, गंगानगर (तऱ्हावद पुन),वाल्हेरी, झिरी आदी
पक्की स्मशानभूमी असलेली गावे बोरद, नर्मदा नगर, नलगव्हाण, रांझणी, प्रतापपुर, राजविहिर, राणापुर, रोझवे पुन, सोमावल बु, तुळाजे, आमलाड, बुधावल, धानोरा, मालदा, मोड, मोदलपाडा या बोटावर मोजण्या इतक्या गावांना शेड असलेली स्मशानभूमी आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा