Breking News

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

माझ्या बातमीच्या वृत्ताने सा.बा.विभागाची उडाली झोप.

आमदारांसह अधिकाऱ्यांनी केली हातोडा पुलाची पाहणी...
 माझ्या बातमीच्या वृत्ताने सा.बा.विभागाची उडाली झोप.
जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस....

तळोदा नंदुरबार रस्त्याला जोडणारा हातोडा पुलाचे उद्घाटनापूर्वीच ठिकठिकाणी भराव खचला असून पुलाचे काम निकृष्ठ झाल्याचे सविस्तर वृत्त दै पुण्यनगरीने प्रसिद्ध करून प्रशासनाच्या बोगस काम चव्हाट्यावर आणले. या वृत्ताने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यासोबत पुलाची पाहणी केली. पुलावर ठिकठिकाणी पडलेले तडे, खचलेला भराव पाहून आमदार पाडवी चांगलेच संतापले. यावेळी त्यांना उपस्थित अधिकाऱ्याना धारेवर धरत कानउघाडणी केली. पुलाच्या बांधाकामात अपहार झाला असल्याचा आरोप करून कामाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल. अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सदर बाब गँभीर असल्याचे सांगुन संबंधीत विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले.
 महाराष्ट्र व गुजरात राज्याचा सिमेवरील हातोडा पूल विविध तांत्रिक अडचणींसह अन्य बाबींमुळे चर्चेत आला. तत्कालीन पालक मंत्री गिरीश महाजन व शहादा तळोदा विधानसभाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी 6 वर्षांपासून रखडलेला हतोडा पूल जून महिनापूर्वी सुरु करणार असल्याचे असश्वासन दिले होते. मात्र तापीनदीला पाणी सोडल्याने पुलाचे काम बंद आहे. 90 टक्के काम पूर्णत्वाकडे असताना पुलाचे झालेल्या कामाच्या ठिकठिकाणी तडे गेल्याने संबंधीत विभागाचे कामाचे वाभाडे चव्हाट्यावर आले आहे याबाबत दै.पुण्यनगरीने शुक्रवारी सचित्र वृत्त प्रकाशित केल्याने प्रशासनाची झोप उडाली. या वृताची दखल घेत आमदार उदेसिंग पाडवी यांनी तात्काळ संबंधीत विभागाला दूरध्वनी करून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील पिंगळे व सहकारी यांच्यासह आ. उदेसिंग पाडवी विश्वनाथ कलाल, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, शहर अध्यक्ष हेमलाल मगरे, डॉ.स्वप्नील बैसाने, युवा मोर्चाचे शिरीष माळी, माजी नगरसेवक भगवान मगरे, महेंद्र वाणी, माजी नगरसेवक भास्कर मराठे, आदींनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पूलाचे निकृष्ट काम पाहून आमदार पाडवी यांनी सा.बा.विभागाचे अभियंता पिंगळे यांना चांगलेच धारेवर धरले. पुलावर आवश्यक तो भराव व रोलरींग न केल्यामुळे सदर प्रकार घडला असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. पुलाच्या दोघा बाजूच्या संरक्षण कठडयाच्या भराव पूर्णपणे खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आवशक्य तो भराव व रोलरींग न करता डांबरीकरणं का केले? हा संशोधनाचा विषय आहे. अधिकाऱ्यांनी बेजाबदार केलेल्या कामामुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कामाचा निधी वाया गेला असून सदर काम पुन्हा करावे लागणार आहे. हातोडा पूल हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या विकासाचा सेतू असल्याचे सांगत, पुलाचे काम निकृष्ठ दर्जेचे झाले असून यात अपहार झाला असल्याचा आरोप आमदार पाडवी यांनी यावेळी केला. याबाबत अभियंता सुनील पिंगळे यांनी वरिष्ठ याबाबत माहिती देतील म्हणत जबाबदारी झटकली. या पुलाच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबारकडे आहे. वेळोवेळी पाहणी करून योग्य त्या सूचना देऊन काम करवून घेण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता वर्षा आहिरे, धुळे अधिक्षक वाघ यांची आहे. मात्र या अधिकाऱ्यानी पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशट्टी यांनी सदर बाब गँभिर असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दै. पुण्यनगरी प्रतिनिधी सुधाकर मराठे यांना दिली......
हातोडा पूल विकासाचा सेतू आहे. याबाबत वेळोवेळी निधी साठी प्रयत्न करून निधी उपलब्ध केला आहे. मात्र पुलाचा भराव खचला असून पुलाला मोठाली तळे गेली आहेत. पुलावर योग्य तो भराव व रोलरींग केली नसताना देखील त्यावर डांबरी करणं करून निधी वाया करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी तसेच मुख्य कार्यकारी अभियंता यांनी अद्याप पावेतो एकदाही पुलाची पाहणी केलेली नाही. सदर अधिकारी कुणाचे फोन उचलत नसून कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. बेजबाबदार अधिकारी वर योग्य ती कारवाइ व्हावी याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करणार आहे...
 *आमदार उदेसिंग पाडवी* *शहादा - तळोदा विधानसभा क्षेत्र -*
हातोडा पुलाच्या बातमीनंतर खान्देशात गाजला हातोडा पुलावर केलेला खान्देशी चिमटा
तात्काळ  बातमीची दखल जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी घेतली व मला  WHATSAPP  वर कळवले...


दै.पुण्यनगरीची दखल बातमी 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा