तळोदा शहरातील येथील 11 वर्षीय दानिश मुक्तार पिंजारी या बालकाने श्री ची स्थापना करून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविले आहे. शहरात शांतता नांदावी, हिंदू मुस्लिम मध्ये बंधूभाव निर्माण व्हावा ह्या हेतूने गणेश स्थापना केल्याचे दानिश सांगतो. या उपक्रमानंतर दानिशचे सर्वत्र कौतुक होत आहे....
मजहब नहीं सिखाता आपसमें वैर रखना..! या प्रमाणे तळोदा येथील 5 वीत शिक्षण घेणारा अकरा वर्षीय दानिश मुक्तार पिंजारी यानें हिंदू मुस्लिम एकता अबाधित राहावी, हा हेतू मनात ठेवून जाती धर्माचा तिढात न पडता एकतेचा प्रतीक असलेल्या गणपतीची स्थापना करुण एक आदर्श निर्माण केला आहे. दानिशला गणेश मूर्तीचे विशेष आकर्षण असल्याने. दानिश मूर्ती विक्रेत्यांकडे जाऊन मुर्त्या पाहत असे. दिवसभर विविध गणेश मुर्त्या पाहून दानिश कुतूहलाने मूर्ती विकर्त्याला हि मूर्तीबाबत माहिती विचारत असे. लालबागच्या राजा व दगडू शेठ हलवाई या मूर्त्यांचे दानीशला मोठे आकर्षण निर्माण झाले. श्रीच्या कथा ऐकून व विविध रंगीबेरंगी गणेश मूर्त्यांनी दानिशला चांगलाच आकर्षित केले. गणेश स्थापनेबाबत दानिशने त्यांच्या काही मित्राना विचारणा केली. त्यांच्या योग्य प्रतिसाद न मिळाल्याने दानिश खचला नाही. त्याने कल्पना टॉकीज गल्लीतील बाळ गणेश मित्रमंडळातील अध्यक्ष व सदस्यांना त्यांच्या मंडपात आपला गणपती स्थापना करण्याची विनंती केली.. मंडपात मूर्ती बसविण्याच्या होकार मिळताच दानिशने खाऊच्या पैश्याने गणपतीची छोटीशी मूर्ती विकत घेऊन तीची विधिवत स्थापना केली. दररोज नित्यनियमाने मदजीतमध्ये नमाज अदा करून आल्यावर सकाळ, संध्याकाळी स्वतः श्रीची आरती करतो, नैवेद्य देतो व दररोज प्रसाद वाटप करतो. सत्यनाराणाची पूजा सह मंडपात होत आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमात दानिश मोठ्या भक्तीभावाने रमतो. दानिशने स्थापन केलेल्या श्री च्या मूर्तीकडे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. सामाजिक एकात्मता जोपासली जावी यासाठी दानिश दरवर्षी श्रीची स्थापना करणार असल्याचे तो म्हणतो. याबाबत त्याच्याशी संवाद साधला असता. हिन्दू मुस्लिम में लढाई न हो. एकसाथ में सब मिलकर रहे कोई लढाई ना करे, भगवान तो भगवान होता है! हर भगवान की पूजा करे हर भगवान को नमस्ते करे, हर भगवान को सलाम करे।* असे त्याने सांगितले. दानिशच्या या उपक्रमाचे व त्याने निर्माण केलेल्या सामाजिक एकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा