Breking News

बुधवार, १५ मार्च, २०१७

दारूबंदीचा ठराव.

बोरदच्या भट्टीहट्टी परिसरातील रहिवाशांचा दारूबंदीचा ठराव..... 🔴

बोरद ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी बोरद येथे जाऊन बैठक घेतली. बैठकीत महिला मोठय़ा संख्यने उपस्थित होत्या. दारुबंदीमुळे होणारे नुकसान व दुष्पपरिणामाबाबत भामरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिलांनी आपले गार्‍हाणे मांडले. दारुमुळे आमचे संसार उध्वस्त होत असून गावातील दारु भट्ट्या तात्काळ बंद करा, अशी विनंती महिलांनी केली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी संबंधित दारु विक्रेत्यांना बोलावून त्यांची कानउघडणी करीत तात्काळ दारु दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. कोणीही परिसरात दारुविक्री करतांना आढळला तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा भामरे यांनी दिला...⭕🔺 तळोदा तालुक्यातील बोरद हे सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे. गावात ठिकठिकाणी दारूचे अवैध भट्टया व अवैध दारू विक्री मोठा प्रमाणात होत आहे. गावातील भट्टी गल्लीत मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या दारूच्या भट्ट्या व दारू विक्रीची दुकाने सर्रासपणे सुरु आहेत. त्यामुळे गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जात असल्याचे गावकर्‍यांचे र्म्हणने आहे. कमी वयातील तरुण दारूच्या व्यसनाकडे वळत असल्याने त्यांच्या भविष्यासह आरोग्याचा गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे. दारुमुळे गावात भांडण-तंटे होत आहेत. दारु पिण्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असुन अनेक तरुणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच या अवैध दारु विक्रीमुळे परिसरातील वातावरण दुषित होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. या सर्व समस्यांमुळे गावातील पुरुषांनी दारूबंदीची मागणी वारंवार केली आहे. अनेकदा पोलिसांकडे तोंडी स्वरुपात दारुबंदीची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप दखल न घेतल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. यामुळे गल्लीतील पंच मंडळीसह ग्रामपंचायत सदस्यांनी दारुबंदीचा ठराव केला आहे.या ठरावाबाबत दारु विक्रेत्यांना आठ दिवसापूर्वीच माहिती देण्यात आली. दारुविक्रेत्यांनी सण असल्याने आठ दिवसाची मुदत मागितल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.मात्र त्यानंतरही अवैद्य हातभट्टीची दारु सर्रासपणे विक्री केली जात आहे. दुकाने बंद करण्याबाबत सांगितले असता दुकाने बंद होणार नाहीत, असे दारु विक्रेते सांगत असल्याचे गावकर्‍यांचे म्हणने आहे. दारुबंदीसह संबंधित दारु विक्रेत्यांना समज द्यावी या मागणीसह संतप्त ७0 ते ८0 ग्रामस्थांनी मागणीचे निवेदन तळोदा पोलीस निरीक्षक संजय भामरे यांची भेट काल मंगळवारी दिले. दारुबंदी न केल्यास घडलेल्या अनुचित प्रकारास पोलीस जबाबदार राहतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल पवार, अशोक पाडवी, विजय मगरे, कांतीलाल मोरे, रवींद्र वसावे, संजय माळी, किसन नवरत, चुनीलाल तेले, आंबालाल मोरे, प्रकाश पवार, दादा पवार, राजू पवार, लखन पाडवी, हरीचंद्र पवार, अनिल भिलाव, सुभाष पवार, संतोष पवार, सुरेश ठाकरे, संजय पाडवी, रतीलाल मगरे, पुन्या माळी, दत्तू रोहिदास पाटील, किशोर पाटील, कांतीलाल मोरे, अनिल भिलाव यांच्यासह ७0 पेक्षा अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा