Breking News

रविवार, ५ मार्च, २०१७

तळोदा तालुक्यात ३१ कोटीचे विजबिले थकीत...

तळोदा तालुक्यातील विजग्राहकांकडे तब्बल 31 कोटी विज बिल थकले असून हि रक्कम वसूल करण्यासाठी लवकरच विज कंपनी सरसावणार आहे. शिवाय भारनियमातही लवकरच वाढ करण्याचे संकेत कंपनीने दिले आहे... तळोदा तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात विज पोहचावी याबाबत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. विज मिटर मिळण्याबाबत असंख्य ग्राहकांचे अर्ज दररोज कार्यालयात येत आहेत. ग्रामीण भागासह शहरात देखील विज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच कोट्यवधीने थकीत असलेल्या विजबिलामुळे विजमंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक उपाय करून हि थकीत जमा होत नसल्याने.. विज मंडळ विविध उपाय योजना राबवत आहे. तळोदा तालुक्यात सर्वप्रकारची 13 हजार दोनशे 21 एवढी ग्राहक संख्या आहे. यात बहुतांश ग्राहकांकडे साधारणतः 32 कोटी एवढी थकबाकी आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, औद्योगिक, व्यावसायिक घरगुती, आदींच्या समावेश आहे. तर सर्वाधिक वीज बिल शेतक-यांकडे थकीत असून त्याच्या आकडा 26 कोटी वर गेला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चाललेला आहे. भारतीय जनता पक्षाचे व शिवसेनेचे युती।सरकार आल्यानंतर शेतकरऱ्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र युतीच्या सरकार कडून आश्वासन पूर्तता झाली नाही. आश्वासनाच्या भरोस्यावर अनेक शेतकरी अद्याप हि प्रतीक्षेत आहेत. आस्मानी सुलतानी संकटाना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागते. याविविध कारणांमुळे ग्रामीण भागातून शेतक-यांनी कृषीपंपाची वीजबिले आदी बिले थकली आहेत. शेतकरी हवालदील झाले असताना बिल भरण्यास विविध संकटे येत आहेत. यांच्या फटका मात्र विजवितरण विभागाला होत आहे. विज कंपनीकडून घरगुती विज ग्राहकांवर कारवाई सुरू करण्यात आली असुन विजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा विज पुरवठा खंडित केला जात आहे. विज गळती व विज चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. तालुक्यात ठिकठिकाणी भर दुपारी देखील पथदिवे सुरु असतात. अनेक शासकीय कार्यालय, बँका, आदी ठिकठिकाणी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित नसताना हि ac पंखे, कुलर आदींच्या गैरवापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यातून नाहक विज वाया होत आहे. याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. अश्या विविध कारणामुळे विज कंपनिला प्रचंड आर्थिक नुकसानिला सामोरे जावे लागत आहे.


घरगुती ग्राहक 6522 असून 86 लाख 40 हजार थकबाकी व्यावसायिक ग्राहक 566 असून 13 लाख 23 हजार थकबाकी औद्यीगिक ग्राहक संख्या 187 असून 2 लाख 7 हजार थकबाकी तालुक्यात पाणीपुरवठा ग्राहकांची संख्या 70 असून 1 कोटी 2 लाख 23 हजार थकबाकी आहे. शेतीपंप 5784 ग्राहक संख्या असून 26 कोटी 63 लाख 33 हजार एवढी थकबाकी आहे. पथदिवे 92 ग्राहक संख्या असून 2 कोटी 47 लाख 92 हजार एवढी थकबाकी बाकी आहे. तालुक्यात एकूण 13221 ग्राहक संख्या असून 31 कोटी 15 लाख 23 हजार एवढी थकबाकी आहे...

विजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची टीम बनवण्यात आली असून विजबिल थकीत असलेल्या ग्राहकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसा बजावूनही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे तात्पुरता स्वरूपात विज खंडीत करण्याचे कामे सुरु आहेत. दिर्घकाळा पासून विजबिल भरणा न करणाऱ्या ग्राहकांचे कायमस्वरूपी विज खंडीत करण्याचे कामे सुरू आहेत. तालुक्यात रिक्षा फिरवून बिल भरण्याचे आव्हान करने सुरु आहे. ग्राहकांना विज बिले भंरण्याचे आव्हान सहाय्यक अभियंता सचिन काळे यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा