तळोदा तालुक्यातील मोठीबारी येथील अस्वलाच्या हल्यात मयत झालेल्या टीमका
नाईक व अलवान येथील अस्वलाच्या हल्यात जखमी झालेल्या मोग्या पवार या दोघांच्या वारसास वन्य प्राणी जीवित हानीतून आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. तळोदा तालुक्यातील अलवान परिसरात ३0 डिसेंबर रोजी अस्वलाने धुमाकूळ घातला होता. तर तालुक्यातील मोठीबारी येथील रहीवासी सायंकाळच्या सुमारास शेतातून पायवाटेने जात असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला होता. या हल्यात ५५ वर्षीय टिमकी खाअल्या नाईक या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला होता. तर अलवान परिसरात मोग्या रामा पवार हे शेतातील कामे आटोपून घरी परतत असताना अस्वलाने त्यंच्यावर हल्ला चढविल्याने ते गंभिररित्या जखमी झाले होते. याबाबत वनविभागातर्फे पंचनामा केला होता. याबाबत वनक्षेत्रपाल अशोक वाघ यांनी शासन दफ्तरी पाठपुरावा करुन शासानाच्या वन प्राणी जीवित हानी योजनेतून मयत टिमकी नाईक व जखमी मोग्या पवार या दोघांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे. मयत टिमका नाईक यांच्या वारसास ८ लाख तर जखमी झालेल्या मोग्या पवार यास एक लाखाची आर्थिक मदत वनविभागाकडून प्राप्त झाली आहे. तालुक्यातील अलवान येथे आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते मोग्या पवार व मयत टिमका नाईक यांच्या वारसास धनादेश देण्यात आला. यावेळी नगरसेवक अजय परदेशी, भाजपा तालुकाध्यक्ष श्याम राजपूत, प्रांतिक सदस्य डॉ.स्वप्नील बैसाने, युवा तालुकाध्यक्ष शिरीष माळी, संजय चौधरी, उपवनसंरक्षक पी.एन.पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक एस.ए.अहिरे, तळोदा वनक्षेत्रपाल अशोक पाटील, वनपाल एस.बी.चव्हाण, खर्डी वनरक्षक एस.एल.वाघ, वनपाल ए.जी.वाडीले, वनरक्षक बी.एस.जाधव, जे.आर.खोपे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा