जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू असून या अंतर्गत तळोदा येथे पथकाने केलेल्या कारवाईत एका डॉक्टरविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू आहे. यासाठी तालुहानिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामोहीमेतंर्गत तळोदा येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा शिंदे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी शहरातील लक्ष्मीनारायण जनरल हॉस्टिपल व मल्हार मेडिकल येथे तपासणी केली. तत्पूर्वी पथकाने हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे बनावट पेशंट पाठविण्यात आला. येथील डॉ.प्रशांत मिरघे यांनी त्या रूग्णाकडून २00 रूपये फी घेवुन औषधोपचारासाठी प्रिस्क्रीप्शन दिले. तसेच त्यांच्याजवळील प्रतिजैविकाची छोटी सलाईन व औषधी दिली. सदर डॉक्टरांकडे त्या पॅथीचे प्रमाणपत्रची मागणी केली असता उपलब्ध झाले नाही. तसेच दवाखान्यातही दर्शनी भागात लावलेले आढळून आले नाही. सदर हॉस्पिटलची तपासणी केली असता ते हॅलोपॅथिक व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्याकडे वैद्यकीय पदवी आढळून आली नाही. डॉ.मिरघे यांनी मान्यता प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध न करून दिल्यामुळे आणि अपात्र असतांनासुध्दा जनतेच्या आरोग्या व जिवीतास धोका निर्माण होईल, असे करीत असल्याचे निर्दशनास आले. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीसनर अँक्ट १९६१ प्रमाणे सदर डॉक्टरांकडे कोणतेही प्रमाणपत्र आढळून आले नाही. त्यामुळे डॉ.रेखा शिंदे यांच्या फिर्यादीवरून इंडियन मेडिकल कौन्सिल अँक्ट १९५६ चे कलम १५ (२) व महाराष्ट्र मेडि प्रॅक्टीसनर अँक्ट १९६१ चे कलम ३३ (२) भादंवि कलम ४१९, ४२0, १७५, १७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील वैद्यकीय व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा